History and Origin of Exit Polls in India: विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. २० तारखेला मतदान होणार असून. त्यानंतर लगेचच एक्झिट पोलविषयी नागरिकांना प्रचंड उत्सुकता आहे. निवडणूक हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा सण आहे. तारखा जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचा निकाल येईपर्यंत देशभरात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. पण, देशातील अनेकांसाठी ‘एक्झिट पोल’ जाहीर होणारा दिवस हा सर्वांत महत्त्वाचा असतो. मतदानोत्तर जनमत चाचणीला सोप्या भाषेत एक्झिट पोल म्हणातात. ‘एक्झिट पोल’ लोकांनी निवडणुकीत कसे मतदान केले याचा एक अंदाज देतो. मतदार मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या मुलाखतींच्या आधारे, तसेच मतदार डेटाशी संबंधित इतर आकड्यांच्या आधारावर ही आकडेवारी ठरवली जाते. मोठ्या संख्येने भारतीय एक्झिट पोलला तेवढेच महत्त्व देतात, जेवढे ते प्रत्यक्ष निकालांना देतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा