लोकसत्ता टीम

येमेनमधून हुथी बंडखोरांनी डागलेले हायपरसॉनिक क्षेपणास्त्र २००० किलोमीटरचा प्रवास करून इस्रायलमध्ये राजधानी तेल अवीवजवळ कोसळले. इस्रायलच्या बहुपरिचित क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेला हे क्षेपणास्त्र भेदता आले नाही. हुथी बंडखोरांना इराणचा सक्रिय पाठिंबा असल्यामुळे पश्चिम आशियात संघर्षाची आणखी ठिणगी पडली आहे. हेझबोला बंडखोरांप्रमाणे आता हुथी बंडखोरांपासूनही स्वरक्षणाची तजवीज इस्रायलला करावी लागणार आहे.

BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
Loksatta lalkilla BJP Congress video viral Rahul Gandhi Amit Shah
लालकिल्ला : शहांची कोंडी आणि भाजप सैरावैरा!
शहांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद
BJP MLA opposes Congress , Nagpur winter session,
शहांच्या समर्थनार्थ आता भाजप मैदानात, काँग्रेसचे विरोधात…
Congress is aggressive against Home Minister Amit Shah statement
लोकसभाध्यक्षांच्या आसनावरून घोषणाबाजी, गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक; कामकाज तहकूब
Ukraine spy agency Sluzhba bezpeky Ukrainy SBU
विश्लेषण : युक्रेनची गुप्तचर संघटना इस्रायलच्या ‘मोसाद’पेक्षा धोकादायक? रशियाचा काटा काढणाऱ्या ‘एसबीयू’चा इतिहास काय?

हायपरसॉनिक क्षेपणास्त्र किती विध्वंसक?

हायपरसॉनिक किंवा अतिस्वनातीत क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा ५ ते २५ पट वेगाने प्रवास करते. म्हणजे १.६ किलोमीटर ते ८ किलोमीटर प्रतिसेकंद इतका त्याचा वेग असू शकतो. रशिया, अमेरिका यांसारख्या देशांकडे उच्च क्षमतेची हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आहेत. ब्रिटन, फ्रान्स, चीन यांनीही दरम्यानच्या काळात ती विकसित केली. तर भारत, इस्रायल, इराण, उत्तर कोरिया यांसारख्या देशांनी अशा क्षेपणास्त्राची क्षमता गेल्या काही वर्षांत प्राप्त केली आहे. हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्राप्रमाणेच काम करते, तरी प्रत्येक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे हॉयपरसॉनिक स्वरूपाचे असतेच असे नाही. वेग हा हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा मुख्य गुण असतो. त्यामुळे क्षेपणास्त्ररोधी यंत्रणा सक्रिय करणे आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे यासाठी फार अवधी मिळत नाही. त्यामुळे या क्षेपणास्त्रांकडून अधिक विध्वंस संभवतो.

आणखी वाचा-Dyslexia brain research: मेंदू संदर्भातील नव्या संशोधनाने मिळणार डिस्लेक्सियाच्या उपचारांना दिशा; अध्ययन अक्षमता नेमकी का निर्माण होते?

हुथींकडे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र कसे?

हुथींच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्र दाव्याने इस्रायल आणि त्याच्या मित्रदेशांमध्ये खळबळ नक्कीच उडाली आहे. इस्रायली वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता हे क्षेपणास्त्र तेल अविवजवळ जाफा शहरात एका निर्मनुष्य जागी कोसळले. क्षेपणास्त्र हल्ल्याचा सायरन वाजल्यानंतर नागरिकांची धावपळ उडाली. त्यात आठ जण जखमी झाल्याचे इस्रायल सरकारने जाहीर केले. प्रत्यक्ष हल्ल्यात कुणी मृत वा जखमी झाले नाही. हे क्षेपणास्त्र २०४० किलोमीटरचे अंतर ११.५ मिनिटांत कापून इस्रायलमध्ये पोहोचल्याचा दावा हुथींचा प्रवक्ता याह्या सारेआ याने केला. आतापर्यंत हुथींचे इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ले लाल समुद्रातील जहाजांपर्यंत मर्यादित होते. जून महिन्यात हुथींच्या एका ड्रोन हल्ल्यात तेल अवीवमध्ये एक नागरिक मरण पावला होता. मात्र त्यांच्याकडे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र इराणकडूनच आले असावे, असे मानायला जागा आहे. इराणने गेल्या दोन वर्षांत हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. या क्षेपणास्त्रासाठी आवश्यक तंत्रज्ञान हुथींकडे असण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.

