तो एक रोजसारखाच सामान्य दिवस होता… ६ ऑगस्ट १९४५.. जपानच्या हिरोशिमा या शहरात दिवसाची सुरुवात होत होती. रस्त्यावर कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांची लगबग होती. आणि अचानक सकाळच्या निरभ्र आकाशात काहीतरी घोंगावू लागलं.. ते घोंगावणार नेमकं काय आहे हे कळायच्या आतच एक भला मोठा कानठळ्या बसवणारा आवाज झाला. आणि एकच हलकल्लोळ झाला. बरोबर ८ वाजून १५ मिनिटांनी एनो’ला गे ने’ नामक अमेरिकन विमानाने हिरोशिमावर “लिटल बॉय” हे टोपण नाव असलेला युरेनियम-२३५ गन – असेंबली हा पहिला अणुबॉम्ब टाकला. आणि बघताक्षणी संपूर्ण हिरोशिमा हे शहर बेचिराख झाले. या बॉम्ब हल्ल्यात तात्काळ सुमारे ८० हजार लोकं मृत्युमुखी पडले. “बॉम्बचा प्रभाव इतका भयानक होता की स्फोटामुळे निर्माण झालेल्या प्रचंड उष्णता आणि दाबामुळे सर्व सजीव प्राणी – मानव- झाडं अक्षरशः होरपळून निघाली” असे वृत्तांकन टोकियो रेडिओने स्फोटानंतर केले होते. तसेच १९४५ च्या गार्डीअन (The Guardian) मध्ये या प्रसंगाचे भयावह वर्णन प्रकाशित झाले होते. “सर्व मृत आणि जखमी ओळखण्यापलीकडे होरपळले होते. जे घराबाहेर होते ते जळून मरण पावले, तर घरात असणारे लोक दाब आणि उष्णतेने मारले गेले.” हे नुकसान इथेच संपले नाही. स्फोटातून निघणाऱ्या किरणोत्सारामुळे त्रास नंतरही होत राहिला.
मॅनहॅटन प्रकल्पाच्या ऊर्जा विभागाच्या ऐतिहासिक अहवालानुसार, त्यानंतरच्या वर्षांमध्ये बॉम्ब स्फोटातील जखमींच्या जखमा, किरणोत्सारामुळे आजार आणि कर्करोगामुळे आणखी हजारो लोक मरण पावले, ज्यामुळे मृत्युमुखींचा आकडा जवळपास दोन लाखांवर पोहचला. हे झाले जिवंत लोकांचे- प्राण्यांचे.. या बॉम्ब हल्ल्यात हिरोशिमा शहरातील सगळ्या वास्तू- इमारती एका क्षणातच उध्वस्त झाल्या मागे राहिले ते केवळ राखेचे ढिगारे ! .. अशा स्थितीत एक वास्तू तग धरून उभी होती.. आणि आहे … आपल्या भग्न अस्तित्त्वातून आजही या शहराची शोकांतिका सांगत आहे. ही वास्तू म्हणजे गेनबाकू डोम.
६ ऑगस्ट १९४५ रोजी ज्या भागात पहिला अणुबॉम्बचा स्फोट झाला त्या भागात गेनबाकू डोम ही एकमेव उभी इमारत शिल्लक राहिली. हीच वास्तू आज हिरोशिमा पीस मेमोरियल म्हणून ओळखली जाते. याशिवाय अणुबॉम्ब डोम किंवा ए-बॉम्ब डोम या दोन नावांनी देखील ही वास्तू प्रसिद्ध आहे. “गेनबाकू” म्हणजे जपानी भाषेत अणुबॉम्ब. सध्या गेनबाकू डोम जपानमधील ‘हिरोशिमा पीस मेमोरियल पार्कचा’ एक भाग आहे. युनेस्कोने १९९६ साली गेनबाकू डोमला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. हिरोशिमा पीस मेमोरियल या वास्तूची मूळची ओळख हिरोशिमा प्रीफेक्चरल इंडस्ट्रियल प्रमोशन हॉल अशी होती. या हॉलचे भग्न अवशेष आण्विक युद्धाच्या विध्वंसक परिणामांची आठवण म्हणून या जतन करण्यात आलेले आहे.
अधिक वाचा : इंग्रज ताजमहाल चोरून नेणार होते? इतिहासातील पुरावे काय सांगतात?
मूळ वास्तूची निर्मिती
गेनबाकू डोम किंवा Product Exhibition Hall या इमारतीची रचना मूलतः चेक आर्किटेक्ट ‘जॅन लेटझेल’ यांनी केली होती. या रचनेमध्ये इमारतीच्या शीर्षस्थानी एक विशिष्ट घुमट समाविष्ट होता. या इमारतीचे बांधकाम १९१५ साली एप्रिल महिन्यात पूर्ण झाले होते आणि या इमारतीला हिरोशिमा प्रीफेक्चरल कमर्शियल एक्झिबिशन (HMI) असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये ही इमारत औपचारिकपणे लोकांसाठी खुली करण्यात आली होती. १९२१ साली, या वास्तूचे नाव बदलून ‘हिरोशिमा प्रीफेक्चरल प्रॉडक्ट्स एक्झिबिशन हॉल’ असे करण्यात आले आणि पुन्हा १९३३ मध्ये ‘हिरोशिमा प्रीफेक्चरल इंडस्ट्रियल प्रमोशन हॉल’ असे करण्यात आले होते. ही इमारत ‘Aioi’ ब्रिजच्या शेजारी मोठ्या व्यावसायिक जिल्ह्यात स्थित होती तसेच या एक्झिबिशन हॉलचा वापर कला आणि शैक्षणिक प्रदर्शनांसाठी केला जात होता.
