Historical Significance of the Sannyasi Revolt: ब्रिटिशांविरोधातील स्वातंत्र्याचा संघर्ष त्यांच्या भारतातील आगमनापासूनच सुरू झाला आणि त्यांना या भूमीतून बाहेर फेकण्यासाठी अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केले. भारतातील समाजाच्या प्रत्येक घटकाने देशाच्या विविध भागांतून या परकीय आक्रमकांविरोधात लढा दिला आणि आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या संघर्षात भारतीय संन्यासीही मागे नव्हते, तेही नेहमीच देशाच्या समृद्ध परंपरा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सज्ज होते. १६६४ साली काशी विश्वनाथ मंदिराचे संरक्षण करण्यासाठी औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सैन्याचा पराभव करणारे किंवा १७५७ साली अफगाणांच्या लुटीपासून गोकुळ या पवित्र नगरीचे रक्षण करणारे नागा साधू असोत, भारतीय संन्यासी नेहमीच धर्माच्या रक्षणासाठी आघाडीवर होते.

१८ व्या शतकातील संन्याशांची क्रांती धर्मरक्षणाची साक्ष देते

१८ व्या शतकातील संन्यासी क्रांती ही भारतीय संन्याशांच्या धर्मरक्षणाच्या दृढतेची आणखी एक साक्ष आहे. ही चळवळ प्रामुख्याने उत्तर बंगालमध्ये घडली. ती दसनामी संन्याशांच्या नेतृत्वाखाली झाली. हे शैव संन्यासी आहेत आणि दसनामी परंपरेशी संबंधित आहेत. ही दसनामी परंपरा ८ व्या शतकात आद्य शंकराचार्यांनी स्थापन केली होती. आरण्य, आश्रम, भारती, गिरी, पर्वत, पुरी, सरस्वती, सागर, तीर्थ, वन हे दसनामी परंपरेतील दहा आदेश (दसनामी- दहा नावे) आहेत. या प्रत्येक आदेशाचा संबंध भारताच्या उत्तर, दक्षिण, पूर्व, आणि पश्चिम दिशांना आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या ज्योति मठ (जोशी मठ- बद्रीनाथ, उत्तराखंड), श्रृंगेरी मठ (कर्नाटक), गोवर्धन मठ (पुरी, ओडिशा), शारदा मठ (द्वारका, गुजरात) या चार मठांशी आहे. दसनामी साधू भगव्या रंगाचे कपडे आणि रुद्राक्षांची माळ धारण करतात. यामध्ये ‘नागा साधू’ कपडे परिधान करत नाहीत आणि धर्मरक्षणासाठी त्रिशूल किंवा तलवार घेतात. याशिवाय ते कमंडलू, लोखंडी सळई किंवा चिमटा बरोबर ठेवतात.

Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
Tahawwur Hussain Rana extradited to India
२६/११ हल्ल्यापूर्वी १५ दिवस तहव्वूर राणा मुंबईत; हेडलीच्या दोन ईमेलने कटातील सहभागाचा उलगडा
Santosh Deshmukh sister Priyanka chaudhari
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईत आक्रोश, बहिणीला अश्रू अनावर; म्हणाल्या, “माझा भाऊ राजा होता, त्याने आम्हाला…”
Indian state Rahul Gandhi
राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये एफआयआर, राजकीय स्टंट असल्याची काँग्रेसची टीका
(PTI Photo)
(PTI Photo)

अधिक वाचा: नागा साधू कोण आहेत? त्यांचा कुंभमेळ्याशी काय संबंध? त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण कसे केले?