इस्रायलची क्षेपणास्त्ररोधी यंत्रणा कुचकामी?

याविषयी दोन्ही बाजूंकडून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. इस्रायलच्या ‘२० क्षेपणास्त्रांनी आमचे क्षेपणास्त्र रोखण्याचा प्रयत्न केला’ असा धक्कादायक दावा हुथींनी केला आहे. इस्रायलने मात्र ‘आमच्या यंत्रणेने क्षेपणास्त्र हवेतच भेदले. पण पूर्ण नष्ट केले नाही. त्याचे काही तुकडे जमिनीवर पडले’ असे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलची आयर्न डोम ही क्षेपणास्त्ररोधी यंत्रणा अत्यंत कार्यक्षम मानली जाते. काही महिन्यांपूर्वी या यंत्रणेने इराणकडून झालेला ‘क्षेपणास्त्र वर्षाव’ यशस्वी रीत्या रोखून धरला होता. त्यामुळे या इस्रायली यंत्रणेने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राला इस्रायली हवाई हद्दीत शिरकाव कसा करू दिला, याविषयी प्रश्न उपस्थित होतात.

आणखी वाचा-Phosphoric Acid: कार की अन्न? खतांचा कच्चा माल जातोय बॅटऱ्यांच्या निर्मितीमध्ये, झळा बसतायत भारताला!

इस्रायलचा प्रतिसाद

या कृतीची मोठी किंमत हुथींना मोजावी लागेल, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी दिला. ज्यांना आमच्या निर्धाराविषयी संदेह वाटतो, त्यांनी होदेदा बंदरात काय झाले, हे नक्की जाणून घ्यावे, असेही नेतान्याहू यांनी सांगितले. तेल अवीवमध्ये हुथींच्या ड्रोन हल्ल्यानंतर इस्रायलने येमेनमधील हुथींचे प्राबल्य असलेल्या होदेदा बंदरावर लढाऊ विमानांनी हल्ला केला. या हल्ल्यात सहा जण ठार आणि ८० जण जखमी झाले. शिवाय बंदराचेही मोठे नुकसान झाले. होदेदा बंदरात इराणकडून शस्त्रास्त्र सामग्रीची ने-आण होत असते असे इस्रायलने वारंवार म्हटले आहे. ताज्या हल्ल्यानंतरच्या इस्रायली प्रतिसादामध्ये पुन्हा एकदा या बंदराला लक्ष्य केले जाऊ शकते.

हमास, हेझबोला, हुथी…

येत्या ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यास एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने इस्रायलवर आणखी हल्ले करण्याची धमकी हुथींनी दिली आहे. हमासने हायपरसॉनिक हल्ल्याचे स्वागत केले आहे. पॅलेस्टिनींवर अत्याचार केल्यास याच प्रकारे प्रतिसाद मिळेल, असे हमासने म्हटले आहे. आतार्यंत एका बाजूला हमास आणि दुसरीकडे हेझबोलाशी लढणाऱ्या इस्रायलला आता हुथींकडून होणाऱ्या हल्ल्यांची दखलही यानिमित्ताने घ्यावी लागेल. हुथी ही हमास किंवा हेझबोलापेक्षा तुलनेने लहान संघटना असली, तरी तिची प्रहारव्याप्ती इतर दोन संघटनांपेक्षा अधिक आहे. शिवाय हुथींचे हल्ले लाल समुद्र आणि एडनच्या आखातातील सागरी व्यापारी मार्गांवर होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी हुथींचे उपद्रवमूल्य अधिक आहे. हेझबोला आणि हुथी या दोन संघटनांना इराणचा सक्रिय आणि सशस्त्र पाठिंबा आहे. त्यामुळे हुथींच्या ताज्या हल्ल्यावरून इस्रायल इराणलाही लक्ष्य करू शकतो. हेझबोला ही संघटना लेबनॉनच्या उत्तर भागात तळ ठोकून आहे. हमास संघटनेने पॅलेस्टाइनच्या गाझा पट्टीचा ताबा घेतला आहे. तर हुथींनी येमेनच्या प्रमुख भागावर – राजधानी सना सह – कब्जा केला आहे.

Story img Loader