Car Crash Test Process: देशात अपघाताचे प्रमाण वाढतच चालेले असून अपघात चिंतेचा विषय बनला आहे. हल्ली कार खरेदी करताना ग्राहक कार फीचर्सवर अधिक भर देताना दिसत आहे. सुरक्षेविषयी सजग असताना दिसत आहेत. त्यामुळेच हल्ली लोकांकडून वाहनांमध्ये अधिकाधिक सेफ्टी फीचर्सची मागणी देखील केली जात आहे. भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या वाहनाच्या सुरक्षिततेचा विचार करताना दिसत आहेत. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्या देखील वाहनांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेऊ लागल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत कार सुरक्षितता आणखी चांगली करण्यावर भर देण्यात येत आहे. यामध्येच कारच्या क्रॅश टेस्ट बद्दल तुम्ही ऐकलं असेलच. अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे आता वाहन कंपन्या सतर्क झाल्या असून ‘ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम’द्वारे (GNCAP) कारची क्रॅश टेस्ट केली जाते. या टेस्टमुळे वाहनांची सुरक्षितता सहज कळते. त्यामुळे ग्लोबल एनसीएपी म्हणजे काय आणि कार क्रॅश टेस्टिंग कशी केली जाते, हा प्रश्न उपस्थित झालाय, चला तर जाणून घेऊया सविस्तर….

Mumbai Kurla Bus Accident marathi news
विश्लेषण : बेस्टच्या दुर्दशेला जबाबदार कोण? कंत्राटी गाड्या आणि चालकांचा प्रयोग कसा फसला?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
champions of the earth award madhav gadgil
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Loksatta vyaktivedh Indu Chandhok Passes Away The Culture of Car Racing in India Car Racing Formula One
व्यक्तिवेध: इंदु चंधोक

क्रॅश टेस्टिंग म्हणजे काय?

कोणतीही कार किती मजबूत असते. वाहन चालवताना बसलेले प्रवासी किती सुरक्षित असतात? तीच गोष्ट शोधण्यासाठी क्रॅश टेस्टिंग केली जाते. एका विशिष्ट वेगाने गाडीचा अपघात झाल्यास काय स्थिती असेल? प्रौढ, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी गाडी सुरक्षेच्या दृष्टीने किती योग्य यावरून ठरवलं जातं. ग्लोबल NCAP म्हणजे न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम (New Car Assessment Program) च्या वतीने कार कंपन्यांद्वारे कारची क्रॅश चाचणी केली जाते.

Global NCAP म्हणजे काय?

ग्लोबल एनसीएपी ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेद्वारे वाहनांची सुरक्षा मानके तपासली जातात. वाहनांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या संस्थेकडून प्रत्येक वाहनाची क्रॅश टेस्टच्या माध्यमातून तपासणी केली जाते. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये, प्रत्येक वाहन मर्यादित वेगाने चालवत एका ठिकाणी आदळले जाते. यानंतर वाहनाच्या बाहेरील आणि आतील बाजूची तपशीलवार तपासणी केली जाते आणि त्यांना रेटिंग दिले जाते. सर्व कंपन्या त्यांच्या कारच्या प्रत्येक मॉडेल आणि प्रकारावर वेगवेगळी सुरक्षा वैशिष्ट्ये देतात. यामध्ये एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, सेफ्टी बेल्ट, बॅक सेन्सर, कॅमेरा, स्पीड अलर्ट यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. जेव्हा कारची क्रॅश चाचणी केली जाते तेव्हा या सुरक्षा वैशिष्ट्यांच्या आधारे तिला रेटिंग दिले जाते.

भारतातील कारची भारतातच होणार सेफ्टी रेटिंग टेस्ट!

आता भारताचा स्वतःचा क्रॅश टेस्ट सेफ्टी प्रोगाम आहे. ‘भारत न्यू कार असिस्मेंट प्रोग्राम’ (Bharat NCAP) २२ ऑगस्ट रोजी लागू करण्यात आला. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते Bharat NCAP प्रोग्राम लाँच करण्यात आला. आतापर्यंत कारच्या सेफ्टीची रेटिंग करणारी ही क्रॅश टेस्ट परदेशात केली जात होती, आता ती भारतातच होणार आहे. त्यामुळे कार उत्पादकांना क्रॅश टेस्ट भारतातच करता येणार असून ग्राहकांनाही आता सेफ्टी रेटिंगनुसार कार खरेदी करणे शक्य होणार आहे.

