सीरियामध्ये अल-असद घराण्याची ५० वर्षांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर आता नवी राज्ययंत्रणा आकाराला येत आहे. त्याच वेळी राजधानी दमास्कसचा पाडाव झाला त्या दिवशी नेमके काय घडले याची अत्यंत रंजक माहितीही समोर येत आहे. युरोप-अमेरिकेतील माध्यमांनी विविध देशांचे मुत्सद्दी, असद यांचे निकटवर्ती, अध्यक्षांच्या प्रासादातील अधिकारी आणि काही बंडखोर नेते यांच्या मुलाखती त्यांची नावे न सांगण्याच्या अटीवर प्रसिद्ध केल्या आहेत. त्याआधारे सत्तांतराचा घटनाक्रम कसा होता, हे सविस्तर मांडण्याचा प्रयत्न…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
७ डिसेंबरला चित्र काय होते?
हा दिवस सीरिया आणि पश्चिम आशियासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. ३० नोव्हेंबरला उत्तर सीरियातील अलेप्पो हे मोठे शहर बंडखोरांच्या ताब्यात गेले. त्यानंतर लगेचच त्यांनी दक्षिणेला दमास्कसच्या दिशेने कूच केली. मात्र अवघ्या ८-१० दिवसांत देशाची राजधानी बंडखोरांच्या ताब्यात जाईल आणि असद यांना पळून जावे लागेल, याची तेव्हा कुणीही कल्पना केली नव्हती. वेगाने पुढे सरकणाऱ्या बंडखोरांच्या फौजा रोखण्यात सीरियाचे थकलेले लष्कर सपशेल अपयशी ठरले आणि फारसा रक्तपात न होता ऐतिहासिक महत्त्व असलेली सीरियाची ही राजधानी बंडखोरांच्या ताब्यात गेली. पहाटेच्या अंधारात बशर अल-असद राजधानीतून पळून गेले. ते नेमके कुठे आहेत, देशातच आहेत की त्यांनी अन्यत्र आश्रय घेतला आहे, ते जिवंत तरी आहेत की त्यांची हत्या झाली याबाबत स्पष्टता नसल्यामुळे एकूणच गोंधळाची स्थिती होती. कालांतराने रशियाने अल-असद देशाबाहेर गेल्याचे आणि नंतर मॉस्कोमध्ये दाखल झाल्याचे जाहीर केले. मात्र राष्ट्राध्यक्ष परागंदा होत असताना त्यांनी आपल्या अत्यंत निकटवर्तीयांनाही अंधारात ठेवल्याचे उघड झाले आहे.
हेही वाचा >>> ‘ड्रेसकोड’ वादावरून विख्यात बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनची जागतिक स्पर्धेतून माघार! नक्की प्रकरण काय?
अध्यक्षीय प्रासादात काय घडत होते?
बंडखोरांनी हमा हे शहर ताब्यात घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने दमास्कसमधील अध्यक्षीय प्रासादाला पहिला हादरा बसला. हमापाठोपाठ बंडखोर आणि राजधानीच्या दरम्यान असलेल्या होम्स या अखेरच्या शहराचाही ७ डिसेंबरच्या सकाळी पाडाव झाला. एकीकडे बंडखोर वेगाने राजधानीच्या दिशेने येत असताना अध्यक्षीय प्रासादात वेगळीच गडबड सुरू होती. अल-असद राष्ट्राला उद्देशून संदेश देणार होते आणि त्यात विरोधकांना सत्तेत वाटा देण्याचा प्रस्ताव असणार होता. एकदा हा संदेश पोहोचला की आगेकूच थांबवून बंडखोर चर्चेला येतील, असा अध्यक्षांच्या सल्लागारांचा होरा होता. त्यामुळे भाषणातील शब्दा-शब्दावर प्रचंड खल होऊ संदेशाला आकार दिला जात होता. दुसरीकडे राष्ट्रीय वाहिनीला ‘स्टँड बाय’ ठेवण्यात आले होते आणि प्रासादामध्ये वाहिनीचे कॅमेरे सज्ज होते. कोणत्याही क्षणी अल-असद थेट संदेश देण्यासाठी पडद्यावर येतील असे सांगण्यात आले होते. मात्र ही वेळ सातत्याने लांबणीवर टाकली जात होती. अखेर पहाटेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष कुणालाही न सांगता आपले निवडक सहकारी आणि सुरक्षा रक्षकांसह प्रासादाबाहेर पडल्याचे समजल्यानंतर तेथे भीतीची लहर उमटली. अल-असद नेमके कुठे गेले आणि ते परत येणार आहेत का, हे तेथे उपस्थित असलेल्या एकालाही माहिती नव्हते.
अल-असद कुटुंब सीरियातून कसे पळाले?
