Jewish Communities India भारत एक असा देश आहे; ज्यामध्ये सर्वधर्मीय लोक एकजुटीने राहतात. स्थलांतरित झालेल्या ज्यू समुदायालादेखील भारताने असेच सामावून घेतले. हजारो वर्षांपासून भारतात येऊन स्थायिक झालेल्या परदेशी समुदायांपैकी ज्यू समाज एक आहे. जगभर द्वेषाचा सामना केलेल्या ज्यूंना भारताने आश्रय दिला. देशाच्या विविध भागांत ज्यू समुदायाचे लोक पसरले आहेत. ज्यूंमध्येही विविध प्रकार आहेत. त्यात पश्चिम भारतातील बेने इस्रायली ज्यू, पश्चिम बंगालचे बगदादी ज्यू, केरळचे कोचीन ज्यू यांचा समावेश आहे. यातील केरळमधील ज्यू समुदाय आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याच समुदायातील राणी हॅलेगुआ (वय ८९) यांचे रविवारी कोची येथे निधन झाले. केरळच्या परदेशी ज्यू समुदायातील त्या शेवटच्या महिला होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुतणे कीथ केरळमधील शेवटचे परदेशी ज्यू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वांत जुना ज्यू समुदाय कोणता?

१९४० च्या मध्यात एकूण ज्यू समुदायाची लोकसंख्या २० ते ५० हजारांच्या घरात होती. परंतु, आज भारतातील ज्यू लोकसंख्या केवळ चार ते पाच हजारांच्या घरात आहे. शेकडो वर्षांपासून कोकण किनारपट्टीवर मराठी भाषक बेने इस्रायल समुदाय राहतो. या समुदायाची संख्या इतर ज्यू समुदायांपेक्षा जास्त आहे. परंतु, हा समुदाय भारतातील सर्वांत जुना ज्यू समुदाय नाही. केरळमधील मलबार दोन ज्यू समुदाय भारतातील सर्वांत जुने ज्यू समुदाय आहेत. मलबार ज्यूज यांना कोचीन ज्यू म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा इतिहास राजा सॉलोमनच्या काळातील आहे (जो अंदाजे तीन हजार वर्षांपूर्वीचा १० व्या शतकातील आहे). सुरुवातीला हा समुदाय क्रांगनोर (सध्याचे त्रिशूर जिल्ह्यातील कोडुंगल्लूर) येथे स्थायिक झाला. या ठिकाणाला समुदायाने शिंगली, असे नाव दिले.

शेकडो वर्षांपासून कोकण किनारपट्टीवर मराठी भाषक बेने इस्रायल समुदाय राहतो. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : ऑलिम्पिक पदकांची खरी किंमत किती? २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक पदकांमध्ये काय वेगळेपण होते?

या समुदायाचा जुना कागदोपत्री पुरावा आढळून येतो. इ.स १,००० पासून क्रँगनोरच्या हिंदू शासकाने एका स्थानिक ज्यू नेत्याला दिलेला ताम्रपटांचा संच आहे. त्यावर या प्रदेशात ज्यूंनी उपभोगलेल्या विविध आर्थिक आणि औपचारिक विशेषाधिकारांची यादी आहे. १४ व्या शतकापासून आणि विशेषतः १६ व्या शतकात पोर्तुगीजांच्या आगमनानंतर मलबार ज्यू क्रँगनोरपासून कोचीन (आताची कोची) येथे दक्षिणेकडे गेले. तेथील राजानेही त्यांचे स्वागत केले.

परदेशी ज्यू भारतात कधी आले?

परदेशी ज्यू हे १५ व्या व १६ व्या शतकात इबेरियन द्वीपकल्पातून भारतात स्थलांतरित झाले. स्पेन आणि पोर्तुगालच्या कॅथॉलिक राज्यकर्त्यांकडून छळ झाल्यामुळे या समुदायाने भारतात पलायन केले. हा समुदाय देशातील पूर्व-स्थायिक ज्यू समुदायांबरोबर मलबार किनारपट्टीवर तसेच मद्रास (आताचे चेन्नई) येथे स्थायिक झाला. कोचीनचे परदेशी ज्यू केरळच्या मसाल्यांच्या व्यापारात सक्रिय होते आणि मद्रासमध्ये स्थायिक झालेला समुदाय गोलकोंडा हिरे आणि इतर मौल्यवान दगडांच्या व्यापारात गुंतला. केरळमध्ये परदेशी ज्यूंनी मल्याळम आणि अनेक स्थानिक प्रथा आणि परंपरा स्वीकारल्या. पण, या समुदायाने केरळच्या जुन्या ज्यू समाजातील लोकांशी लग्न करणे थांबवले आणि त्यांना तुच्छतेने बघायला सुरुवात केली. त्यामुळे केरळमध्ये दोन वेगळे ज्यू समुदाय निर्माण झाले. पाश्चात्त्य लेखकांद्वारे परदेशींना ‘पांढरे ज्यू’ आणि मलबारींना ‘काळे ज्यू’ असे संबोधले जाते.

