From Egypt to Mohenjo-Daro Ajrakh: भारताच्या कच्छ प्रदेशात अनेक पिढ्यांपासून चालत आलेली एक पारंपरिक हस्तकला म्हणजे अजरक/अज्रख कापडाची निर्मिती. अजरक कापड त्याच्या गुंतागुंतीच्या नक्षी आणि गडद निळ्या रंगासाठी प्रसिद्ध आहे. “अजरक/अज्रख केवळ एक कापड नाही तर ते कच्छच्या सांस्कृतिक जीवनाचे प्रतीक आहे,” असे सोनिपतच्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाइन येथील फॅशन विभागाचे प्राध्यापक जॉन वर्गीस यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अधिक वाचा: History of Bandhani: सिंधू संस्कृती ते अजिंठा; पाचहजार वर्षांच्या बांधणी-गाठी उलगडतात तेव्हा!
या कलेचा उगम नेमका कुठला? Origin of Ajrakh belong to Indus Valley Civilization
अजरक/अज्रखचा या कलेचा उगम इजिप्तमध्ये झाला की, सिंधू संस्कृतीत याबद्दल आजही चर्चा होते. गुजरातमधील अजरक छपाईचे कापड इजिप्तमधील जुन्या काहिराजवळील अल-फोस्तत येथील उत्खननात सापडले आणि या चर्चांना उधाण आले. किंबहुना उत्खननात सापडलेलं कापड ११ नोव्हेंबर २०१७ ते १८ फेब्रुवारी २०१८ या कालखंडादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई येथे आयोजित केलेल्या ‘इंडिया अँड द वर्ल्ड’ प्रदर्शनातही प्रदर्शित करण्यात आले होते. मोहेंजोदारोमध्ये सापडलेल्या प्रिस्टच्या मूर्तीत दिसणारे कापड अजरकचे एक जुने रूप मानले जाते, असे पर्ल अकादमी, बंगळुरू येथील फॅशन अँड टेक्सटाईलच्या सहाय्यक प्राध्यापिका जे. उषा राणी यांनी सांगितले.
अज्रख शब्दाचा उगम/Origin of the word Ajrakh
अज्रख/अजरक या शब्दाचा उगम वादग्रस्त आहे. अझ्रक या अरबी शब्दावरून अज्रख शब्दाची व्युत्पत्ती झाली असावी असे मानले जाते. अझ्रकचा अर्थ निळा असा आहे. हा संदर्भ या कापडात वापरल्या जाणाऱ्या निळ्या रंगांशी जोडला जातो. या निळ्या रंगामुळेच या कापडाचा संबंध सिंधू संस्कृतीपर्यंत मागे नेता येतो असे प्राध्यापक वर्गीस यांनी सांगितले. भारतीय भूमीवर या कलेच्या पुनरागमनाचे श्रेय मात्र राजा राव भर्मलजी यांना दिले जाते. सुमारे ४०० वर्षांपूर्वी कच्छचा शासक राव भर्मलजी यांच्या आश्रयाखाली खत्री समुदायाच्या स्थलांतराबरोबर ही कला पुन्हा भारतात आली, असे उषा यांनी सांगितले. “१६ व्या शतकापर्यंत, अजरक मुद्रित कापडाची कला जागतिक फॅशन ट्रेंड ठरली. ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून अजरकला पश्चिमेकडे निर्यात करण्यास सुरुवात केली, त्यामुळे या कलेच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला गेला,” असे उषा यांनी स्पष्ट केले.
अजरक कापडाची निर्मिती कशी केली जाते?
ही एक प्राचीन, श्रमप्रधान हस्तकला आहे. यात अनेक टप्प्यांचा समावेश होतो असे ‘द हाऊस ऑफ आरा’ या ब्रँडच्या सह-संस्थापक अवनी करण चंदन यांनी सांगितले.
१. साज: अजरकच्या निर्मितीसाठी प्रथम कापड धुवून त्यावरील स्टार्च काढून टाकला जातो. कापडाला उंटाचे शेण, सोडा अॅश आणि एरंडेल तेलाच्या द्रावणात भिजवून, पिळून, रात्रभर ठेवले जाते. ते अर्धवट वाळवले जाते आणि ही प्रक्रिया सात ते आठ वेळा पुन्हा केली जाते. नंतर रंगकामासाठी मायरोबलन (myrobalan) द्रावणाचा वापर करून कापड धुतले जाते.
२. गच: या टप्प्यावर, एका मिश्रणात फिटकरी(Alum), माती आणि गोंद मिळवून कापडावर लावले जाते. छपाई करण्याच्या भागात डाग नको म्हणून कापडावर भुसा किंवा शेणाच्या पावडरचा वापर केला जातो. मग कापड नैसर्गिकरित्या दोन ते तीन दिवस वाळवले जाते.
३. रंग: विविध नैसर्गिक घटकांमध्ये भिजवून आणि उकळवून कापडावर विविध रंग लावले जातात: अॅलिझरीन (लाल रंग), मॅडर रूट किंवा मंजिष्ठा (केशरी रंग), हिना (ओलिव्ह रंग), आणि रुबार्ब रूट (फिकट तपकिरी रंग) या रंगांचा वापर केला जातो.
४. विच्छर्णु: रेझिस्ट मिक्स आणि अतिरिक्त डाई कलर काढून टाकण्यासाठी कापड पूर्णपणे धुतले जाते.
अजरक तयार करण्याची ही संपूर्ण प्रक्रिया, नक्षीच्या गुंतागुंतीवर आणि वापरल्या जाणाऱ्या रंगांच्या संख्येवर अवलंबून असते. त्यासाठी एक ते तीन आठवडे लागू शकतात. तयार झालेले कापड केवळ वस्त्र नसून, एक कला आहे; जी तिच्या निर्मात्याच्या कौशल्याचे आणि शतकांपूर्वीच्या परंपरांचे प्रतीक आहे. कच्छच्या डिझायनर सेजल कामदार यांनी या कलेत विशेष कौशल्य प्राप्त केले आहे. त्या सांगतात, “एक मीटर अजरक कापड तयार करण्यासाठी २० ते ६० तास लागतात.” पारंपरिक अजरकमध्ये दोन किंवा तीन रंग वापरले जात होते, तर आधुनिक कापडामध्ये हिरवा, निळा, काळा आणि पांढरा अशा सात रंगांपर्यंत समावेश असतो.
खऱ्या आणि बनावट अजरकची ओळख कशी पटवावी?
चंदन यांच्या मते, खऱ्या अज्रखची ओळख त्याच्या समृद्ध, मातीच्या रंगसंगतीतून आणि नैसर्गिक रंगांच्या खास वासातून करता येते. हस्तकलेच्या प्रक्रियेमुळे कापडातील अपूर्णता त्याच्या अस्सलपणाची महत्त्वाची खूण आहे. नक्षीतील किंवा रंगातील असमानता या कापडाच्या हस्तकलेच्या स्वरूपाचे प्रदर्शन करते. कामदार यांनी ग्राहकांना कापडाच्या मागील बाजूवर बारकाईने लक्ष देण्याचा सल्ला दिला. खऱ्या अजरकमध्ये मागील बाजूस नक्षी पुढील बाजूस तितकीच चमकदार असते. खऱ्या अज्रखचे गुणवत्तापूर्ण कापड आणि रंग याकडे विशेष लक्ष देण्यास त्यांनी सुचवले आहे.
उषा राणी यांनी सांगितले की, खऱ्या अजरकमध्ये लाल किंवा निळ्या पार्श्वभूमीवर जटिल भूमितीय किंवा फुलांच्या नक्षी असतात, ज्यामध्ये हिरवा आणि पिवळा यांसारख्या भाज्यांच्या रंगांचा समावेश असतो. त्यांनी असेही सांगितले की, खऱ्या अजरकसाठी उच्च-गुणवत्तेच्या नैसर्गिक कापडांचा, जसे की कॉटन, सिल्क किंवा मिश्रणांचा वापर केला जातो. कृत्रिम कापडांचा वापर किंवा एकसारखी नक्षी ही बनावट अजरकची लक्षणे आहेत. कारण मोठ्या प्रमाणात उत्पादन घेताना पारंपरिक ब्लॉक प्रिंटिंगच्या वैविध्यपूर्णतेचा अभाव असतो. खऱ्या अजरकमध्ये मऊ, गुळगुळीत पोत आणि उत्कृष्ट ड्रीपिंग गुणधर्म असतात.
अजरकचा विकास
पूर्वी ग्रामीण समुदायांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अजरकला आता त्याच्या पर्यावरणपूरक प्रक्रियेमुळे आणि जटिल डिझाइनमुळे शहरी वर्तुळात स्वीकारले जात आहे. उषा राणी म्हणाल्या की, अजरकने आधुनिक अभिरुचीनुसार सिल्क आणि लिनेन सारख्या कापडांचा स्वीकार केला असला तरी त्याची मूळ स्वरूपाचे जतन करणे आवश्यक आहे.
कामदार यांच्या मते, या कलेच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. “हा प्रयत्न कारागीर समुदायाला पाठिंबा मिळण्यासह शाश्वत आणि पर्यावरणपूरक उत्पादनांसाठी वाढत्या मागणीला प्रतिसाद देणारा असला पाहिजे.” अजरकमध्ये वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक रंगांमुळे त्याचा पर्यावरणावर अत्यल्प परिणाम होतो. अजरक छपाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक रंगांनी आणि नैसर्गिक प्रक्रियांमुळे ती नेहमीच टिकाऊ ठरली आहे.
या कलेला पाठिंबा देण्यासाठी विश्वासार्ह स्रोतांकडून अजरक विकत घेणे, त्याच्या इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि शाश्वत फॅशनचा अवलंब करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे इतके सोपे आहे. अजरक ही कला संस्कृती, सृजनशीलता आणि समुदायाचे प्रतीक आहे. आपण त्याचे रंग आणि नक्षी परिधान करतो तेव्हा आपण इतिहासाचा एक भाग आपल्याबरोबर घेत असतो.