७ तारखेला संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी गुपचूप राजधानी सोडली आणि ते खासगी वाहनातून बंडखोरांपासून आणखी लांब, उत्तरेकडील रशियाच्या लष्करी तळाकडे निघाले. तेथे पोहोचल्यावर रशियाच्या जेटने त्यांनी थेट मॉस्को गाठले. त्यांचा थोरला मुलगा हाफेज अल-असद हा उच्चशिक्षणासाठी मॉस्कोमध्ये होता आणि त्यांची पत्नी, सीरियाची माजी ‘फर्स्ट लेडी’ आसमा अल-असद हाफेजबरोबरच होत्या. सीरियाच्या सैन्यात वरिष्ठ अधिकारी असलेला राष्ट्राध्यक्षांचा भाऊ महेर अल-असद वाळवंटातून मार्ग काढत इराकला पळल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांचे सध्याचे ठिकाण अज्ञात आहे. अल-असद यांचे पलायन इतके गुप्त ठेवले गेले की अत्यंत जवळच्या प्रासादातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही अंधारात ठेवण्यात आले होते. तब्बल २० वर्षे देशावर पोलादी पकड ठेवताना साथ दिलेल्यांनाही अखेर अल-असद यांनी का दगा दिला असावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
भाषणाचा घाट इराणच्या सल्ल्यामुळे?
अत्यंत वेगाने राजधानीच्या दिशेने निघालेल्या बंडखोरांना आपले लष्कर थांबवू शकणार नाही, याची पूर्ण कल्पना अल-असद यांना आली होती. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांनी आपल्या पाठिराख्यांना मदतीसाठी साद घातली. मात्र अल-असद राजवटीच्या पाठीशी ठामपणे उभ्या असलेल्या इराणचे स्वत:चेच हात सध्या दगडाखाली अडकले आहेत. अल-असद राजवटीला मदत करण्याचा इराणचा सर्वांत मोठा स्रोत म्हणजे लेबनॉनमधील हेजबोला गट. मात्र इस्रायलने या गटाचे पुरते कंबरडे मोडले आहे. पेजर-वॉकी टॉकी स्फोट, नंतर हवाई हल्ले आणि अखेरीस लेबनॉनमध्ये सैन्य घुसवून इस्रायलने हेजबोलाचे हजारो अतिरेकी ठार केले. त्यांचे जवळजवळ सर्व वरिष्ठ नेते मारले गेले आहेत. इराणमधून थेट लष्करी मदत पाठविल्यास योग्य उत्तर देण्याचा इशारा इस्रायलने दिल्यानंतर इराणचा तो मार्गही बंद झाला. त्यामुळे बंडखोरांपुढे चर्चेचा प्रस्ताव ठेवा व तयारीला अधिक वेळ पदरात पाडून घ्या, असा सल्ला तेहरानमधून देण्यात आल्याचे सांगितले जाते. अल-असद यांच्या संभाव्य भाषणाचे कारण हे असू शकते… मात्र याला किती यश येईल, याची खात्री नसल्यामुळेच त्यांनी देश सोडला असावा असे मानले जात आहे.
‘मित्रां’नी साथ सोडल्यामुळे पलायन?
एकीकडे इराणने सबुरीचा सल्ला दिल्यानंतर अल-असद यांनी आपले दुसरे श्रद्धास्थान, म्हणजे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडे मोर्चा वळविला. २०१५ साली बंड मोडून काढण्यात रशियानेच अल-अलद यांना सक्रिय मदत केली होती. मात्र यावेळी स्वत:च ओढवून घेतलेल्या युद्धात गुंतलेल्या रशियाला त्याची पुनरावृत्ती करणे केवळ अशक्य होते. शेवटी शेवटी पुतिन यांनी अल-असद यांचे फोन घेणेही बंद केल्याचे सांगितले जाते. इराण-रशियाने अंग काढून घेतल्यानंतर सीरियाच्या अध्यक्षांनी शेवटचा प्रयत्न करून बघितला तो इराकची मनधरणी करण्याचा… त्यांनी आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना बगदादला पाठविले आणि इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदनी यांना मदतीसाठी गळ घातली. अल-असद यांचा पाडाव झाला तर इराकला धोका असल्याचे त्यांनी सांगून पाहिले. मात्र इराकचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष आणि कायदेमंडळाचे सभापती या तिघांनीही अल-असद यांना मदत करण्यास नकार दिला. तिसरी महत्त्वाची घटना घडली ती कतारची राजधानी दोहा येथे… तेथे सहा अरब देशांच्या प्रतिनिधींची बैठक झाली व आता अल-असद सरकार वाचविणे अशक्य आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे सत्ता वाचविण्याचे अल-असद यांच्यापुढील सर्वच मार्ग बंद झाले. एकतर पळून जायचे किंवा सुळावर लटकायचे हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर उरले…
निकटवर्तीयांना अंधारात ठेवून पळ?
अल-असद यांच्या पलायनानंतर मागे राहिलेल्या सहकाऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. काही जण आपला जीव वाचवून राजधानीतून पळाले, काही जण लपून बसले, तर काही बंडखोरांच्या हाती लागले. ‘आता पुढे काय’ हा प्रश्न या सर्वांनाच सतावत असताना एवढी वर्षे प्रामाणिकपणे सेवा केल्यानंतरही अल-असद यांनी धोका दिल्याची यातील बहुतेकांची भावना आहे. आपल्याला अंधारात ठेवण्यासाठी राष्ट्राला उद्देशून भाषणाचा केवळ बनाव रचण्यात आला असावा, अशीही काही जणांना शंका आहे. यातील खरे-खोटे बशर अल-असद यांनाच ठावूक असेल. कदाचित ते भविष्यात कधीतरी उजेडात येईल किंवा यु्द्धाच्या अन्य कहाण्यांप्रमाणेच हीदेखील एक दंतकथा बनून राहील.
amol.paranjpe@expressindia.com