मंगळवारी (१८ जून) दिल्लीमध्ये १९६९ पासून आतापर्यंतचे सर्वांत जास्त किमान तापमान म्हणजेच ३५.२ अंश सेल्सियस तापमान नोंदविले गेले आहे. हे तेव्हापासूनचे सर्वांत जास्त किमान तापमान असल्याने दिल्लीमध्ये सध्या अंगाची लाही लाही करणारी उष्णता जाणवत आहे. दिल्लीमध्ये दिवसा प्रचंड उकाडा असतो. त्यातही जून महिना प्रचंड उष्णतेचा ठरतो. अलीकडेच एकट्या जून महिन्यातच सात दिवसांच्या उष्णतेच्या लाटेची नोंद झाली आहे. रात्रीही उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होऊन उकाडा वाढणे ही एक नवी चिंता दिल्लीकरांना भेडसावत आहे. या महिन्यात आतापर्यंत शहरात सलग सहा उष्ण रात्री अनुभवायला मिळाल्या आहेत. १२ मे पासून दिवसा प्रचंड वाढणारे तापमान रात्रीदेखील ४० अंश सेल्सिअसच्या खाली आलेले नाही. आतापर्यंत १९६९ ते २०२४ या दरम्यान नोंदविण्यात आलेले सर्वांत जास्त किमान तापमान ३४.९ अंश सेल्सिअस होते. २३ मे १९७२ रोजी या तापमानाची नोंद झाली होती. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १९६९ च्या आधीच्या नोंदींचे विश्लेषण करण्यात आलेले नाही. त्यामुळे गेल्या मंगळवारी नोंद झालेले तापमान दिल्लीतील आतापर्यंतचे सर्वांत जास्त किमान तापमान आहे अथवा नाही, याबाबतची स्पष्टता नाही. फतेहाबाद व महेंद्रगड या हरियाणा राज्यातील दोन ठिकाणी सकाळी दिल्लीपेक्षा अधिक म्हणजेच अनुक्रमे ३५.४ अंश सेल्सिअस व ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा