शेअर बाजार प्रमुख निर्देशांक नवनवीन उच्चांकी पातळी गाठत आहेत. बाजारातील या तेजीने गुंतवणूकदारांचे डोळे दिपले आहेत. शिवाय यामुळे नवीन गुंतवणूकदार बाजाराकडे आकर्षित होत असून डिमॅट खात्यांची संख्या १३ कोटींपुढे जाऊन पोहोचली आहे. यातून फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. त्याबद्दल सेबीने सावधगिरी बाळगण्याचा काय सल्ला दिला आहे ते बघू या.

सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक कशी होते?

शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उच्चांक गाठले असून या तेजीमुळे गुंतवणूकदारांचे डोळे विस्फारले आहेत. दर महिन्याला सरासरी २२ लाख नवीन डिमॅट खाती उघडली जात आहेत. त्यातील बहुतेक गुंतवणूकदारांना बाजारातील जोखमीविषयी किंवा बाजाराबद्दल प्राथमिक माहिती देखील नाही. याचाच फायदा घेत सामान्य गुंतवणूकदारांना मोठ्या फायद्याचे आमिष दाखवून खोटी डिमॅट खाती उघडली जात आहेत. शिवाय यासाठी संबंधित गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम बाजारात गुंतवण्यासाठी घेतली जाते. मात्र प्रत्यक्षात ती बाजारात गुंतवली जात नाही.

ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
rbi monetary policy rbi keeps repo rates unchanged reserve bank predicts rising inflation
व्याज दरकपात नाहीच!‘जीडीपी’वाढीच्या अपेक्षांना कात्री; महागाईचा ताप चढण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज
reserve bank predict retail inflation at 4 9 percent for the fy25
महागाईचे चटके वाढणार; रिझर्व्ह बँकेचा चालू आर्थिक वर्षासाठी ४.९ टक्क्यांचा अंदाज
bitcoin price review bitcoin prices got a boost reaches 100000 usd
विश्लेषण : ‘बिटकॉइन’ पोहोचले १ लाख डॉलरवर… का आणि कसे? भारतात मान्यता मिळेल?
sensex jump 110 points to settle at 80956 nifty gained 10 points to end at 24467
खासगी बँकांतील तेजीने ‘सेन्सेक्स’ची शतकी कमाई

हेही वाचा :कसोटीपटूंसाठी ‘बीसीसीआय’कडून प्रोत्साहनपर रक्कम! आयपीएलच्या तोडीचे मानधन मिळेल का?

‘सेबी’चा इशारा काय?

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी असलेल्या डीमॅट खात्यांच्या माध्यमातून ‘संस्थात्मक’ श्रेणीतील गुंतवणूकदार बनून भांडवली बाजारातील गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळवून देण्याच्या अमिषाला न भुलण्याच्या सूचना भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने दिल्या आहेत. फसव्या ट्रेडिंग मंचावरून गुंतवणूकदारांना ‘संस्थात्मक’ गुंतवणूकदारांना मिळणारे फायदे मिळवून देणार असल्याचे सांगितले जाते. शिवाय हे फसवणूक करणारे ऑनलाइन ट्रेडिंग अभ्यासवर्ग, सेमिनार आणि शेअर बाजाराविषयक मार्गदर्शन कार्यक्रमांद्वारे भुरळ घालून ‘सावज’ हेरतात. व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामसारख्या समाजमाध्यमाचा यासाठी दुरुपयोग केला जातो. बाजारात तेजीत असताना, अशा योजनांतून मोठ्या रकमेची फसगत झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन बाजार नियामकांनी हे पाऊल टाकले आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारासह संलग्नतेचा खोटा दावा करणाऱ्या आणि विशेषाधिकारांसह संस्थात्मक खात्यांद्वारे शेअर बाजारात व्यवहाराच्या संधी देण्याचा दावा करणाऱ्या फसव्या ट्रेडिंगमंचाबद्दल ‘सेबी’ला अनेक तक्रारी मिळाल्या असून, गुंतवणूकदारांनीच या संबंधाने सावधगिरी दाखवणे आवश्यक असल्याचे नियामकांचे म्हणणे आहे.

ॲप डाउनलोड केल्यानंतर…

सेबी-नोंदणीकृत दलाली संस्थेचे कर्मचारी किंवा सहयोगी म्हणून ओळख सांगून, बनावट मोबाइल ॲप डाउनलोड करण्यास गुंतवणूकदारांना प्रवृत्त केले जाते. या माध्यमातून त्यांना समभाग खरेदी करण्यास, ‘आयपीओ’साठी अर्ज करण्यास आणि ‘संस्थात्मक’ खात्याचा लाभ मिळवून देण्याबाबत सांगितले जाते. शिवाय यासाठी केवळ मोबाइल क्रमांक आवश्यक असतो असे सांगत ही सर्व प्रक्रिया अधिकृत ट्रेडिंग किंवा डीमॅट खात्याशिवाय शक्य आहे, असे गुंतवणूकदारांना सांगितले जाते.

