biporjoy Cyclone : नुकतेच भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळ थैमान घालत आहे. मागील एका महिन्यात आलेले हे दुसरे चक्रीवादळ आहे. जगभरामध्ये चक्रीवादळांची संख्या आता वाढली आहे. या चक्रीवादळांची नावे आधीच निश्चित केलेली असतात. मे १९५०मध्ये अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाने चक्रीवादळांना महिलांची नावे देण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांनी का घेतला आणि वादळांना नावे देण्याचा रंजक इतिहास, तसेच अरबी समुद्रातील वादळांची वाढती संख्या जाणून घेणे उचित ठरेल.

‘बिपरजॉय’ म्हणजे काय ?

‘बिपरजॉय’ हे नाव बांगलादेशने सुचवलेले नाव आहे. याचा अर्थ ‘आपत्ती’ असा होतो. अरबी समुद्रात तयार झालेले हे या वर्षातील हे पहिले चक्रीवादळ आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळे तुलनेने कमी निर्माण होतात. बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची संख्या कमी आहे. मे-जून महिन्यात अरबी समुद्रात वादळे निर्माण होण्यास अनुकूल स्थिती असते. १८९१-२०२० काळातील उत्तर हिंद महासागर प्रदेशातील चक्रीवादळांची आकडेवारी दर्शविते की, १९९० पासून अरबी समुद्रातील वादळांची संख्या वाढत आहे. परंतु, बंगालच्या उपसागरातील वादळांची संख्या तेवढीच राहिली आहे. ‘स्प्रिंगर’मध्ये २०२१ मध्ये प्रकाशित झालेला अहवालही उष्ण कटिबंधीय प्रदेशातील वादळांची संख्या दर्शवणारा आहे. यामध्ये १९८२ ते २०१९ पर्यंतची आकडेवारी असून हा अहवाल अरबी समुद्रातील वाढलेली वादळांची संख्या दर्शवतो.

History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Peshwa Maratha sacking of the Sringeri math
Tipu Sultan History: पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी लुटला होता ‘शृंगेरी मठ’; या ऐतिहासिक घटनेत किती तथ्य?
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
cop 29 climate change conference in baku capital of azerbaijan
विश्लेषण : ‘कॉप २९’ची एवढी चर्चा का?
The minimum temperature in Mumbai is decreasing and the winter season is beginning Mumbai print news
मुंबईत थंडीची चाहुल
loksatta analysis blue zone concept fact or myth
या भागांतली माणसे असतात दीर्घायुषी… काय आहेत ‘ब्लू झोन’? ही संकल्पना वास्तव, की मिथक?

हेही वाचा : विश्लेषण : बलात्काराची प्रकरणे का वाढत आहेत? बलात्काराची मानसिकता आणि ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय ?

अमेरिकेने महिलांची नावे देण्याचे का ठरवले ?

चक्रीवादळांच्या नावांच्या यादीमधील नावे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दिसतात. परंतु, अमेरिकेने मे, १९५० मध्ये वादळांना स्त्रियांची नावे देण्याचे ठरवले. त्यामुळे १९५३ ते १९७९ या काळात अमेरिकेने चक्रीवादळांना महिलांची नावे दिलेली दिसतात. या कृतीबाबत दोन मतप्रवाह आहेत. पहिले म्हणजे काही मिथक कथांमध्ये समुद्राला स्त्रीचे प्रतीक संबोधले गेले आहे. स्त्री ज्याप्रमाणे सर्व गोष्टींचा स्वीकार करते, त्याप्रमाणे समुद्र असतो. या धारणेतून चक्रीवादळांना स्त्रियांची नावे दिली गेली. तर, १५० वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये स्त्रीवादाविरोधी चळवळ, स्त्रियांना समान हक्क नसणे, दुय्यम दर्जा, लैंगिकवाद या संदर्भातील घटना मोठ्या प्रमाणावर घडत होत्या. याच काळात महिलांनी न्यू यॉर्क शहरात समान हक्क मिळावेत, यासाठी आंदोलने केली होती. त्यामुळे स्त्रीवादाविरोधी रोष दर्शवण्यासाठी वादळांना स्त्रियांची नावे देण्याचे अमेरिकेने ठरवले, असा दुसरा मतप्रवाह आहे.
परंतु, याविरोधातही अमेरिकेमध्ये स्त्री कार्यकर्त्या एकत्रित आल्या. यामध्ये प्रामुख्याने अमेरिकेमध्ये बलात्कार झालेल्या स्त्रियांसाठी पहिले विशेष उपचार केंद्र निर्माण करणाऱ्या रॉक्सी बोल्टन आणि फ्लोरिडामधील समाजसेविका फ्रँकलिन रुझवेल्ट यांचा समावेश होतो. १९७२ मध्ये त्यांनी ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये दिलेल्या लेखात ‘हवामान खात्यात स्त्रियांविषयी सूडबुद्धी आहे’ याविषयी लिहिले. अमेरिकेच्या या निर्णयाविरोधात संघर्ष केल्यानंतर १९७९ मध्ये वादळांच्या नावांच्या यादीत पुल्लिंगी नावांचा समावेश करण्यात आला. १९७९ मध्ये अमेरिकेच्या गल्फ कोस्टला धडकलेल्या वादळाला ‘हरीकेन बॉब’ हे पहिले पुल्लिंगी नाव देण्यात आले.

