सरलेले वर्ष आजवर नोंदवण्यात आलेले सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे. सलग तेरा महिने सरासरीपेक्षा जास्त तापमान राहिले. गतवर्षाने नजीकच्या भविष्यातील मोठ्या आणि विध्वंसक हवामान बदलाची चुणूक दाखवली आहे. त्याविषयी..

जगभरात तापमान वाढ?

युरोपियन क्लायमेट एजन्सी कोपरनिकसने दिलेल्या माहितीनुसार, १८५० ते १९०० या औद्योगीकरण पूर्व काळातील सरासरी वार्षिक तापमानाच्या तुलनेत २०२३ हे वर्ष सर्वांत उष्ण वर्ष ठरले होते. २०२३ मध्ये १.४५ अंश सेल्सिअसने तापमान जास्त होते. पण २०२३ पेक्षाही सरलेल्या २०२४ मध्ये ०.०५ अंश सेल्सिअसने वाढ होऊन वार्षिक वाढ १.५ अंश सेल्सिअस नोंदवली गेली. गत वर्षांत ४१ दिवस उष्णतेच्या तीव्र झळांचा सामना करावा लागला, तर १३० दिवस लोकांनी उकाडा अनुभवला. लहान बेटे, विकसनशील देशांना तापमान वाढीचा जास्त फटका बसला. वर्षभरात हवामान प्रकोपाच्या म्हणजे अति उष्णता, अति थंडी, अतिवृष्टीच्या २१९ घटना घडल्या. या घटनांमध्ये ३ हजार ७०० जणांचा मृत्यू झाला असून, लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले. भारतासह पाकिस्तान, दुबई, ब्राझील, व्हिएतनाम आणि मोरोक्कोच्या वाळवंटात अतिवृष्टीमुळे महापुराच्या घटना घडल्या. २०२४ या वर्षाने नजीकच्या भविष्यातील मोठ्या आणि विध्वंसक हवामान बदलाची चुणूक दाखवली आहे.

farmers dap fertilizer subsidy
विश्लेषण : खत अनुदानामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
bangladesh and pakistan establish military tie up what are implications for india
बांगलादेशच्या भूमीवर पुन्हा पाकिस्तानचे सैन्य… दोन अस्थिर शेजाऱ्यांमधील करार भारतासाठी डोकेदुखी ठरणार?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
स्वित्झर्लंडमध्ये हिजाब आणि बुरख्यावर का बंदी घालण्यात आली आहे? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Hijab ban in Switzerland : स्वित्झर्लंडमध्ये हिजाब आणि बुरख्यावर का बंदी घालण्यात आली आहे?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
beed crimes walmik karad latest marathi news
बाहुबलीचे बीड : बीडच्या दहशतीला पवनऊर्जेचे वारे!

हेही वाचा : बांगलादेशच्या भूमीवर पुन्हा पाकिस्तानचे सैन्य… दोन अस्थिर शेजाऱ्यांमधील करार भारतासाठी डोकेदुखी ठरणार?

१३ महिने सरासरीपेक्षा जास्त तापमान

जगभरात सलग १३ महिने उष्णतेची लाट कायम होती. आफ्रिकी देश सुदान, नायजेरिया आणि कॅमेरूनमध्ये तीव्र उष्णतेमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे दोन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तीव्र उष्णतेने उत्तर कॅलिफोर्निया आणि डेथ व्हॅलीमध्येही कहर केला. दक्षिण आणि पूर्व आशियाई देशांमध्ये तीव्र उष्णतेमुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या. २५ मे रोजी राजस्थानमधील फालोदी येथे कमाल तापमान ४९ तर पाकिस्तानमधील जकोबाबाद येथे ५० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. या पूर्वी ओद्योगिकरण पूर्व काळाच्या तुलनेत १.४५ अंश सेल्सिअसने तापमान वाढ झाल्यामुळे २०२३ हे वर्ष आजवरचे उष्ण वर्ष ठरले होते. तर त्यापूर्वी १.२९ अंश सेल्सिअस तापमान वाढ झाल्यामुळे २०१६ हे वर्ष उष्ण वर्ष ठरले होते. २०१६ मध्ये प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय होता. एल निनो आणि हरित वायूच्या उत्सर्जनामुळे तापमान वाढ झाल्याचे जागतिक हवामान संघटनेने म्हटले होते. आता नुकत्याच संपलेल्या डिसेंबर महिन्यासह मागील १३ महिने सरासरीपेक्षा जास्त उष्णतेचा सामना करावा लागला, असे वर्ल्ड वेदर ॲट्रिब्यूशन या संस्थेने म्हटले आहे.

