History rewriting in India सध्या इतिहास आणि संस्कृती हा विषय प्रामुख्याने चर्चेत आहेत. या विषयांची लोकांमधील आवड म्हणूनच नव्हे तर राजकीय, सामाजिक अशा सर्वच पातळीवर भारतीय संस्कृती आणि इतिहास महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारताचा इतिहास नेमका काय होता, हा नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे. बहुतांश सगळ्यांनाच या प्राचीन भूमीला हजारो- लाखो वर्षांचा इतिहास असल्याची चांगलीच कल्पना आहे. किंबहुना म्हणूनच हा इतिहास चर्चेचा ठरला आहे. एकीकडे समृद्ध म्हणावं तर दुसरीकडे गरीब- अशिक्षितांचा इतिहास अशी काहीशी गत या देशाच्या बाबतीत आहे. त्यामुळे नक्की याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावं हा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. याच प्रश्नाचा शोध आणि भारतीय इतिहासाबद्दल अशी द्विधा परिस्थिती का निर्माण झाली असावी? याचे उत्तर धुंडाळण्याचा प्रयत्न शोनालीका कौल यांनी ‘भारत बिफोर द ब्रिटिश अँड अदर एसेज: टुवर्डस अ न्यू इंडोलॉजी’ या आपल्या नव्या पुस्तकात केला आहे. शोनालीका कौल या पुस्तकात भारतीय समुदायाचे आकलन करण्यासाठी पुराकथांचा महत्त्वपूर्ण वाटा कसा आहे हे स्पष्ट करतात आणि काश्मीरच्या भारताशी असलेल्या ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधांचा शोध घेतात.

शोनालीका कौल कोण आहेत?

इतिहासकार शोनालीका कौल या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात इतिहास या विषयाच्या प्राध्यपिका आहेत. त्यांनी इतिहासलेखनाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात Bharata Before the British and other essays – Towards A New Indology, कौल यांनी १९ व्या शतकापासून भारताच्या इतिहासावर जे लेखन झालेले आहे त्याचा धांडोळा घेतला आहे. शिवाय आधुनिक भारतीय राजकारणातही हा विषय मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ठरला आहे. त्या त्यांच्या पुस्तकात असा युक्तिवाद करतात की, भारताच्या इतिहासाकडे पाहताना वसाहतवादी दृष्टिकोनांचा व्यापक वापर करण्यात आला आहे. किंबहुना भारतीय साहित्यिक स्रोतांकडे त्याच नजरेतून पाहिले गेले आहे. पाश्चात्त्यांनी त्यांच्या खेरीज इतर समाजांना वेगळ्या-अनभिज्ञ दृष्टिकोनातून पाहिले.

Badalta Bharat Paratantryatun mahasattekade
वैचारिक साहित्यात मोलाची भर
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
sandha badaltana manprasthashram
सांधा बदलताना : मन:प्रस्थाश्रम
2000-year-old underwater 'Indiana Jones' temple discovered
2,000-year-old temple:समुद्राखाली सापडलेले २००० वर्षे प्राचीन मंदिर कोणता इतिहास सांगते?
Loksatta article Justice Dhananjay Chandrachud out of court statement
न्याय की देवाचा कौल?
nirmalatai vitekar
पाथरी मतदारसंघात ‘विटेकर विरुद्ध वरपूडकर’ जुनाच सत्तासंघर्ष नव्या रूपात
Nanand Bhabhi Relation
Nanand Babhi Relation : “भारतीय समाजात नणंद-भावजयांचं नातं खास”, न्यायाधीशांकडून मिश्किल टीप्पणी!
How Pune’s Nagarkar Wada withstood a century yet faces neglect today
Nagarkar Wada : पुण्यातल्या नगरकर वाड्याची शंभरी, कधीकाळी दिमाख पाहिलेल्या वास्तूची अवकळा, ‘पुढे धोका आहे!’ चा फलक वेधतोय लक्ष

भारताविषयी झालेल्या इतिहास लेखनाचा पुनर्विचार करणे अत्यावश्यक

शोनालीका कौल आपल्या नव्या संशोधनात भारताविषयी प्रचलित असलेल्या शैक्षणिक ठोकताळ्यांना आणि जगभरातील भारताच्या इतिहासाविषयीच्या समजुतींना आव्हान देतात. त्या भारतीय इतिहासाचे नव्या दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात तसेच विद्यमान शैक्षणिक विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. कौल असा युक्तिवाद करतात की, वसाहतवादी लेखकांनी भारताची गणना अशा देशांमध्ये केली, ज्यांना इतिहास काय असतो याची कल्पनाच नाही. हे करत असताना भारतीय समाजाची तुलना पाश्चात्त्य समाजाबरोबर केली. पाश्चात्त्य समाजाला इतिहासाची योग्य ती जाणीव आहे. इतिहासातील वास्तव, कालक्रम यांची समज आहे. त्या म्हणतात की, स्वातंत्र्यानंतरही हा समज प्रचलित राहिल्यामुळे अनेक प्राचीन भारतीय साहित्यकृतींना पुराणकथा समजले गेले. परिणामी, त्यांना इतिहासकारांसाठी फारसे महत्त्वाचे मानलेच नाही किंवा त्यांना समाजातील सामाजिक उच्चवर्गीयांचा दृष्टीकोन पसरवण्यासाठी वापरलेले एक साधन मानले गेले.

अधिक वाचा: Snake Species Named After Leonardo DiCaprio: टायटॅनिकच्या हिरोचं नाव भारतीय सापाला; काय आहे या दोघांमध्ये संबंध?

शोनालीका कौल या दृष्टिकोनाला आव्हान देतात आणि असा युक्तिवाद करतात की, पुराणकथा म्हणजे समाजाने स्वतःला आणि त्यांच्या जगाला समजून घेण्यासाठी वापरलेली सामुदायिक यंत्रणा आहे. यामुळे त्या पुराणकथा कुठल्याही समाजासाठी अर्थनिर्मिती आणि परिचय निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. कौल म्हणतात की, शास्त्रीय इतिहासलेखनाने सत्याचा शोध घेताना पुराणकथांकडे दुर्लक्ष केले. आणि हीच पद्धत वसाहतवादी साम्राज्याची ताकद ठरली. पाश्चात्त्य समाजाकडे इतिहास आहे, तर अपाश्चात्त्य समाजांकडे केवळ पुराणकथा आहेत हीच बाब बिंबवण्याचा आली. शोनालीका कौल रामायणासारख्या महाकाव्यांच्या विश्लेषणावरही प्रश्न विचारतात. रामायणाच्या विश्लेषणात आर्य-आर्येत्तर देण्यात येणाऱ्या संकल्पनेवर त्यांचा आक्षेप आहे. कौल असा युक्तिवाद करतात की, पुराकथांना प्रादेशिक स्वरूप देण्यात आले आहे, त्यामुळे त्या ऐतिहासिक नाही असा दावा करणे चुकीचे आहे.

अखिल भारतीय समुदाय

बेनिडिक्ट अँडरसन, एरिक हॉब्सबॉम, अर्नेस्ट गेल्नर यांसारख्या विद्वानांच्या राष्ट्रवादाच्या सिद्धांतांमध्ये राष्ट्रवाद आणि राष्ट्र-राज्ये यांना आधुनिक घटना मानले जाते. अँडरसन यांच्या मते, भारतातील राष्ट्रवाद पाश्चात्त्यांकडून घेतलेली एक विचारप्रणाली आहे. ब्रिटिश राज्य आणि त्याबरोबर आलेली वसाहतवादी आधुनिकता ही देशाला प्रशासकीयदृष्ट्या एकत्रित आणणारी मानली जाते. या विद्वत्तेच्या परंपरेनुसार भारत एक आधुनिक घटना आहे. ज्याचे स्वरूप वसाहतवादी काळानंतर बदलत गेले.

ज्ञानेंद्र पांडे यांनी म्हटले आहे की, पूर्व-आधुनिक काळात अखिल भारतीय समुदाय अशी भावना भारतीयांमध्ये नव्हती. शोनालीका कौल या दृष्टिकोनाला आव्हान देतात आणि असा युक्तिवाद करतात की, भारतात “अखिल भारतीय भावना व्यक्त करणारा समुदाय” ही संकल्पना हजारो वर्षांपासून अस्तित्वात होती. त्या आधुनिक राष्ट्र-राज्य या संकल्पनेपासून याला वेगळे ठरवतात. कारण आधुनिक राष्ट्र-राज्य हा जगभरातील एक अलीकडचा राजकीय संकल्पनेचा प्रकार आहे. मात्र, त्या ठामपणे सांगतात की, उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला समुद्रांनी बद्ध असलेला एक समुदाय म्हणून भारताच्या अस्तित्वाची कल्पना अनेक ऐतिहासिक स्रोतांमध्ये वारंवार दिसून येते. यामध्ये महाभारत, पुराणे, तामिळ संगम साहित्य, परदेशी प्रवाशांची साक्ष, जसे की अल बेरुनी, अमीर खुसरो आणि अबुल फजल यांसारख्या लेखकांच्या लेखनाचा समावेश आहे. इतिहासकारांना आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि जनसंपर्कामुळे समाजांमध्ये झालेल्या बदलांची तीव्र जाणीव आहे. मात्र, शोनालीका कौल म्हणतात की, याचा अर्थ असा होत नाही की भारतात हजारो वर्षांपासून अशी भावना व्यक्त करणारा समुदाय नव्हता.

संस्कृत ऐतिहासिकदृष्ट्या उच्चवर्गीय नव्हे

शोनालीका कौल व्यावसायिक इतिहासलेखनातील अजून एका प्रचलित समजुतीला छेद देतात. संस्कृत ही उच्चवर्गीय आणि बहिष्कृत भाषा होती, तर प्राकृत ही सामान्य जनतेची बोलीभाषा होती. कौल म्हणतात की, याच्या उलट संस्कृतचा वापर विचारांचा व्यापक प्रसार करण्यासाठी सार्वजनिक नाटकांमध्ये केला जात असे आणि त्यात अनेकदा परंपरेला आव्हान देणारे विषय असत. शोनालीका कौल ठामपणे सांगतात की, संस्कृतमध्ये काहीही मूलतः पंथीय किंवा वर्चस्ववादी नाही. त्या पुढे म्हणतात, कालीदास किंवा शूद्रक यांचे वाचन केल्यावर लक्षात येते की संस्कृत साहित्यिक सत्याचा पाठपुरावा करत होते, तर बिल्हण आणि कल्हण यांच्याकडून सर्वशक्तिमान राजांविषयी त्यांचा तिरस्कार जाणवतो.