परदेशी ज्यूंनी केरळच्या जुन्या ज्यू समाजातील लोकांशी लग्न करणे थांबवले आणि त्यांना तुच्छतेने बघायला सुरुवात केली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

कोचीमध्ये कोडर्स हे सर्वांत प्रमुख परदेशी ज्यू कुटुंबांपैकी होते. सॅम्युअल कोडर (१९०८-९४) यांनी १९४० पासून ते १९७० च्या उत्तरार्धापर्यंत कोचीन इलेक्ट्रिक कंपनी चालवली गेली, जी केरळ राज्य विद्युत मंडळाने (KSEB) नंतर विकत घेतली. ते भारतातील सर्वांत उच्च ज्यू नेत्यांपैकी एक होते. सॅम्युअलच यांच्या वडिलांनी कोडर हाऊस बांधले, ज्याला सॅम्युअल (१८६९-१९४१) असे नाव देण्यात आले. आज हे कोडर हाऊस कोचीमध्ये एक बुटीक हॉटेल आहे. ज्यांच्या मृत्यू झाला, त्या राणी हॅलेगुआ या सॅम्युअल ज्युनियरच्या लेक होत्या.

परावूर, चेंदमंगलम व माला येथे परदेशी ज्यू समुदायाची सभास्थाने आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

समुदाय नामशेष होण्याच्या मार्गावर

युरोप किंवा पश्चिम आशियातील ज्यू समुदायांप्रमाणेच भारतात या समुदायाला क्वचितच ज्यूविरोधींचा किंवा छळाचा सामना करावा लागला. कोडर्स कुटुंबाप्रमाणेच अनेक जण परदेशी व्यापारात डच आणि हिंदू राज्यकर्त्यांचे सल्लागार म्हणून उच्च पदांवर पोहोचले. त्यानंतर ब्रिटिश राजवटीत हा समुदाय केरळमधील यहुदी व्यापारी म्हणून समृद्ध झाला. पुढे ब्रिटिश नोकरशाहीमध्ये ते शिक्षक, कारकून व वकील म्हणून कार्यरत होऊ लागले. परंतु, १९५० पासून केरळ ज्यूंचे इस्रायलमध्ये स्थिर स्थलांतर होताना दिसत आहे. अंदाजानुसार, आज इस्रायलमध्ये चार हजारपेक्षा जास्त ‘कोचिनिम’ आहेत. त्यातील बहुतेक मलबार ज्यू समुदायाचे आहेत; तर काही परदेशी आहेत. केरळमध्ये आता फक्त १४ मलबार ज्यू व एक परदेशी ज्यू शिल्लक आहेत.

हेही वाचा : मायक्रोवेव्ह म्हणजे बॅक्टेरियाचे घर? रक्तप्रवाहात शिरल्यास गंभीर आजारांचा धोका? आरोग्यासाठी किती घातक?

परावूर, चेंदमंगलम व माला येथे परदेशी ज्यू समुदायाची सभास्थाने आहेत. आत ही सभास्थाने म्हणजे संरक्षित स्मारके आहेत. मलबारी ज्यूंचे तीन सिनेगॉग आहेत, त्यातील कवुंभगम, एर्नाकुलममधील सिनेगॉग अजूनही सक्रिय आहेत. हेदेखील २०२१ मध्ये राज्य सरकारने संवर्धनासाठी ताब्यात घेतले. मत्तनचेरी व कोची येथील ‘ज्यू स्ट्रीट्स’ आणि पूर्वी ज्यूंच्या मालकीची येथील दुकाने आणि व्यावसायिक घरे आजही तशीच आहेत. त्याचप्रमाणे राज्यात एकूण सात सिनेगॉग आहेत, त्यापैकी सर्वांत प्रमुख म्हणजे १५६८ मध्ये मॅटनचेरी येथे बांधलेले परदेशी सिनेगॉग.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of kerala jewish communities rac