भारतात नेमके काय घडले?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १९०१ च्या तुलनेत २०२४ मध्ये देशाच्या सरासरी तापमानात ०.६५ अंश सेल्सिअसने वाढ झाली. २०१६ मध्ये ०.५४, २०१९ मध्ये ०.४५, २०१० मध्ये ०.३९ आणि २०१७ मध्ये ०.३८ अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. २०२४ने सर्व उच्चांक मोडीत काढले. प्रामुख्याने जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यातील किमान तापमानही सर्वांधिक होते. देशाचे कमाल तापमान सरासरी ३१.२५ अंश सेल्सिअस असते, त्यात ०.४० ने वाढ झाली, तर किमान तापमान २०.२४ अंश सेल्सिअस असते, त्यात ०.९० अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात देशातील सरासरी किमान तापमान १२.२७ अंश सेल्सिअस असते, ते २०२४ च्या डिसेंबरमध्ये १३.२२ अंश सेल्सिअस होते. देशाच्या सर्वच भागात डिसेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. तापमान वाढीचा कल जानेवारी महिन्यातही कायम राहण्याचा अंदाज आहे. जानेवारीत देशाच्या बहुतेक भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रामुख्याने महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा : Hijab ban in Switzerland : स्वित्झर्लंडमध्ये हिजाब आणि बुरख्यावर का बंदी घालण्यात आली आहे?

तापमान वाढ किती गंभीर?

हवामान बदलामुळे जगभरातील लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले. उष्णतेमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला. अति थंडी, अति उष्णता, अतिवृष्टीमुळे पूर, चक्रीवादळ आणि दुष्काळामुळे लोकांपुढील समस्या वाढल्या आहेत. जीवाश्म इंधन जाळत राहिल्यास आणि दरवर्षी सरासरी ०.०५ अंश सेल्सिअसने तापमान वाढ होत राहिल्यास २०४० पर्यंत परिस्थिती अतिशय गंभीर होईल, असा इशारा वर्ल्ड वेदर ॲट्रिब्यूशनचे प्रमुख डॉ. फ्रेडरिक ओटो यांनी दिला आहे. जागतिक हवामान संघटनेने २०२४ मधील तापमान वाढीचा कल २०२५ मध्येही कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कार्बन डाय ऑक्साईड आणि हरीत वायूचे उत्सर्जनात वाढ होऊन भविष्यात तापमान वाढ होतच राहील. त्यामुळे २०२५ मधील तापमान वाढ अधिक गंभीर आणि नुकसानकारक असेल. हवामान बदलाच्या संकटांना तोड देण्यासाठी पुरेसा वेळही आपल्याकडे राहिला नाही. आता तातडीने पर्यावरणपूरक धोरणांची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे. ध्रुवीय प्रदेशात बर्फ वितळण्याच्या प्रमाणात ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२३ मध्ये जागतिक पातळीवरील कार्बन उत्सर्जन ३६.८ अब्ज टनांवर गेले आहे. पर्यावरणपूरक धोरणांसह हरीत वायू, कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यांची गरज आहे. पर्यावरणपूरक, नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा तापमान वाढीचे परिणाम भयानक असतील, असा इशारा जागतिक हवामान संघटनेच्या सरचिटणीस एलेना मानेनकोवा यांनी दिला आहे.
dattatray.jadhav@expressindia.com

Story img Loader