मधुमेहावर कोणताही उपचार नाही. मधुमेह या आजाराचे एकदा निदान झाल्यास त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, आता चीनच्या शास्त्रज्ञांनी पेशी (सेल्स) प्रत्यारोपणाचा वापर करून, टाईप-१ मधुमेहाच्या रुग्णाला बरे केल्याचा दावा केला आहे. ही जगातील अशी पहिलीच घटना असल्याचे म्हटले जात आहे. २५ वर्षीय रुग्णावर हा उपचार यशस्वी झाला आहे. सुमारे २.५ महिन्यांत रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरीत्या कमी करण्यात यश आले असल्याचे शांघाय-आधारित न्यूज आउटलेट ‘द पेपर’ने सांगितले आहे. गेल्या आठवड्यात पीअर-रिव्ह्यू केलेल्या जर्नल ‘सेल’मध्ये त्यांचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले होते. काय आहे ही नवीन उपचारपद्धती? त्यामुळे खरंच मधुमेह नियंत्रणात येणार का? त्याविषयी जाणून घेऊ.

नवीन उपचारपद्धती काय आहे?

चीनच्या टियांजिन येथील तरुणीला ११ वर्षांपूर्वी टाईप-१ मधुमेहाचे निदान झाले होते. चीनमधील संशोधकांनी ‘स्टेम सेल ट्रान्सप्लांट’द्वारे तरुणीला बरे करण्याचा दावा केला. टियांजिन फर्स्ट सेंट्रल हॉस्पिटल आणि पेकिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना गेल्या वर्षी जूनमध्ये याबाबतच्या क्लिनिकल संशोधनासाठी अधिकृत मान्यता मिळाली आणि त्यानंतर त्यांनी पहिल्या रुग्णावर प्रत्यारोपण उपचारपद्धतीचा अवलंब केला. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, उपचारांमध्ये रासायनिकरीत्या ‘प्लुरिपोटेंट स्टेम सेल आयलेट्स’ किंवा ‘सीआयपीएससी आयलेट्स’चा वापर केला जातो. संशोधक रुग्णाच्या पेशी गोळा करतात आणि या पेशींची ‘प्लुरिपोटेंट स्टेम सेल’शी प्रक्रिया केली जाते. या पेशींचे नंतर आयलेट पेशींमध्ये रूपांतर केले जाते आणि नंतर त्यांचे पोटाच्या स्नायूंमध्ये इंजेक्शनद्वारे प्रत्यारोपण केले जाते, ज्याने रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात राहते.

accuracy of facial recognition technology
कुतूहल : चेहऱ्यावरून ओळख पटवताना सावधान!
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Xiaomi Diwali With Mi Offers
Xiaomi Diwali With Mi : रेडमीच्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार सहा हजारांची सूट; सेलच्या ऑफर्स, डिस्काउंटची ‘ही’ यादी पाहाच
smokers and non addicts are also becoming victims of lung cancer
मुंबई : वाढत्या वायू प्रदुषणाचा धोका; धूम्रपान न करणारेही फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या विळख्यात…वाचा कसे ते…
artificial intelligence diagnose heart failure
कुतूहल: श्रमता हृदय हे!
policy change in one commodity can instantly affect the entire commodity and stock markets
क… कमॉडिटीचा: धोरणबदलांची क्षेपणास्त्रे
coconut peel benefits 6 benefits of health from coconut
नारळाची साल फेकताय? थांबा! नारळाच्या सालीपासून आरोग्याला होणारे ‘हे’ ६ फायदे एकदा पाहाच
loksatta kutuhal artificial intelligence and human creativity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता
उपचारांमध्ये रासायनिकरीत्या ‘प्लुरिपोटेंट स्टेम सेल आयलेट्स’ किंवा ‘सीआयपीएससी आयलेट्स’चा वापर केला जातो. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : व्हेल माशाची उलटी कशी ओळखतात? बाजारात कोट्यवधीत विकल्या जाणार्‍या उलटीचा कशासाठी वापर केला जातो?

उपचाराचा काय परिणाम झाला?

