पूर्वी हृदयविकाराचा झटका साधारणतः वयाची साठी उलटल्यानंतर यायचा; मात्र आता अगदी तरुण वयातही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. सिद्धार्थ शुक्ला, श्रेयस तळपदे आणि अलीकडेच आकस्मिक मृत्यू झालेले विकास सेठी या तिन्ही अभिनेत्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र, सिद्धार्थ शुक्ला व श्रेयस तळपदे यांना हार्ट अटॅक आला; तर विकास सेठी यांना कार्डिअॅक अरेस्ट. अनेकांचा असा समज आहे की, या दोन्ही परिस्थिती सारख्या आहेत; परंतु असे नाही. दोन्ही परिस्थिती वेगवेगळ्या आहेत. मुख्य म्हणजे हार्ट अटॅक आणि कार्डिअॅक अरेस्ट यांसारखे हृदयविकाराचे (Cardiovascular diseases) प्रमाण भारतात १९९० मध्ये २५.७ दशलक्ष होते, जे २०२३ मध्ये ६४ दशलक्षांपर्यंत जाऊन पोहोचले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, जगभरातील हृदयविकाराच्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक-पंचमांश मृत्यू भारतात होतात, विशेषत: तरुणांचे. अमेरिकेतही हृदयविकाराचा झटका आलेल्या पाचपैकी एक रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचा असल्याची नोंद आहे. हृदयविकारासाठी वाढता तणाव आणि बदलत्या जीवनशैली या बाबींना जरी कारणीभूत ठरवले गेले असले तरी अनेकांना अपचनासारख्या इतरही काही समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येत असल्याचे सांगितले जाते. रविवारी (८ सप्टेंबर) विकास सेठी यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी जान्हवी यांनी खुलासा केला की, अभिनेत्याचे निधन होण्यापूर्वी त्यांना पचनाच्या गंभीर समस्या होत्या. त्यामुळे हृदयविकाराचा अपचनाशी काही संबंध आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय. त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ आणि हृदयविकाराचा झटका येण्याच्या मुख्य कारणांविषयीही समजून घेऊ.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस

हेही वाचा : चीनवर निवृत्तीचे वय वाढवण्याची वेळ का आली? ४० वर्षांनंतर का घ्यावा लागला एवढा मोठा निर्णय?

विकास सेठी प्रकरण

रविवार, ८ सप्टेंबर रोजी अभिनेते विकास सेठी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. क्योंकि साँस भी कभी बहू थी, कसौटी जिंदगी की, कही तो होगा यासारख्या टीव्ही मालिकांमधून प्रसिद्ध झालेले विकास सेठी यांना राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला. त्यांची पत्नी जान्हवी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ते दोघेही नाशिकमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमात गेले होते, तेव्हा विकासला अचानक मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. आम्ही नाशिकमध्ये माझ्या आईच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांना उलट्या आणि पोटाचा त्रास सुरू झाला. त्याला दवाखान्यात जायचे नव्हते. म्हणून आम्ही डॉक्टरांना घरी यायला सांगितले. सकाळी ६ च्या सुमारास (रविवारी) मी त्याला उठवायला गेले तेव्हा तो उठला नाही. तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की, काल रात्री झोपेत हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.

रविवार, ८ सप्टेंबर रोजी अभिनेते विकास सेठी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (छायाचित्र-पीटीआय)

अपचन आणि हृदयविकाराचा संभाव्य संबंध

अपचन म्हणजेच अॅसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ होणे, हृदयविकाराच्या झटक्याचे कारण ठरू शकते का किंवा हे त्याचे लक्षण असू शकते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जेव्हा हृदयातील रक्तप्रवाह विस्कळित होतो, तेव्हा शरीर तणावपूर्ण प्रतिक्रिया निर्माण करते; ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात आणि परिणामी अतिसार आणि उलट्या होतात. वैद्यकीय संशोधनात असेही दिसून आले आहे की, तुमच्या पोटात आणि अन्ननलिकेमध्ये जास्त प्रमाणात आम्ल असणे, हे हृदयाच्या अनियमित ठोक्यांचे एक संभाव्य कारण असू शकते. तज्ज्ञ सांगतात की, पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्थेचा भाग असलेल्या व्हॅगस मज्जातंतूतील (हृदय गती, रक्तदाब व पचन यांचे नियमन करण्यास मदत करणारे मज्जातंतूं) अडथळे, हेदेखील त्यामागचे कारण असू शकते.

