Heatwave in India आतापर्यंत एप्रिल महिना कमालीचा उष्ण राहिला आहे. देशातील अनेक भागांत उष्णतेचा कहर झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील हवामान विभाग (IMD)नुसार, एप्रिल महिन्याच्या पहिल्या २६ दिवसांमध्ये देशातील बहुतांश भागांत पारा ४५ अंशाच्या पुढे गेला. दक्षिणेकडील राज्यांची स्थिती अतिशय वाईट आहे; तर उत्तरेकडील भागांत अद्याप उष्णतेची लाट आलेली नाही. यंदाचा एप्रिल महिना नेहमीपेक्षा अतिशय उष्ण होता. याचे नेमके कारण काय? कोणत्या परिस्थितीत IMD उष्णतेची लाट घोषित करते आणि एप्रिलमध्ये उष्णतेचा तडाखा किती होता? यावर एक नजर टाकू या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
देशातील कोणत्या भागात उष्णतेच्या लाटेचा धोका सर्वाधिक?
मध्य, उत्तर आणि द्वीपकल्पीय भारत म्हणजेच गुजरात व पश्चिम बंगालमध्ये पसरलेला भाग हा कोअर हीटवेव्ह झोन (CHZ) आहे. या भागात दरवर्षी उन्हाळ्याच्या हंगामात मार्च ते जून आणि कधी कधी जुलैमध्येही उष्णतेच्या लाटेची शक्यता असते. राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली, पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्रातील विदर्भ, गंगेच्या पश्चिम बंगालचा काही भाग, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशचा काही भाग व तेलंगणा हे सर्वाधिक उष्णप्रवण राज्ये किंवा प्रदेश आहेत.
हेही वाचा : एटीएमचा नवा कार्ड ट्रॅप घोटाळा; कफल्लक व्हायचं नसेल तर हे वाचाच
IMD कडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट कधी दिला जातो?
उन्हाचा तडाखा वाढतोय म्हणून उष्णतेची लाट घोषित केली जात नाही. तर, जेव्हा सामान्य भागातील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि डोंगरी भागातील व किनारपट्टीच्या प्रदेशातील तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदविण्यात येते, तेव्हा IMD उष्णतेची लाट घोषित करते. तापमान सामान्यतेपेक्षा सहा अंश सेल्सिअस वा त्यापेक्षा जास्त असल्यास तीव्र उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. भारतात उष्णतेच्या लाटेचा कालावधी हा मार्च ते जून असतो. विशेष म्हणजे यावेळी मार्च महिन्यातच ही लाट घोषित करण्यात आली आणि एप्रिल महिन्यापर्यंत तापमानात मोठी वाढ झाली.
यंदाचा एप्रिल महिना नेहमीपेक्षा उष्ण का होता?
एप्रिल महिन्यातील तापमान बघता, IMD ने पुढील महिन्यात देशाच्या मोठ्या भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. याची दोन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे २०२४ हे वर्ष एल निनोमुळे अधिक उष्ण आहे. एल निनो ही हवमानाशी संबंधित एक घटना आहे. मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा अधिक असते, तेव्हा अशी परिस्थिती उदभवते. त्यामुळे अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता निर्माण होते. २०२३ च्या मध्यात एल निनोची सुरुवात झाली आणि आता २०२४ मध्ये तापमान गेल्या वर्षीपेक्षाही उष्ण असणार आहे.
दुसरे कारण म्हणजे दक्षिणेकडील भागात आणि आग्नेय किनारपट्टीच्या भागातील अँटीसायक्लोन सिस्टीमदेखील अशा उष्णतेस कारणीभूत ठरते. अँटीसायक्लोन सिस्टीम हवेला पृथ्वीच्या दिशेने ढकलते. त्यामुळे वेगाने ढकलण्यात येणारी हवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर अधिक उष्णता निर्माण करते. अँटीसायक्लोन सिस्टीममुळे वाऱ्याचा प्रवाह जमिनीकडून समुद्राकडे येतो आणि त्यामुळे समुद्राकडून येणाऱ्या थंड वाऱ्याला अडथळा निर्माण होतो. समुद्राकडून येणार्या या थंड वार्यांमुळेच जमीन थंड होते. मात्र, अँटीसायक्लोन सिस्टीममुळे त्यात अडथळा येतो. एल निनो आणि अँटीसायक्लोनमुळे एप्रिलमध्ये विशेषतः पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक व महाराष्ट्रात तीव्र तापमानाची नोंद करण्यात आली.
एप्रिलमधील उष्णतेचा तडाखा
IMD नुसार, एप्रिल महिन्यातील चार दिवस (१, १०, ११ व १२) वगळता, देशाच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये उष्णतेची किंवा तीव्र उष्णतेची लाट आली. दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात आणि ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, सिक्कीम, बिहार, झारखंड व पश्चिम बंगालच्या मोठ्या भागांसह दक्षिण-पूर्व किनारपट्टीचा भाग सर्वांत जास्त प्रभावित झाला. ओडिशात १५ एप्रिलपासून; तर पश्चिम बंगालमध्ये १७ एप्रिलपासून उष्णतेच्या लाटेचे संकट आहे. केरळ आणि सिक्कीम भागातही उष्णतेच्या लाटेची नोंद करण्यात आल्यामुळे असे लक्षात येते की, CHZ च्या बाहेरील प्रदेशांमध्येही उन्हाळ्यात तापमान वेगाने वाढत आहे.
हेही वाचा : रस्त्यांवरचे खड्डे आपोआप भरणार; काय आहे ‘सेल्फ हीलिंग’ तंत्रज्ञान?
भूविज्ञान मंत्रालयातील माजी सचिव एम. राजीवन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “इंटर गव्हरमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजचा (IPCC) अहवाल आणि हवामान मॉडेल्सवरील अभ्यासातून हे स्पष्टपणे दिसून येते की, भारतातील उष्णतेच्या लाटा केवळ मर्यादित क्षेत्रांपर्यंतच न राहता; जिथे आजपर्यंत इतक्या तीव्र तापमानाची नोंद करण्यात आलेली नाही, तिथेही तीव्र तापमानाची नोंद करण्यात येत आहे.