सीआयपीएससी आयलेट प्रत्यारोपणानंतर रुग्णाच्या रक्तातील शर्करेची पातळी हळूहळू सामान्य झाली आणि इन्सुलिनवरील तिचे अवलंबित्व हळूहळू कमी झाले, असे सशोधकांचे सांगणे आहे. प्रक्रियेनंतर ७५ दिवसांनी तिला लागणार्‍या इन्सुलिन इंजेक्शनची गरज पूर्णपणे थांबली, असेही त्यांनी सांगितले. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या मते, ही सुधारणा एक वर्षाहून अधिक काळापासून टिकून आहे. यापूर्वी महिलेला रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये अनेक बदल दिसून यायचे. परंतु, प्रत्यारोपणानंतरचे पाच महिने तिच्या रक्तातील साखरेची पातळी ९८ टक्क्यांपेक्षा जास्त राहिली आणि ही स्थिरता कायम राहिली. एक वर्षानंतरचा परिणाम पाहता, संशोधकांनी सांगितले की, प्रत्यारोपणाचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. त्यामुळे महिलेवर केलेला उपचार यशस्वी झाला आहे, असे म्हणता येईल.

“रुग्णामध्ये या उपचारानंतर दिसून आलेले परिणाम पाहता, टाईप-१ मधुमेहासाठी सीआयपीएससी आयलेट प्रत्यारोपणाचे मूल्यांकन करणार्‍या अभ्यासांची आवश्यकता आहे,” असेही संशोधकांनी नमूद केले. ‘पेकिंग युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स सेंटर’च्या वेबसाइटवरील अहवालानुसार, “यामुळे मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी सेल थेरपीच्या वापराचा मार्ग मोकळा होऊ शकतो.” संशोधक हेदेखील नमूद करतात की, हीच उपचारपद्धती वापरून आणखी दोन रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. उपचाराला एक वर्ष पूर्ण होताच त्यांचीही रक्तशर्करा चाचणी करण्यात येणार आहे.

चीनमधील संशोधकांनी ‘स्टेम सेल ट्रान्सप्लांट’द्वारे तरुणीला बरे करण्याचा दावा केला. (छायाचित्र-रॉयटर्स)

पूर्वीची उपचारपद्धती कशी होती?

आयलेट प्रत्यारोपणामध्ये सामान्यतः मृतदात्याच्या स्वादुपिंडातून आयलेट पेशी काढून, त्या टाईप-१ मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या यकृतामध्ये प्रत्यारोपित केल्या जात असत. हा एक प्रभावी उपचार मानला जातो. मात्र, दात्यांच्या कमतरतेमुळे ही उपचारपद्धती वापरणे शक्य होत नाही. स्वादुपिंडातील आयलेट पेशी इन्सुलिन आणि ग्लुकागॉनसारखे संप्रेरके (हार्मोन्स) तयार करतात, जी नंतर रक्तप्रवाहात सोडली जातात आणि त्यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रित होण्यात मदत मिळते. आता स्टेम सेल प्रक्रियेने मधुमेहावरील उपचारांसाठी नवीन शक्यता समोर आल्या आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा : पाकिस्तानचं सिद्दीकी कुटुंब ‘शर्मा’ बनून भारतात का आले? मुस्लीम असूनही शेजारी देश सोडण्याचं खरं कारण काय?

जगाला असणारा मधुमेहाचा धोका

मधुमेहाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रत्येकी १० पैकी एक व्यक्ती किंवा ५३७ दशलक्ष प्रौढांना मधुमेह आहे. २०३० पर्यंत ही संख्या ६४३ दशलक्ष आणि २०४५ पर्यंत ७८३ दशलक्ष होण्याचा अंदाज आहे, असे ‘आयडीएफ डायबिटीज अॅटलस’ने सांगितले आहे. टाईप-१ चा मधुमेह हा रोगाच्या सर्व प्रकरणांपैकी पाच टक्के आहे. टाईप-२ मधुमेहाला जीवनशैलीच्या घटकांशी जोडले जाते; तर टाईप-१ चा मधुमेह ही एक स्वयंप्रतिकार स्थिती आहे. या स्थितीत शरीराची रोगप्रतिकार प्रणाली स्वादुपिंडातील इन्सुलिन-उत्पादक पेशी नष्ट करते. ही स्थिती बहुतेकदा मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये विकसित होते. बाह्य इन्सुलिन आणि इम्युनोसप्रेसंट्स बहुतेकदा रक्तशर्करेच्या पातळीचे नियंत्रण करण्यासाठी वापरले जातात.