हेही वाचा : विश्लेषण : भारतीय निवडणूक पद्धतीवर श्रीलंकेचा प्रभाव ? जाणून घ्या निवडणूक चिन्हांचा रंजक इतिहास

वादळांना नावे का देण्यात येतात ?

चक्रीवादळांना नाव देण्याचे प्रमुख कारण म्हणजे वेगवेगळी वादळे ओळखता यावीत. कारण, हवामानातील फरकांमुळे एकाच वेळी वेगवेगळी वादळे निर्माण होत असतात. त्यामुळे लोकांना धोक्याची सूचना देताना गोंधळ होऊ नये आणि वादळांची नोंदणी सुलभ व्हावी, यासाठी वादळांना नावे देण्यात येऊ लागली.
उष्णकटिबंधीय चक्रीवादळे एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकतात. त्यामुळे एका वेळी एकापेक्षा जास्त चक्रीवादळे होऊ शकतात. हवामानाचा अंदाज वर्तविणारे गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक चक्रीवादळाला एक नाव देतात. सर्वसाधारणपणे, उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना प्रादेशिक स्तरावरील नियमांनुसार नावे दिली जातात.अटलांटिक आणि दक्षिण गोलार्धात (भारतीय महासागर आणि दक्षिण पॅसिफिक), उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना वर्णक्रमानुसार नावे प्राप्त होतात आणि त्यामध्ये स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी नावांचा समावेश होतो. वादळांची नावे देशांनुसार सूचिबद्ध केलेली आहेत.
नावे निवडतानाचा सामान्य नियम असा आहे की, नावांची यादी विशिष्ट प्रदेशातील World Meteorological Organization (WMO) सदस्यांच्या राष्ट्रीय हवामान आणि जलविज्ञान सेवा (NMHS) द्वारे प्रस्तावित केली जाते आणि संबंधित उष्णकटिबंधीय चक्रीवादळ प्रादेशिक संस्थांद्वारे त्यांच्या वार्षिक/द्विवार्षिक सत्रांमध्ये मंजूर केली जाते.