देशातील कार किती सुरक्षित आहेत? कोणत्या कंपन्यांच्या कार सुरक्षित आहेत आणि कोणत्या नाही? हे आजवर परदेशात ग्लोबल एनकॅपकडून ठरवलं जात होतं. पण आता कारची सेफ्टी टेस्ट घेणं अधिकच सुलभ झालं आहे. भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (एनसीएपी) मध्ये वाहन उत्पादक या कार्यक्रमांतर्गत ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड (AIS) १९७ नुसार स्वेच्छेने त्यांच्या वाहनांची चाचणी घेऊ शकतात. वाहनांना त्यांच्या चाचणी आणि कार्यक्षमतेच्या आधारे प्रौढ प्रवासी (AOP) आणि लहान मुलांसाठी (COP) स्टार रेटिंग दिले जाणार आहे.

कारची क्रॅश टेस्ट कशी केली जाते?

क्रॅश चाचणीनंतर कारच्या एअरबॅगने काम केले की नाही. डमीचे किती नुकसान झाले? कारच्या इतर सुरक्षा वैशिष्ट्यांनी किती चांगले काम केले? या सर्वांच्या आधारे रेटिंग दिले जाते. हे रेटिंग ग्राहकांना सुरक्षित कार खरेदी करण्यास मदत करते. कारची क्रॅश टेस्ट करण्यासाठी त्यामध्ये एक डमी ठेवला जातो. या डमीला कारमध्ये माणसाप्रमाणे बसवले जाते. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये कार ६४ किमी प्रतितास वेगाने चालविली जाते, निर्दिष्ट वेगाने धावल्यानंतर, कार समोर असलेल्या बॅरियरला धडकते. ही धडक जणू काही समान वजनाची दोन वाहने ताशी ५० किलोमीटर वेगाने एकमेकांना धडकतात अशाप्रकारची असते. क्रॅश चाचणीमध्ये, प्रौढ आणि बाल संरक्षणानुसार वेगवेगळी रेटिंग दिली जाते.

यानंतर अनेक प्रकारे क्रॅश टेस्ट केली जाते. ज्यामध्ये फ्रंटल, साइडल, रियल आणि पोल टेस्टचा समावेश आहे. फ्रंटल टेस्टमध्ये कार समोरून आदळली जाते, साइड टेस्टमध्ये कार बाजूकडून आदळली जाते, मागील टेस्टमध्ये, कार मागून आदळली जाते आणि पोल टेस्टमध्ये कार वरून खाली पाडली जाते. भारत सरकारच्या नवीन सुरक्षा नियमांनुसार, वाहनांना साइड इफेक्ट आणि फ्रंट ऑफसेट क्रॅश चाचण्या दोन्ही पूर्ण करणे बंधनकारक असेल.

कशी मिळते रेटिंग?

NCAP अंतर्गत, कारला ० ते ५ असे स्टार रेटिंग दिले जाते. रेटिंग जितकी जास्त तितकी कार सुरक्षित असे मानले जाते. हे रेटिंग एडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन स्कोअरवर आधारित आहे. कारमध्ये ठेवलेल्या डमीच्या रीडिंगवरून हे स्कोअर मिळतात. याशिवाय कारमध्ये देण्यात आलेल्या सेफ्टी फीचर्ससाठी वेगळे पॉइंट्सही देण्यात आले आहेत.

१. एडल्ट ऑक्युपेंट प्रोटेक्शन (Adult Occupant Protection)

एडल्ट ऑक्युपेंट प्रोटेक्शन १७ गुण ठेवण्यात आले आहेत. यात कारच्या धडकेनंतर कारमधील प्रौढ प्रवाशांना झालेल्या दुखापतीच्या आधारे गुण दिले जातात. यासाठी शरीराचे चार भागात वर्गीकरण केले जाते.