अधिक वाचा: Owl Trafficking: लक्ष्मीचं वाहन घुबड परंतु दिवाळीच ठरतेय घुबडांसाठी अशुभ; नक्की काय घडतंय?

कौल असेही सांगतात की, अनेक संस्कृत ग्रंथांनी सामाजिक ढोंगीपणाची चेष्टा केली आहे आणि त्यावर कठोर टीका केली आहे. यामुळे त्या डी. डी. कोसंबी यांच्या ‘संस्कृत लेखक हे श्रेष्ठवर्गीयांचे घरटे होते’ या मताला आव्हान देतात. त्या असंही सांगतात की, भारतातील नाट्यकलेवरील सर्वात प्राचीन संस्कृत ग्रंथ ‘नाट्यशास्त्र’ स्पष्टपणे सांगतो की, संस्कृत नाटके सणांदरम्यान आणि इतर प्रसंगी सार्वजनिक ठिकाणी, जसे की मंदिरे आणि शहराच्या चौकात सादर केली जात असत. या ग्रंथात नाटकाला समाजातील सर्व वर्गांसाठी पाचवे वेद म्हटले आहे, असे कौल नमूद करतात. कौल लक्षात आणून देतात की, ‘नाट्यशास्त्र’ म्हणते की संस्कृत नाटकात क्लिष्ट किंवा दुर्बोध शब्दांचा वापर टाळला पाहिजे. त्या नमूद करतात की, संस्कृत आणि प्राकृत भाषेचा वापर अनेकदा एका नाटकात एकत्रितपणे केला जात असे.

काश्मीरचे भारताशी सांस्कृतिक संबंध

प्राचीन काश्मीरच्या इतिहासात विशेष प्रावीण्य असलेल्या शोनालीका कौल यांनी काही अध्याय काश्मीरच्या भारताशी असलेल्या ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधांना समर्पित केले आहेत. त्या काश्मीरचा इतिहास अनन्य आणि इतर भागांपासून वेगळा होता या धारणेवर प्रश्न उपस्थित करतात. कौल पुरातन ते मध्ययुगीन काळातील पुरावे सादर करतात, ज्यातून हे सिद्ध होते की काश्मीरला नेहमीच ‘भावना व्यक्त करणाऱ्या भारतीय समुदायाचा’ एक भाग म्हणून पाहिले गेले आहे. त्या दाखवून देतात की इ.स.पू. ६ व्या शतकाच्या सुमारास काश्मीरमध्ये आढळलेली मातीची भांडी गंगा खोऱ्यातील भांड्यांप्रमाणेच आहेत; संस्कृत ही काश्मीरमध्ये वापरली जाणारी सर्वात प्राचीन ऐतिहासिक भाषा होती; काश्मीरी भाषा ही इन्डो-आर्यन भाषांच्या गटाशी संबंधित होती; आणि काश्मीरमधील शारदा ही लिपी ब्राह्मीपासून विकसित झाली होती. शोनालीका कौल दुःख व्यक्त करतात की, आधुनिक राजकीय परिस्थितीमुळे काश्मीरचा भारताशी असलेल्या सखोल सांस्कृतिक संबंधांकडे अनेक संशोधकांनी दुर्लक्ष केले आहे. त्या प्राचीन आणि मध्ययुगीन काश्मीरच्या संदर्भात पुराव्यांचे विस्तृत विश्लेषण सादर करतात, जे त्यांच्या या मुद्द्याला बळकटी देते की, काश्मीरचा इतिहास भारताच्या सांस्कृतिक परंपरेशी घट्टपणे जोडलेला होता.

वास्तविक मेहनतीचे योग्य मूल्यमापन होत नाही

आपल्या पुस्तकाच्या शेवटी, शोनालीका कौल यांनी इतिहासलेखनावर काही अध्याय लिहिले आहेत. ज्यात त्या फक्त भारताच्या अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या पाश्चात्त्य दृष्टिकोनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत, तर भारतातील इतिहासकारांच्या डाव्या आणि उजव्या विचारसरणीतील स्पष्ट विभाजनावरही विचार मांडतात. त्या भारतीय शैक्षणिक क्षेत्रावर असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रभावावर टीका करतात आणि API (Academic Performance Indicator) प्रणालीवर नाराजी व्यक्त करतात. त्यांच्या मते, ही प्रणाली मूळ तर्कांनी युक्त पुस्तके लिहिण्याऐवजी केवळ API गुण वाढवणाऱ्या जर्नल्समध्ये पेपर्स प्रकाशित करण्यावर भर देते. ज्यामुळे वास्तविक मेहनतीचे योग्य मूल्यमापन होत नाही.