संन्याशांना मिळणारे अनुदान आणि ब्रिटिशांविरोधातील संघर्ष

संन्याशांना जमीनदार आणि राजांकडून धन आणि जमिनीच्या स्वरूपात अनुदान मिळत असे. या अनुदानाला ‘संन्यासीउत्तर’ किंवा ‘शिवोत्तर’ म्हणत. ही जमीन विशेषतः शैव नागा साधूंना दिली जात असे. १७५७ साली प्लासीच्या युद्धात विजय मिळवल्यानंतर ब्रिटिशांनी बंगाल, बिहार आणि ओडिशावर पूर्णतः ताबा मिळवला होता. त्यांनी आपल्या मनमानी कारभाराला सुरुवात केली. ज्यात उच्च करआकारणी सामील होती. या कराला विरोध करणाऱ्या सामान्य लोकांना मारहाण केली जात असे. संन्यासी आंदोलन मुख्यतः बंगाल आणि बिहारमध्ये सुरू झाले. कारण ब्रिटिशांनी सर्वप्रथम या प्रदेशांवर आपला अंमल प्रस्थापित केला होता. ब्रिटिश भारतात आपले पाय घट्ट रोवू लागल्यावर संन्याशांनी हे पहिले मोठे आंदोलन सुरू केले. हा संघर्ष १७७० ते १८०० या ३० वर्षांच्या कालखंडात चालू राहिला. जो भारतीय इतिहासातील सर्वात दीर्घकालीन संघर्षांपैकी एक मानला जातो. १७७० साली ब्रिटिशांनी बंगालमधील अन्नधान्य लुटून ते कराच्या स्वरूपात गोळा करून इंग्लंडला पाठवले. त्यामुळे बंगालमध्ये अन्न टंचाई सुरु झाली. यालाच ‘१७७० चा बंगालचा महादुष्काळ’ म्हणून ओळखले जाते. यामागे अधिक करआकारणी हे मुख्य कारण होते. ज्यामुळे बंगालमध्ये दुष्काळाचा सामना करण्यासाठी लागणारे अतिरिक्त धान्य उरले नाही. या दुष्काळामुळे १० दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. जो तेथील स्थानिक लोकसंख्येच्या जवळपास १/३ भाग होता.

संन्याशांचा अन्यायाविरोधातील लढा

भारतीय संन्याशांनी या भूमीवरील लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उठाव केला आणि ब्रिटिशांना कडवी झुंज देण्यासाठी ते संघटित झाले. ब्रिटिशांच्या धोरणांचा थेट परिणाम होत असल्याने त्यांना शेतकरी, मजूर आणि जमीनदारांचा पाठिंबा मिळाला. या संन्याशांनी अनेक लढायांमध्ये ब्रिटिशांवर विजय मिळवला आणि त्यांच्या करसंकलनावरही मोठा परिणाम झाला. या संघर्षासाठी अनेक अज्ञात संन्याशांनी मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिले आणि ब्रिटिशांचे अत्याचार सहन केले. फक्त संन्याशांनीच नव्हे, तर संन्यासिनींनीही या परकीय आक्रमकांशी कडवी झुंज दिली. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीत म्हणतात की, “त्या काळातील संन्यासी हे सध्याच्या काळातील संन्यासांसारखे नव्हते. ते संघटित, शिकलेले, बलवान, युद्धकलेत प्रशिक्षित,अनेक गुण व कौशल्यांनी परिपूर्ण होते. एका प्रकारे ते बंडखोर होते. ज्यांनी महसूल लुटून विरोध केला होता.”आनंदमठामध्ये कॅप्टन कुक या ब्रिटिश बटालियनचा अधिकारी आणि संन्यासिनी शांतिदेवी यांच्यातील संवादाचा उल्लेख आहे. कॅप्टनने शांतिदेवीचा अपमान केला आणि तिच्याशी लग्न करण्याची मागणी केली. त्यावर ती शूर संन्यासिनी म्हणाली, “मी त्या संन्याशाची पत्नी आहे, ज्याच्याशी ब्रिटिश युद्धासाठी आले आहेत. जर तू हे युद्ध जिंकलास, तर मी तुझी ठेव होईन.” पुढे थॉमस आणि त्याची बटालियन या संन्याशांकडून पराभूत झाली आणि थॉमसचा मृत्यू झाला.

संन्याशांच्या प्रभावाचे पुरावे

संन्याशांच्या प्रभावाचे पुरावे तत्कालीन बंगालच्या गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज यांच्या पत्रांतून मिळतात. २ फेब्रुवारी १७७३ रोजी जॉर्ज कोलब्रूक यांना लिहिलेल्या पत्रात हेस्टिंग्ज म्हणतात की, “संन्यासी ३००० ते १०,००० च्या संख्येने जगन्नाथच्या तीर्थयात्रेसाठी येतात. संन्याशांनी परगणा सेपॉयचा पराभव करून दोन कमांडिंग ऑफिसरला ठार केल्यानंतर ब्रिटिशांना त्यांच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमधील महसूल गोळा करण्यात अडथळा आला. यामुळे ब्रिटिशांनी प्रांतांच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अधिक सैन्य तैनात केले.