हेही वाचा : विश्लेषण : दुसऱ्या महायुद्धातील भारत आणि ‘कोका कोला’चे स्थान

वादळांची नावे आणि इतिहास

तांत्रिक संज्ञा वापरण्यापेक्षा मानवी, स्थानीय किंवा त्या वेळी ठळक घटनांवरून वादळांना नावे देण्यात येत असत. सुरुवातीला म्हणजे १९व्या शतकात वादळांना स्वैरपणे नावे दिली गेली. अटलांटिकमध्ये आलेल्या वादळाने ‘अँटजे’ नावाच्या बोटीचे नुकसान केले होते. त्यावरून अंटलांटिकामधील ते वादळ ‘अँटजे चक्रीवादळ’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर मानवी नावांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला.
अधिक संघटित आणि कार्यक्षम नामकरण प्रणाली करण्यासाठी हवामानशास्त्रज्ञांनी नंतर वर्णक्रमानुसार वादळांच्या नावांची यादी तयार केली. अशा रीतीने, A ने सुरू होणारे नाव असलेले वादळ, अॅनसारखे, वर्षातील पहिले वादळ असेल, असे ठरवण्यात आले. १९५३ पासून, अटलांटिक उष्णकटिबंधीय वादळांची नावे राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने तयार केलेल्या यादीतून दिली आहेत. ती यादी जागतिक हवामान संघटनेच्या आंतरराष्ट्रीय समितीद्वारे अद्ययावत केली जाते. सुरुवातीस अमेरिकेने तयार केलेल्या यादीत फक्त महिलांची नावे होती. परंतु, १९७९ पासून पुरुषांची नावे समाविष्ट करण्यात आली. आता वादळांच्या नावांच्या सहा याद्या आहेत. त्या दरवर्षी ‘रोटेशन’नुसार बदलल्या जातात. २०१९ मधील वादळांच्या नावांची यादी २०२५ मध्ये वापरण्यात येईल.

एखादे वादळ प्राणघातक, विघातक किंवा सर्वात संहारक असेल, तर ते वादळ शमल्यानंतर त्या वादळाचे नाव यादीतून काढून टाकण्यात येते. एखाद्या वादळाचे नाव संवेदनशील वाटल्यास तेही यादीमधून काढून टाकण्यात येते. WMO उष्णकटिबंधीय चक्रीवादळ समित्यांच्या वार्षिक बैठकीत आक्षेपार्ह नावे यादीतून काढून टाकली जातात आणि त्याच्या जागी दुसरी नावे निवडली जातात. मंगखुट (फिलीपिन्स, २०१८), इर्मा आणि मारिया (कॅरेबियन, २०१७), हैयान (फिलीपिन्स, २०१३), सँडी (यूएसए, २०१२), कॅटरिना (यूएसए, २००५), मिच (होंडुरास), तसेच १९८ कुप्रसिद्ध वादळांची नावे यादीतून वगळण्यात आली. अमेरिकेने एका वादळाला ‘डार्विन’ असे नाव दिले होते. परंतु, ‘डार्विन’चे विज्ञानातील योगदान बघून ते नाव बदलण्यात आले.
हिंदी महासागर क्षेत्रातील वादळांच्या नावांच्या यादीकरिता बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड या राष्ट्रांनी योगदान दिले आहे.

हेही वाचा : विश्लेषण : छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार आणि वाघनखे इंग्लंडला कशी गेली ? काय आहे या शस्त्रांचा इतिहास…

प्रमुख वादळांची नावे आणि अर्थ

२००९ मध्ये आलेले ‘फयान/फियान’ हे वादळ दक्षिण भारतासाठी संहारक ठरले. ‘फियान’म्हणजे साप. हे नाव बांगलादेशने वादळांच्या नावांच्या यादीत समाविष्ट केलेले होते.
२०२१ मध्ये आलेले ‘तौक्ते’ वादळ महाराष्ट्रासाठी स्मरणीय ठरले होते. ‘तौक्ते’ हे नाव म्यानमारने सुचवले होते. याचा अर्थ ‘उच्च स्वरात ओरडणारा सरडा’ असा होतो.
२०२२ मध्ये भारतावर ‘निसर्ग’ वादळ घोंगावत होते. हे नाव मराठी वाटले तरी बांगलादेशने हे नाव दिलेले आहे. त्याच्या आधी एक आठवडा बंगालच्या उपसागरात ‘अँफेन’ वादळ आलेले होते. त्याचा अर्थ आकाश असा होतो. हे नाव थायलंडने हे सुचवलेले होते.
२०२३ मध्ये ‘मोचा’ हे वादळ चर्चेत आहे. येमेनमधील कॉफी उत्पादन करणाऱ्या एका प्रदेशावरून हे नाव देण्यात आलेले आहे. वादळ हे संहारक असतेच. पण, वादळांची नावे मात्र जिज्ञासा निर्माण करणारी ठरतात.