क्रिप्टो म्हणजेच आभासी चलन गुंतवणुकीकडे अजूनही मोठा वर्ग कुतूहलसम साशंकतेने पाहतो. या चलनाबद्दल फारशी माहिती सर्वसामान्यांना नाही, अशी चर्चा नेहमी होत असते. आभासी चलन गुंतवणूक ही केवळ महानगरांमध्ये होते, असेही वारंवार बोलले जाते. या सर्व समजांना छेद देणारे वास्तव आता समोर आले आहे. प्रत्यक्षात ही गुंतवणूक महानगरांमधून आता छोट्या शहरांपर्यंत पोहोचली. गेल्या काही वर्षांत छोट्या शहरांमधील आभासी चलन गुंतवणूक लक्षणीयरीत्या वाढत आहे. मोबाइल उपयोजनाच्या (ॲप्लिकेशन) माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आभासी चलनात घरबसल्या गुंतवणूक करू शकत आहेत. यामुळे भविष्यात आभासी चलन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, असे चित्र आहे.

दिल्ली, बंगळुरू, मुंबईचे वर्चस्व?

‘कॉइनस्विच’ या आभासी चलन मंचाने ‘इंडियाज क्रिप्टो पोर्टफोलिओ २०२४ : हाऊ इंडिया इन्व्हेस्ट्स’ हा अहवाल जाहीर केला आहे. देशातील वैविध्यपूर्ण आभासी चलन परिसंस्था आणि डिजिटल मालमत्तेत वाढत असलेला सहभाग यावर या अहवालातून प्रकाश टाकण्यात आला आहे. या अहवालानुसार, देशातील क्रिप्टो गुंतवणुकीत दिल्ली, बंगळुरू आणि मुंबई या शहरांचे वर्चस्व आहे. या शहरांचा क्रिप्टो गुंतवणुकीत वाटा अनुक्रमे २०.१ टक्के, ९.६ टक्के आणि ६.५ टक्के आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या शहरांमध्ये गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे.

traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
stock market ups downs loksatta
Money Mantra : कधी अप कधी डाऊन ! गुंतवणूकदारांनी करायचं तरी काय ?
GST Council Meeting (1)
जीएसटी परिषदेची बैठक संपन्न! देशात काय स्वस्त, काय महागणार?
37 thousand cybercrime complaints in year and fraud of Rs 429 crore with citizens in Pimpri Chinchwad
Cyber Crime: काय सांगता? वर्षभरात ४२९ करोडचा नागरिकांना गंडा; ३७ हजार तक्रारी, नेमकं सायबर पोलीस काय म्हणाले? वाचा..
cryptocurrency investment
क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीत देशात पुणे पाचवे! जाणून घ्या सर्वाधिक गुंतवणूक कशात अन् गुंतवणूकदार कोण…
Suspicion of allocation of Rs 50 crore to private developers under Pradhan Mantri Awas Yojana
प्रकल्प सुरू होण्याआधीच निधीचे वितरण? पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना ५० कोटींचे वाटप झाल्याचा संशय
High level committee to find new sources of income Nagpur news
राज्यासमोर आर्थिक आव्हान; उत्पन्नाचे नवे स्राोत शोधण्यासाठी उच्चस्तरीय समिति

हेही वाचा : विश्लेषण : मुंबई महापालिकेचा भूखंड लिलाव योग्य की अयोग्य?

इतर शहरांमध्ये काय स्थिती?

देशातील आभासी चलन गुंतवणुकीत दिल्ली, बंगळुरू आणि मुंबईनंतर हैदराबाद ५.१ टक्के वाट्यासह चौथ्या स्थानी, पुणे ३.५ टक्क्यांसह पाचव्या, जयपूर ३.३ टक्क्यांसह सहाव्या, ठाणे २.६ टक्क्यांसह सातव्या, लखनौ २.४ टक्क्यांसह आठव्या, कोलकाता २.१ टक्क्यांसह नवव्या आणि बोतड १.९ टक्क्यांसह दहाव्या स्थानी आहे. पहिली दहा शहरे वगळता देशातील इतर भागांचा आभासी चलन गुंतवणुकीतील वाटा ४२.९ टक्के आहे. गुजरातमधील बोतड या शहराने यंदा पहिल्यांदाच पहिल्या १० शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. याचबरोबर आसाममधील बरबाका, पंजाबमधील जालंदर व लुधियाना, बिहारमधील पाटणा, तमिळनाडूतील कांचीपुरम आणि उत्तराखंडमधील डेहराडून या शहरांतून आभासी चलन गुंतवणूक वाढली आहे. यावरून आभासी चलन गुंतवणुकीची पाळेमुळे आता दूरपर्यंत रूजू लागल्याचे स्पष्ट होत आहे.

कोणते शहर फायद्यात?

देशातील प्रमुख १० शहरांमध्ये सर्वाधिक परतावा मिळणारे आभासी चलन गुंतवणूकदार पुण्यातील ठरले आहेत. देशातील प्रमुख १० शहरांमध्ये आभासी चलन गुंतवणुकीत पुणे पाचव्या स्थानी आहे. पुण्यातील गुंतवणूकदारांमधील ७६ टक्के पुरुष आणि २४ टक्के महिला आहेत. पुण्यातील सर्वाधिक ३९ टक्के गुंतवणूकदारांकडून लार्ज कॅपला पसंती दिली जात आहे. त्या खालोखाल ब्लू चिप ३१ टक्के, मिड कॅप २६ टक्के आणि स्मॉल कॅप ४ टक्के असे प्रमाण आहे. पुण्यातील ८६ टक्के गुंतवणूकदार फायद्यात, तर १४ टक्के गुंतवणूकदार तोट्यात आहेत.

हेही वाचा : २०२५ मध्ये मोठ्या धोक्याची चिंता? बर्ड फ्लू म्यूटेशनने जगभरात संकटाची स्थिती? वैज्ञानिकांनी वर्तवली भीती

पसंती कशाला?

गुंतवणूकदारांचे मीम कॉइन्सला सर्वाधिक प्राधान्य असून, एकूण आभासी चलन गुंतवणुकीत त्यांचा १३ टक्के वाटा आहे. मीम कॉइन्समध्ये डॉजकॉइन ५५ टक्क्यांसह आघाडीवर असून, त्यानंतर पेपे कॉईन आणि बाँक कॉईन आहे. पेपे कॉईनने या वर्षी १३०० टक्के वाढ नोंदवत सर्वांत चांगली कामगिरी करणाऱ्या आभासी चलनात स्थान मिळवले आहे. याचबरोबर बिटकॉइन आणि इथरिअमचे गुंतवणुकीतील प्रमाण अनुक्रमे ७ टक्के व ६ टक्के असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गुंतवणूकदार कोण?

देशात दोन कोटींहून अधिक आभासी चलन गुंतवणूकदार आहेत. आभासी चलन गुंतवणुकीत ३५ वर्षांखालील गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून, एकूण गुंतवणूकदारांपैकी ७५ टक्के याच वयोगटातील आहेत. याच वेळी ३६ ते ४५ वयोगटातील गुंतवणूकदारांची संख्याही सातत्याने वाढत आहे. गुंतवणूकदारांमध्ये महिलांचे प्रमाण तुलनेने कमी असून, एकूण गुंतवणूकदारांपैकी केवळ ११ टक्के महिला असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : तुम्हीही इंजेक्शनला घाबरता? आता सुईशिवाय मिळणार इंजेक्शन; काय आहे वेदनारहित शॉक सिरिंज?

आगामी काळात काय चित्र?

जागतिक आभासी चलन परिसंस्थेसाठी हे वर्ष अतिशय महत्त्वाचे ठरले. या क्षेत्राच्या वाढीसाठी राजकीय आणि धोरणात्मक बदल घडले आहेत. भारताचा विचार करता आभासी चलन गुंतवणुकीत मोठी वाढ होत आहे. पूर्वी फक्त महानगरांमध्ये केंद्रित झालेली ही गुंतवणूक आता छोट्या शहरांमध्ये विस्तारली आहे. याबरोबर भारतीय गुंतवणूकदार आभासी चलनाच्या विविध प्रकारांमध्ये गुंतवणूक करून त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणत आहेत. चालू वर्षात बिटकॉइनने १ लाख डॉलरचा टप्पा पार करत २०२५ मधील प्रगतीच्या उत्साहवर्धक प्रवासाला सुरुवात करून दिली आहे. चालू वर्षातील कामगिरी पाहता पुढील वर्षात अधिक गती मिळेल आणि हे क्षेत्र नव्या शिखरावर पोहोचेल, असा अंदाज कॉइनस्विचचे उपाध्यक्ष बालाजी श्रीहरी यांनी वर्तविला आहे.

sanjay.jadhav@expressindia.com

Story img Loader