तैवानने सोमवारी सांगितले की, वायव्येकडील समुद्रावर एक चिनी बलून सापडला आहे. तैवानमध्ये एप्रिलनंतर पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. रविवारी हा फुगा उत्तरेकडील कीलुंग बंदराच्या १११ किलोमीटर अंतरावर दिसला. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, फुगा बेटाच्या हवाई संरक्षण झोनमध्ये आला. चीन आणि तैवानमध्ये तणाव कायम असताना ही घटना घडली. चीन तैवानला स्वतंत्र राष्ट्र न मानता स्वतःच्या भूभागाचा भाग मानतो, त्यामुळे चीनकडून तैवानवर कायम दबाव निर्माण करण्यात आला आहे. परंतु, हेरगिरीसाठी चीन फुग्याचा वापर का करतो? स्पाय बलून म्हणजे नक्की काय? भारतानेही हेरगिरीसाठी याचा वापर केला आहे का? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पाय बलून

फुगे अनेक दशकांपासून वारंवार वापरात आहेत. प्रामुख्याने वैज्ञानिक हेतूंसाठी त्याचा वापर केला जायचा. मात्र, आता वाढते पर्यटन बघता बलून राईड, हेरगिरीसाठी, आपत्ती निवारणासाठी आणि बचाव मोहिमांमध्येही याचा वापर केला जातो. हाय अल्टिट्यूड म्हणजेच जास्त उंचीवर वापरण्यासाठी तयार करण्यात आलेले ही फुगे फुटबॉल स्टेडियमइतके मोठे असू शकतात. ते जमिनीपासून ४० ते ५० किलोमीटरपर्यंत वर जाऊ शकतात आणि काही हजार किलोग्रॅम पेलोड वाहून नेण्यास सक्षम असतात. यापैकी बहुतेक फुगे पॉलिथिलीनच्या पातळ पत्र्यापासून तयार करण्यात आलेले असतात, जे सामान्य प्लास्टिकच्या पिशव्यांप्रमाणे असतात आणि बहुतेक फुगे हेलियम वायूने भरलेले असतात. फुगे काही तासांपासून ते दोन महिन्यांपर्यंत उड्डाण करू शकतात. हे फुगे दीर्घकाळ हवेत राहू शकतील आणि वातावरणात उंचावर जाऊ शकतील, यासाठीच अधिक प्रगत सामग्रीपासून तयार करण्यात आलेले असतात. फुग्यांमध्ये सामान्यत: एक टोपली जोडलेली असते, ज्याला गोंडोला म्हणतात. त्यामध्ये माणसं किंवा इतर वस्तू ठेवल्या जाऊ शकतात. मानवरहित उड्डाणांमध्येही गोंडोला फुग्याला जोडलेले असतात.

फुगे अनेक दशकांपासून वारंवार वापरात आहेत. प्रामुख्याने वैज्ञानिक हेतूंसाठी त्याचा वापर केला जायचा. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : COP29: ३०० अब्ज डॉलर्सची मदत भारताने नाकारली, वादग्रस्त हवामान करार नक्की काय? त्यावरून विकसनशील देश का संतापले?