अणुबॉम्बस्फोट आणि गेनबाकू डोम
दुसऱ्या महायुद्धादरम्यान, ६ ऑगस्ट १९४५ रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी, युद्धात वापरण्यात येणारा पहिला अणुबॉम्ब हिरोशिमावर टाकण्यात आला. या बॉम्बमध्ये १५ हजार टन टीएनटी इतकं सामर्थ्य होतं. हिरोशिमाच्या दक्षिणेकडे होन्शू हे एक महत्त्वाचे बंदर होते, त्यामुळेच अणुबॉम्ब टाकण्यासाठी हिरोशिमा हे लक्ष्य म्हणून निवडले गेले आणि शहरात ४० हजार लष्करी जवानांसह जपानी द्वितीय जनरल आर्मीचे मुख्यालय होते,आणि हे एकमेव मोठे शहर होते ज्यात POW कॅम्प नसल्याची माहिती होती. Aioi ब्रिजच्या उद्देशाने, बॉम्बचे लक्ष्य ठरविण्यात आले होते, परंतु २४० मीटरने (७९० फूट) लक्ष्य चुकले आणि बॉम्बचा स्फोट थेट शिमा हॉस्पिटलवर झाला, जे गेनबाकू डोमच्या अगदी जवळ होते. स्फोटाचे केंद्र डोमपासून १५० मीटर (४९० फूट) आडवे आणि ६०० मीटर (२००० फूट) उभे होते. या स्फोटात गेनबाकू डोम इमारतीतील सर्वजण तात्काळ मृत्युमुखी पडले. इमारतीची रचना भूकंप-प्रतिरोधक असल्याने इमारतीचा ढाचा टिकून राहू शकला.
अधिक वाचा : व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … कथा घुंगरांच्या सामर्थ्याची ! (भाग १)
गेनबाकू डोमचे संवर्धन
गेनबाकू डोमच्या दगडी आणि पोलादी संरचनेमुळे, ही इमारत बॉम्बच्या हायपोसेंटरजवळ शिल्लक राहिलेल्या काही संरचनांपैकी एक होती. सुरुवातीच्या काळात इमारत पडण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अनेकांना ही इमारत पाडून टाकायची होती, दुष्ट आठवणी पुसून टाकायच्या होत्या, तर काहींना बॉम्बस्फोटाचे स्मारक आणि शांततेचे प्रतीक म्हणून ते जतन करायचे होते. सरतेशेवटी, जेव्हा हिरोशिमाची पुनर्बांधणी सुरू झाली तेव्हा इमारतीचे सांगाडे जतन केले गेले. १९५० ते १९६४ या कालखंडा दरम्यान, घुमटाभोवती हिरोशिमा पीस मेमोरियल पार्कची स्थापना करण्यात आली. हिरोशिमा सिटी कौन्सिलने १९६६ सालामध्ये गेनबाकू डोमच्या कायमस्वरूपी जतन करण्याचा ठराव स्वीकारला, ज्याला अधिकृतपणे हिरोशिमा पीस मेमोरियल (गेनबाकू डोम) असे नाव देण्यात आले. या इमारतीचा घुमट हे उद्यानाची महत्त्वाची ओळख आहे. हिरोशिमाचे पहिले लोकप्रिय निवडून आलेले महापौर, शिन्झो हमाई (१९०५-१९६८) यांनी या इमारतीच्या जतनासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. यासाठी त्यांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या वास्तूला संरक्षण देण्यासाठी निधीची मागणी केली. टोकियोच्या एका प्रवासादरम्यान, हमाईनी थेट राजधानीच्या रस्त्यावर निधी गोळा करण्याचा प्रयोग केला. त्यांच्या कारकिर्दीत १९६७ साला मध्ये गेनबाकू घुमटाचे जतन करण्याचे काम पूर्ण झाले. नंतरच्या काळातही या इमारतीच्या संवर्धनासाठी संवर्धन प्रकल्प राबविण्यात आले होते. ६ ऑगस्ट १९४५ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर ही गेनबाकू घुमट तसाच उभा आहे. संरचनेची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी अवशेषांमध्ये केलेले बदल कमीत कमी आहेत.
युनेस्को जागतिक वारसा स्थळ
डिसेंबर १९९६ मध्ये, गेनबाकू घुमट जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा संरक्षणाच्या अधिवेशनावर आधारित युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंदवण्यात आला. युनेस्कोच्या यादीत त्याचा समावेश विनाशकारी शक्ती (अणुबॉम्ब), मानवी लोकसंख्येवर आण्विक शस्त्रांचा पहिला वापर आणि शांततेचे प्रतीक म्हणून त्याचे प्रतिनिधित्व यावर आधारित आहे.