हृदयविकाराचा झटका आणि छातीत जळजळ यांतील फरक

बरेच डॉक्टर सांगतात की, अनेकदा लोक हृदयविकाराच्या झटक्याला हार्टबर्न म्हणजेच छातीत होणारी जळजळ समजतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, हे प्राणघातक असू शकते. मात्र, हृदयविकाराचा झटका आणि छातीतील जळजळ यांतला फरक नक्की कसा ओळखता येईल? बहुतेक डॉक्टर सांगतात की, जर छातीत सतत वेदना होत असेल, तर त्या व्यक्तीने वैद्यकीय मदत घ्यावी. कारण- त्याला/तिला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. याव्यतिरिक्त, हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान छातीत दुखण्याचा प्रकार छातीत जळजळ होण्यापेक्षा वेगळा असतो.

हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान छातीत दुखण्याचा प्रकार छातीत जळजळ होण्यापेक्षा वेगळा असतो. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला छातीच्या मध्यभागी तीव्र वेदना किंवा दाब जाणवतो. त्याशिवाय, पाठ, मान, जबडा, खांदा किंवा हातांमध्ये वेदना पसरते किंवा हे अवयव अवघडतात. हृदयविकाराचा झटका आलेल्या लोकांना श्वासोच्छ्वासाचा तीव्र त्रासदेखील होतो. काही प्रकरणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने घाम येणे, चक्कर येणे यांसारखी लक्षणेही दिसतात. परंतु, छातीत केवळ जळजळ असेल, तर अशी लक्षणे दिसून येत नाहीत.

तरुणांमध्ये हृदयविकाराचा वाढता धोका

विकास सेठी यांच्या निधनाने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्या तरुणांच्या वाढत्या संख्येवरही प्रकाश टाकला आहे. ऑक्टोबर २०२३ च्या अहवालात असे दिसून आले की, ४०-६९ वयोगटातील ४५ टक्के मृत्यूचे मुख्य कारण हृदयविकाराचा झटका हे होते. ही जगभरातील समस्या आहे. माउंट सिनाई फस्टर हार्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ. दीपक भट्ट यांचे मत आहे की, यामागे अनेक कारणे आहेत. ते नमूद करतात की, अनेक तरुण किंवा निरोगी लोक त्यांचे कोलेस्ट्रॉल किंवा रक्तदाब नियमितपणे तपासत नाहीत आणि त्यामुळे असे धोके वाढतात. बैठी जीवनशैली, वाढता लठ्ठपणा व आयुष्यातील वाढता ताण ही तरुणांना हृदयविकाराचा झटका येण्याची अतिरिक्त कारणे असू शकतात. फास्ट फूड, जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरयुक्त पेयेदेखील या समस्येला कारणीभूत ठरतात.

विकास सेठी यांच्या निधनाने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्या तरुणांच्या वाढत्या संख्येवरही प्रकाश टाकला आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : हुकूमशहा किम जोंग उन करतोय युद्धाची तयारी? अण्वस्त्रांविषयी केली मोठी घोषणा; उत्तर कोरियाकडे किती अण्वस्त्रे?

तंबाखू, तसेच इतर औषधांच्या वाढत्या वापरामुळे शरीरावर दीर्घकालीन ताण येऊ शकतो; ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्याचाच दुसरा पैलू म्हणजे आनुवंशिक जोखीम. हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास आणि जास्त ताण हे दोन घटकदेखील हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमुख कारण ठरतात. हृदयाच्या आजारांबद्दलची आनुवंशिक पूर्वस्थिती ओळखणे, त्याचे लवकरात लवकर निदान होणे यांसारख्या बाबी त्यावरील उपचार शोधण्यास प्रभावी ठरू शकतात. परंतु, काही वैद्यकीय तज्ज्ञांनी असे नमूद केले आहे की, तरुणांमध्ये याविषयी अधिक जागरूकता वाढवण्याची गरज आहे. तेव्हाच याचे प्रमाण कुठेतरी कमी होऊ शकेल.

Story img Loader