वैज्ञानिक मोहिमा

फुग्यांचा सर्वाधिक वापर वैज्ञानिक संशोधनात केला जातो. प्रगत उपग्रहांच्या काळातही अशा अनेक परिस्थिती उद्भवतात; ज्यात फुगे अधिक योग्य मानले जातात. हवेचे तापमान, दाब, वाऱ्याचा वेग आणि दिशा, एरोसोलचे प्रमाण मोजण्यासाठी हवामान संस्था नियमितपणे फुग्यांचा वापर करतात. आजचे महाकाय फुगे ज्या उंचीवर पोहोचू शकतात, त्यामुळे ते खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि अवकाश संस्थांसाठी उपयुक्त मानले जातात. ज्या उंचीवर विमान जाऊ शकतात, त्याच्याही वर म्हणजेच पृथ्वीच्या कक्षेच्या खाली आणि पृथ्वीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर हे फुगे उडू शकतात. बऱ्याचदा ते पृथ्वीच्या विशिष्ट भागांचे निरीक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरतात आणि उपग्रहांपेक्षा हजारो पट स्वस्तदेखील असतात. त्याशिवाय फुगे त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर खाली आणले जात असल्याने, वापरलेली उपकरणे पुनर्प्राप्त करण्यायोग्य आणि पुन्हा वापरण्यायोग्य असतात. नासाचा एक बलून कार्यक्रमदेखील आहे, जो दरवर्षी चार ते पाच प्रक्षेपण करतो. अनेक विद्यापीठे आणि संशोधन संस्था संशोधन कार्यासाठी फुग्यांचा वापर करतात. बलून आधारित प्रयोगांमुळे १९३६ आणि २००६ मध्ये भौतिकशास्त्रासाठी किमान दोन नोबेल पारितोषिके मिळाली आहेत.

हेरगिरीच्या कारवायांसाठीही स्पाय बलूनचा वापर केला जातो. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेरगिरीसाठी फुग्याचा वापर

हेरगिरीच्या कारवायांसाठीही स्पाय बलूनचा वापर केला जातो. त्यांचा वापर फारसा सामान्य नाही. कारण ड्रोन आणि उपग्रहांचा वापर आजकाल अधिक प्रमाणात केला जातो आणि गुप्तचर विमाने पहिल्या महायुद्धापासून वापरात आहेत. पण, त्यांच्या तुलनेत फुग्यांचे काही फायदे आहेत. ते म्हणजे फुगे एका क्षेत्रावर दीर्घकाळ फिरू शकतात. मोठे फुगे काही हजार किलोग्रॅम पेलोड वाहून नेऊ शकतात, याचा अर्थ त्यावर हेरगिरीची साधने बसवली जाऊ शकतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांची ओळख पटणे कठीण असते. त्यांच्या मंद हालचालीमुळे, फुगे बहुतेकदा संरक्षण रडारद्वारे पक्षी म्हणून ध्वजांकित केले जातात. फुग्यांमध्ये विमान, ड्रोन किंवा सॅटेलाइटच्या अत्याधुनिक नेव्हिगेशन सिस्टमचा अभाव असतो, जो मुख्यत्वे वाऱ्याचा वेग आणि दिशा यांच्यावर अवलंबून असतो. परंतु, ४ फेब्रुवारी रोजी खाली पडलेल्या फुग्याला सौर पॅनेल जोडलेले दिसत होते; ज्यामुळे ते ऑनबोर्ड प्रोपल्शन यंत्रास ऊर्जा देत असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : जामा मशीद की हरिहर मंदिर? मशिदीच्या सर्वेक्षणावरून उफाळला हिंसाचार; प्रकरण काय?

भारतात फुग्यांचा वापर

वैज्ञानिक फुगा भारतात ७० वर्षांहून अधिक काळ वापरला जात आहे. पहिल्यांदा फुगा १९४८ मध्ये होमी भाभा यांनी वैश्विक किरण संशोधनासाठी पाठवला होता. मुंबईस्थित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने १९५० च्या दशकात बलून फॅब्रिकेशनचे काम सुरू केले आणि मुंबई व हैदराबाद येथून अनेक बलून उड्डाणे सुरू करण्यात आली. काहीवेळा नंतर १९६९ मध्ये, TIFR ने हैदराबादमध्ये भारतातील सर्वात मोठी बलून सुविधा सुरू केली. विविध संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञांनी आतापर्यंत ५०० हून अधिक उड्डाणे सुरू करण्यासाठी याचा वापर केला आहे. इस्रो अंतर्गत अंतराळ संस्था आणि पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजीसारख्या हवामान संशोधन संस्थांद्वारे ते नियमितपणे वापरले जाते. बंगळुरूस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स आणि हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठासारख्या संस्था तसेच काही खाजगी शैक्षणिक संस्थांमध्येही बलून कार्यक्रम आहेत.