वॉरेन हेस्टिंग्ज यांचे संन्याशांबद्दलचे आश्चर्य

९ मार्च १७७३ रोजी जोसिस डू प्रे यांना लिहिलेल्या पत्रात हेस्टिंग्ज यांनी संन्याशांच्या कार्यपद्धतीबद्दल आपले आश्चर्य व्यक्त केले आहे. ते लिहितात की,“हे लोक ना कपडे घालतात, ना त्यांच्याकडे गाव किंवा कुटुंब आहे. तरीही ते ‘हिंदुस्थानातील सर्वात मजबूत आणि सक्रिय पुरुष’ आहेत.” या पत्रात त्यांनी नमूद केले की, भारतातील सर्व जाती संन्याशांचा मोठा आदर करतात. त्यामुळे ब्रिटिशांचा कठोर आदेश आणि शिक्षा असूनही कोणीही त्यांच्या हालचालींबाबत माहिती दिली नाही. हे संन्यासी जणू स्वर्गातून अवतरल्याप्रमाणे अचानक प्रांताच्या मध्यभागी प्रकट होत. ‘अॅनल्स ऑफ रुरल बंगाल’मध्ये नमूद आहे की, संन्याशांनी कमांडिंग ऑफिसर कॅप्टन थॉमस आणि त्याच्या संपूर्ण बटालियनला पराभूत केल्यानंतर त्याचा उत्तराधिकारी नाखुशीने सैन्यात सामील झाला आणि त्यालाही तीच परिणती भोगावी लागली. त्यानंतर आणखी चार बटालियन पाठवण्यात आल्या परंतु त्या देखील संन्याशांना पराजित करू शकल्या नाहीत. बंगालमध्ये असे हल्ले दरवर्षी होत असत आणि त्यामुळे ब्रिटिशांच्या महसूल गोळा करण्यावर नकारात्मक परिणाम झाला.

अधिक वाचा: Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील सत्य नेमके काय?

(PTI Photo)
(PTI Photo)

क्रांतीच्या स्मृती आजही जिवंत

सिलीगुडीतील बाऊ काली शिव मंदिर हे एकेकाळी या क्रांतीचे केंद्र होते. जिथे एक आदरणीय संन्यासी बाबा त्यांच्या रथातून येत आणि लोकांना स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्यासाठी प्रेरित करत. या भागात एकेकाळी जंगल होते. जिथे त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने एक शिव मंदिर स्थापन केले. तेथून त्यांनी लोकांना सनातन धर्माची शिकवण दिली. ते काही वेळेस अनेक दिवसांसाठी अचानक नाहीसे होत आणि पुन्हा प्रकट होऊन लोकांना ब्रिटिशांविरोधातील सुरू असलेल्या प्रखर संघर्षाची माहिती देत. अनेकदा ब्रिटिश पोलीस त्यांच्या चौकशीसाठी गावात येत पण गावकऱ्यांनी त्यांच्याबद्दल कधीच कोणतीही माहिती दिली नाही. जेव्हा गावकऱ्यांना समजले की, हे संन्यासी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी लढत आहेत. तेव्हा त्यांचा संन्याशांप्रती आदर अधिकच वाढला. गावकरी त्यांना शक्य ते सर्व प्रकारे मदत करत. गावकऱ्यांनी नंतर त्यांच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधले आणि त्यांची मूर्ती स्थापित केली.

संदर्भ:

Hunter, W. W. (1868). Annals of Rural Bengal.
Gleig, G. R. (1857). Memoirs of the Life of Warren Hastings, Volume I.
Chatterjee, Bankimchandra (1882). Anandamath.
Thomas, M. E. (1773). Letters to the Board of Control.
Warren Hastings’ Correspondence (1773).

Story img Loader