Heatwave Warning in Maharashtra > उत्तर-दक्षिण भागातील बहुतांश राज्यांसह जवळपास निम्म्या भारतामध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याने महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम राहणार आहे. विदर्भात या महिन्यातील तिसरी उष्णतेची लाट आली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई उपनगरांसह कोकण विभागात पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. हवामान खात्याकडून येत्या पाच दिवसांत राज्यात, विशेषत: विदर्भामध्ये उष्ण लहरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एरवीच तापलेल्या विदर्भाला पुढील पाच दिवस उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट आलीय असं सांगितलं जातंय. मात्र उष्णतेची लाट म्हणजे काय? ती कशी ओळखतात? यासारख्या अनेक गोष्टी सर्वसामान्यांना ठाऊक नसतात, त्यावरच टाकलेली नजर..

एकीकडे पाच दिवस उष्ण लहरींचा अंदाज असताना त्यातही ३० एप्रिल ते २ मे या कालावधीमध्ये तर तीव्र उष्ण लहरींचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील जनतेला पुढील किमान आठवडाभर उन्हाच्या झळांपासून स्वत:चं संरक्षण करण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. उत्तर-दक्षिण भागातील बहुतांश राज्यांसह जवळपास निम्म्या भारतामध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याने महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम राहणार आहे.

home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
weather department, Cold weather
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा….१५ नोव्हेंबरनंतर मात्र….
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
maharashtra Government climate action cell plan to face climate change zws
राज्यातील हवामान कृती कक्ष कसा करणार हवामान बदलांचा सामना?
North Maharashtra gets colder Know why cold and how long
उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली; जाणून घ्या, थंडी का आणि किती दिवस?
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास

सध्या परिस्थिती काय?
विदर्भात या महिन्यातील तिसरी उष्णतेची लाट आली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई उपनगरांसह कोकण विभागात पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. एकीकडे विदर्भात उष्ण आणि तीव्र उष्ण लाटांचा अंदाज असताना आज दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण किनारपट्टीच्या काही भागामध्ये मेघगर्जनेचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मेघगर्जना होण्याचा अनुभव या भागात येऊ शकतो असं भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी म्हटलंय.

उष्णतेची लाट म्हणजे काय?
समुद्र किनारी भागातील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३७ अंशांच्या वर जाणे हा उष्णतेच्या लाटेसाठी पहिला निकष आहे. सामान्यपणे तापमान ३७ अंशांच्या वर गेल्यानंतर उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातो. तर मैदानी भागामध्ये हेच निकष ४० अंश इतके आहेत. डोंगराळ भागात हाच निकष ३० अंशांचा आहे. याशिवाय एखाद्या भागामधील तापमान हे सरासरीपेक्षा साडेचार ते ६.४ अंशांनी जास्त नोंदवल्यास तिथे उष्णतेची लाट जाहीर केली जाते. तसेच कमाल तापमान हे सरासरीपेक्षा ६.४ अंशांनी जास्त नोंदवले गेल्यास उष्णतेची तीव्र लाट जाहीर केली जाते. तापमानाची ही परिस्थिती सलग दोन दिवस राहिल्यास उष्णतेची लाट असल्याची घोषणा केली जाते.

अनेक ठिकाणी पारा ४० च्या वर…
बहुतांश भागात तापमान ४० अंशांपार गेले असून, मुंबईजवळील काही भाग आणि ठाणे जिल्ह्यांत तुरळक भागात तापमान विदर्भाप्रमाणे ४३ ते ४४ अंशांपर्यंत पोहोचले आहे. संपूर्ण एप्रिलमध्ये उन्हाचा तीव्र चटका होता, आता महिन्याचा शेवटही तीव्र काहिलीतच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच राज्यात तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे राहिलेला आहे. या महिन्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेच्या लाटा येऊन गेल्या. मुंबई आणि उपनगरांमध्येही एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यात उष्णतेच्या लाटेची स्थिती होती. उत्तरेकडून सातत्याने उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यातून तापमानात वाढ नोंदिवली जात आहे. बंगलाच्या उपसागरातून गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यातून उत्तरेकडील उष्ण वाऱ्यांचा प्रभाव काहीसा कमी झाला होता. त्यामुळे राज्यातील तापमानात काही प्रमाणात घट नोंदिवली जात होती. मात्र, आता बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा प्रभाव कमी होत आहे. पुढील एक ते दोन दिवस सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यांत एक ते दोन दिवस पावसाळी वातावरण राहणार असले, तरी तापमानातील वाढ कायम राहणार आहे.

कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी वाढले
उत्तर-दक्षिण भारतातील तापमानात पुढील दोन दिवस कमाल तापमानात आणखी दोन अंशांनी वाढ अपेक्षित आहे. दोन दिवसांनंतर मात्र तापमानात काही प्रमाणात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. सध्या विदर्भात बहुतांश भागात ४२ ते ४४ अंशांवर तापमान असून, ते सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांनी अधिक आहे. पश्चिम-मध्य आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रातही तापमानात मोठी वाढ नोंदिवण्यात येत असून, या भागात ४० ते ४३ अंशांदरम्यान तापमान आहे. मराठवाडय़ाचा पारा ४० ते ४१ अंशांवरून आता ४२ ते ४३ अंशांच्याही वर पोहोचला आहे. मुंबई आणि परिसरात तसेतच कोकण विभागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी वाढले आहे.

वाढ कशामुळे?
राज्याच्या काही भागामध्ये सध्या दिवसाच्या कमाल तापमानात अचानकपणे वाढ झाली. हवामान विभागाच्या प्रमुख केंद्रांवर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आदी विभागांत सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांपुढे गेला आहे. उपकेंद्रांवर आणि तालुक्याच्या केंद्रांवरही तापमानातील वाढ मोठी आहे. ठाणे जिल्ह्यांत आणि मुंबई विभागात काही ठिकाणी यंदा अनेक वर्षांनंतर कमाल तापमान ४० ते ४४ अंशांवर नोंदिवले जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी सध्या निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान असल्याने मुळातच तापमानात वाढ आहे. त्यातच राजस्थानपासून महाराष्ट्राच्या जवळील गुजरात, मध्य प्रदेशामध्ये उष्णतेची लाट आहे. या भागातून कोरडे आणि उष्ण वारे महाराष्ट्राकडे येत आहेत. या दोन्हीचा परिणाम म्हणून तापमानात झपाटय़ाने वाढ नोंदवली जात आहे.

तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी चार पद्धती…
उष्णता अधिक असल्यास आपल्या शरीराचे तापमान खूप वाढल्याने किंवा कमी झाल्याने होणारे टाळण्यासाठी शरीराचे तापमान नियंत्रित करणारी एक वातानुकूलन प्रणाली कार्यरत असते. ती चार पद्धतीने शरीराचे तापमान कायम राखण्याचा प्रयत्न करते.

१. उत्सर्जन (रेडिएशन)- उन्हातून सावलीत आल्यावर शरीरातील उष्णता बाहेर पडते, तर थंडीत गरम शेकोटीने उबदार वाटते.

२. संक्रमण (कंडक्शन) – उन्हाळ्यात गार पाण्याने आंघोळ केल्यास पाण्याचा गारवा शरीराला मिळतो, तर हिवाळ्यात उबदार स्वेटरने थंडी कमी होते.

३. प्रवाही अभिसरण (कन्व्हेक्शन) -शरीरातील रक्तप्रवाहाद्वारे उष्णता मेंदूपासून दूर नेली जाते.

४. बाष्पीभवन (इव्हॅपोरेशन)- शरीरातील पाणी घामाच्या स्वरूपात बाहेर पडून त्याचे बाष्पीभवन होऊन आपल्याला गार वाटते.

शरीरातील तापमान नियंत्रण कार्यप्रणाली
शरीराचे अंतर्गत तापमान मेंदूतील हायपोथॅलॅमस नावाच्या भागाद्वारे होते. थंडीमध्ये हायपोथॅलॅमसकडून जाणाऱ्या संदेशामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्वचेची घर्मरंध्रे बंद होतात, काकडणे आणि कुडकुडणे सुरू होते आणि शरीरातील उष्णता कायम राखली जाते. याउलट उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान वाढल्यावर शरीराचे बाह्य़ तापमानही वाढते. या वेळेस हायपोथॅलॅमसकडून रासायनिक संदेश पाठवले जाऊन रक्तवाहिन्या प्रसरण पावू लागतात आणि बाह्य़ त्वचेखाली असलेल्या घर्मग्रंथी उत्तेजित होतात. त्यामुळे रक्तप्रवाहातील द्रव पदार्थ आणि क्षार वापरून घाम तयार होतो. या घामाचे बाष्पीभवन होऊन शरीराला थंडावा येतो. घाम येण्याच्या या प्रक्रियेत शरीरातील द्रव पदार्थ आणि पाणी तापमानानुसार अधिकाधिक वापरले जाऊन त्यांचा साठा कमी होत जातो. बाह्य़ उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होण्याच्या क्रियेला ‘हीट स्ट्रेस’ किंवा उष्णता तणाव म्हणतात.