हेही वाचा :विश्लेषण : पश्चिम बंगालच्या निवडणूक रणात कोणाची सरशी? ममतांच्या साम्राज्याला भाजप धक्का देईल? 

जाळ्यात असे ओढले जाते…

गुंतवणूकदाराला खऱ्या डिमॅट खात्याप्रमाणे (डमी) म्हणजे खरे असल्याचे भासवून बनावट मोबाइल ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. त्यामध्ये गुंतवणूकदाराने गुंतविलेली रक्कम दाखवली जाते. ती गुंतवणूक वाढत गेल्याचे खोट्या पद्धतीने दाखवले जाते. गुंतवणूकदाराला वाढलेल्या नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. शिवाय सुरुवातीला नफ्यातील काही रक्कम गुंतवणूकदाराच्या खात्यात वळतीदेखील केली जाते. त्याचा विश्वास संपादन करून आणखी मोठा लाभ मिळवून देण्याचे त्याला आमिष दाखविले जाते. परिणामी आणखी मोठ्या गुंतवणुकीसाठी पैशांची मागणी केली जाते. शिवाय गुंतवणूकदारांकडून ही रक्कम वेगवेगळ्या यूपीआय खात्यांवर पाठवण्यास सांगितले जाते. बनावट मोबाइल ॲपवर मोठा फायदा दिसू लागल्यावर ती रक्कम मिळविण्यासाठी बँक खात्यात आणखी रक्कम पाठवण्यास सांगितले जाते. शिवाय व्हॉट्सॲप समूह बनवून त्यातदेखील मोठे तज्ज्ञ सामील असल्याचे भासवले जाते. त्यांच्या माध्यमातून सल्ला दिला जातो.

‘सेबी’चा नियम काय सांगतो?

‘सेबी’च्या नियमानुसार, परदेशी संस्थात्मक खात्यांद्वारे गुंतवणुकीचा मार्ग देशांतर्गत गुंतवणूकदारांसाठी खुला नसतो. शिवाय शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांना अनुक्रमे सेबी-नोंदणीकृत दलाल (ब्रोकर) आणि डिपॉझिटरी यांच्याकडे ट्रेडिंग आणि डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. शिवाय कोणतेही व्यवहार याच खात्यामार्फत झाल्याचा पुरावा म्हणून ‘डिजिटल कॉन्ट्रॅक्ट नोट’ही गुंतवणूकदारांना २४ तासांच्या आत मिळणे आवश्यक असते.

हेही वाचा :विश्लेषण : अमेरिकेला गाझाच्या मदतपुरवठ्यासाठी तरंगत्या बंदराची गरज का भासली?

समाजमाध्यम संदेशांपासून सावध…

‘सेबी’ने गुंतवणूकदारांना संस्थात्मक खात्यांच्या माध्यमातून भांडवली बाजारात गुंतवणूक करून मोठा लाभ मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही समाजमाध्यम संदेश, व्हॉट्सॲप समूह, टेलिग्राम चॅनेल किंवा ॲपपासून दूर राहण्यास सांगितले आहे. अशा योजना फसव्या आहेत.

डिमॅट खाते उघडताना काय लक्षात घ्यावे?

शेअर बाजारात कधीही रोखीने व्यवहार होत नाहीत. म्हणजेच आपल्या ट्रेडिंग खात्यात पैसे भरताना ते बँक खात्याच्या मदतीने हस्तांतरित केले जातात. शेअर बाजारात ट्रेडिंग सुरू करण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी, नोंदणीकृत डिपॉझिटरी सहभागी (डीपी) सह डिमॅट अकाउंट उघडणे आवश्यक आहे. हे डीपीएस सामान्यपणे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) सारख्या डिपॉझिटरीद्वारे अधिकृत बँक किंवा ब्रोकरेज फर्म आहेत. एकदा का तुमचे डिमॅट अकाउंट ॲक्टिव्ह झाले की, तुम्हाला लिंक केलेल्या ट्रेडिंग खात्याचीदेखील आवश्यकता असेल. हे ट्रेडिंग खाते शेअर बाजारात खरेदी आणि विक्री ऑर्डर देण्यासाठी वापरले जाते. व्यवहार सुलभ करण्यासाठी दोन्ही खाती कार्य करतात. ज्या ब्रोकरकडे डिमॅट खाते उघडणार आहात तो नोंदणीकृत आहे वा नाही बघणे महत्त्वाचे आहे. ब्रोकर नोंदणीकृत असल्यास त्याला प्रमाणपत्र मिळते. त्या प्रमाणपत्रात दिलेल्या नोंदणी क्रमांकाची सुरुवात INB या आद्याक्षरे होते तर INS या आद्याक्षराने सब-ब्रोकरचा नोंदणी क्रमांक सुरू होतो.

gaurav.muthe@expressindia.com

Story img Loader