अ) डोके आणि मान
ब) छाती आणि गुडघा
क) फीमर आणि पेल्विस
ड) पाय आणि तळवा

२. चाइल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शन (Child Occupant Protection)

चाइल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शनसाठी ४९ गुण ठेवण्यात आले आहेत. यासाठी कारमध्ये १८ महिने आणि ३ वर्षांच्या मुलाचा आकाराचा एक डमी ठेवला जातो. यात कारमधील चाइल्ड रिस्ट्रेंट सिस्टीम मार्किंग, थ्री पॉइंट सीट बेल्ट आणि ISOFIX इत्यादींसाठी अतिरिक्त गुण मिळतात.

Global NCAP आणि Bharat NCAP नेमका काय फरक आहे?

ग्लोबल एनसीएपीकडे चाचणीसाठी वेगळा प्रोटोकॉल आहे, तर भारत एनसीएपीकडे वेगळा प्रोटोकॉल असेल. कारला GNCAP चाचणी दरम्यान प्रौढ संरक्षणामध्ये ३४ गुण, समोरच्या क्रॅश चाचणीमध्ये १६ गुण, साइड इफेक्ट चाचणीमध्ये १६ गुण आणि ५ स्टार सुरक्षा रेटिंगसाठी सीटबेल्ट रिमाइंडरमध्ये २ गुण मिळणे आवश्यक आहे. NCAP चाचणीत सर्वात कमी रेटिंग किंवा स्टार मिळालेल्या कार अपघाताच्या वेळी सुरक्षित मानल्या जात नाहीत.

दुसरीकडे, सध्या भारतात कारच्या क्रॅश चाचणीचे नियम निश्चित आहेत. BNCAP मध्ये, कोणत्याही कारला ५ स्टार रेटिंग मिळवण्यासाठी प्रौढ संरक्षणात किमान २७ गुण आणि बाल संरक्षणात किमान ४१ गुण मिळवावे लागतात. क्रॅश चाचणी दरम्यान फ्रंट ऑफसेट, साइड इफेक्ट आणि पोल साइड इफेक्ट तपासले जातात. रस्ते वाहतूक मंत्रालयाने देशातील कार क्रॅश टेस्टिंगसाठी पॅरामीटर्स सेट केले आहेत आणि त्यांना सुरक्षा रेटिंग दिली आहे. रेटिंगमध्ये अधिक स्टार मिळणे म्हणजे उत्तम सुरक्षितता मानले जाते. टियोगा, नेक्सान, टिगार या देशातील सर्वात सुरक्षित कार आहेत. आता देशात जवळपास दहाच्यावर कार या फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या आहेत.

“डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून भारतात ग्लोबल एनकॅप च्या धरतीवर भारत एनकॅप पॅसेंजर कार सेफ्टी प्रोग्रॅम सुरू होतोय. पण, हा सक्तीचा नाही. बाजारपेठेत आपली कार दुसऱ्या कंपन्यांपेक्षा किती सुरक्षित आहे हे दाखवण्यासाठी कंपन्यांकडून नक्कीच अधिकाधिक यात सहभाग घेतला जाईल. एडल्ट, चाइल्ड व सेफ असिस्टेट टेक्नॉलॉजी चा निकषांवर कारची चाचणी होणार असून, त्यानुसार एक ते पाच स्टार सेफ्टीबाबत दिले जाणार आहेत. गेल्या वीस वर्षात भारतात निर्माण झालेल्या पायाभूत सुविधा, गाड्यांमध्ये बदललेले तंत्रज्ञानाचा विचार करता भारत एनकॅप सक्तीचा केला पाहिजे.” असे वाहन विषयक तज्ज्ञ ओंकार भिडे सांगतात.

सुरक्षितता गुणांमुळे कारची सुरक्षितता कळते

खरंतर, कार खरेदी करताना तुम्ही विविध गोष्टींचा विचार करत असाल. पण स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कारचे सेफ्टी रेटिंग किती आहे, याचीही माहिती घेणं गरजेचं फार असतं. अपघात चाचणीनंतर कारच्या एअरबॅग्ज काम करतात की नाही, प्रतिकात्मक पुतळ्यांचे किती नुकसान झाले? कारची इतर सुरक्षितता वैशिष्ट्ये कितपत योग्य आहेत? या सर्वांच्या आधारे गुण दिले जाते. हे गुण ग्राहकांना सुरक्षित कार खरेदी करण्यास मदत करते.

Story img Loader