सीमाभागात रस्ते बांधण्याची जबाबदारी असलेल्या सीमा रस्ते संघटनेच्या (Border Roads Organisation – BRO) प्रकल्प बीकनद्वारे हिमालयाच्या कुशीत बर्फाच्छादित असलेल्या अमरनाथ मंदिरापर्यंत रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. २ नोव्हेंबर रोजी बीआरओने एक्स या सोशल नेटवर्किंग साइटवर नवीन रस्त्याबाबतची माहिती दिली. रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर बालटाल ते अमरनाथ मंदिरापर्यंत वाहनाने जाणे शक्य होणार असल्यामुळे पहिल्यांदाच वाहनाने गुहेपर्यंत पोहोचणे शक्य होईल. या वर्षीच्या सुरुवातीला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी अमरनाथ धामला जाणाऱ्या नव्या रस्त्याची घोषणा केली होती. त्यानंतर ‘बीआरओ’कडून ही आनंदाची बातमी देण्यात आली आहे.

हे वाचा >> Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेला जाण्याचा प्लान करताय? मग जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

Odisha Forest Department started efforts to bring back Zeenat tigress that entered forests of Jharkhand
‘झीनत’ला परत आणण्यासाठी वनविभागाचे जोरदार प्रयत्न; नेमक झालं काय?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
Kandalwan damage new jetty, Virar Marambalpada,
नवीन जेट्टीच्या रस्त्यासाठी तिवरांची कत्तल? विरारच्या मारंबळपाडा परिसरातील प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप
celebrations at durgadi fort in kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष

अमरनाथ यात्रेला जाण्याचा आतापर्यंतचा पर्याय काय होता?

अमरनाथ गुहा हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १३ हजार फूट (३,९६२.४ मीटर) उंचीवर असून, येथील गुहेमध्ये बर्फाने तयार होणाऱ्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात. यात्रेकरू सोनमर्ग किंवा पहलगाम येथून लिद्दर खोऱ्यात पोहोचतात; जिथे अमरनाथ धामची गुहा आहे. पहलगामपासून उत्तरेकडे ४८ किमी अंतरावर ही गुहा आहे. पहलगाम ते चंदनवाडी हे सुरुवातीचे १६ किमी अंतर वाहन वापरून कापता येते. तिथून पुढे यात्रेकरू चालत किंवा खेचरावर बसून अमरनाथ धामपर्यंत पोहोचावे लागते. यात्रेच्या हंगामात या ठिकाणी खेचर आणि घोड्यांना चांगली मागणी असते. या मार्गावरून अमरनाथ धामपर्यंत पोहोचायला तीन ते पाच दिवस लागतात.

सोनमर्ग येथून बालटालमार्गे अमरनाथला जाता येते. हा पहलगामपेक्षा छोटा मार्ग आहे. बालटाल ते अमरनाथ धाम हे १४ किमीचे अंतर पार करण्यासाठी पायी आठ तासांचा कालावधी लागतो; तर खेचर किंवा घोडा घेऊन गेल्यास हे अंतर सहा तासांत पूर्ण करता येते. या मार्गावरून एका दिवसात परतणे शक्य असले तरी अनेक यात्रेकरू अमरनाथ येथे एक रात्र घालवून मग परतीचा प्रवास करतात.

काही वर्षांपासून अमरनाथ येथे पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरचीही सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामध्ये यात्रेकरूंना बालटालपासून पंचतरणीपर्यंत हेलिकॉप्टरने आणले जाते. पंचतरणी ते अमरनाथ धाम हे सहा किमी एवढे अंतर आहे. अमरनाथ धामपर्यंत हेलिकॉप्टर नेण्यास पर्यावरणीय कारणांमुळे विरोध होत आहे. शिवलिंग आता झपाट्याने वितळत आहे आणि त्यासाठी हेलिकॉप्टरच्या वापराला जबाबदार धरले जात आहे.

गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव

या वर्षी एप्रिल महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरनाथ यात्रेला जोडण्यासाठी विशेष प्रकल्पाची घोषणा केली होती. या प्रकल्पासाठी ५,३०० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये चंदनवाडी (पहलगामच्या बाजूने) येथे वाहन चालू शकेल असा ३४ किमींचा रस्ता बांधणे आणि बालटाल (सोनमर्गच्या बाजूने) येथील रस्त्यासाठी ही तरतूद करण्यात आली होती. शेषनाग ते पंचतरणीपर्यंतच्या १०.८ किमीच्या बोगद्याचाही यामध्ये समावेश आहे. या बोगद्यामुळे बर्फवृष्टी आणि हिमस्खलन यांसारख्या समस्यांचा सामना यात्रेकरूंना करावा लागणार नाही. पंचतरणीपासून ते अमरनाथ मंदिरापर्यंत पाच किमींचा सिमेंट-काँक्रीटचा पादचारी मार्ग तयार करण्यात येईल. या मार्गावरून यात्रेकरू मंदिरापर्यंत पोहोचू शकतील. बालटाल ते अमरनाथ मंदिर असा नऊ किमींचा रोप वे मार्गही तयार करण्यात येणार आहे. यात्रेकरू या पर्यायी मार्गाचाही वापर करू शकतील. या मार्गासाठी ७५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

आणखी वाचा >> विश्लेषण: मुस्लीम मेंढपाळामुळे सापडली अमरनाथाची गुहा; भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या या तीर्थक्षेत्राचा इतिहास काय सांगतो? जाणून घ्या…

नितीन गडकरी यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी वर्षअखेरपर्यंत निविदा काढण्यात येतील.

बालटाल आणि चंदनवाडी येथून अमरनाथ मंदिरापर्यंत जाणाऱ्या पादचारी मार्गाची देखभाल जम्मू आणि काश्मीर सरकारच्या रस्ते आणि इमारत विभागामार्फत केली जाते. सप्टेंबर २०२२ मध्ये दोन्ही पादचारी मार्गांना देखभाल आणि दुरुस्तीसाठी बीआरओकडे हस्तांतरीत करण्यात आले. बीआरओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बालटाल येथे सध्या अस्तित्वात असलेला मार्ग १५ फूट रुंद करण्यात आला आहे. मंदिरापर्यंत ट्रक किंवा पिकअप वाहन जाण्यासाठी एवढी रुंदी पुरेशी आहे. तसेच सध्या तरी या मार्गावरून खासगी वाहनांना जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Story img Loader