महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) प्रतिबंधित क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना पुरविल्याच्या आरोपावरून माझगाव गोदीतील एका ३१ वर्षीय स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरला अटक केली. आरोपी कल्पेश बैकर याला हनी ट्रॅपद्वारे अडकवण्यात आल्याचा संशय असून याप्रकरणी एटीएसने कल्पेश व संपर्कात असलेल्या इतरांविरूद्ध शासकीय गुपीत कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पण हे पहिले प्रकरण नाही. हनी ट्रॅप म्हणजे काय, ते देशाच्या सुरक्षेसाठी कसे घातक ठरत आहे, हे जाणून घेऊ या…

काय आहे प्रकरण?

एटीएसने देशाच्या सुरक्षेसंदर्भातील महत्त्वाची माहिती पाकिस्तानी गुप्तचर विभागाला पुरवल्याच्या आरोपाखाली माझगाव गोदीतील कर्मचाऱ्याला अटक केली. आरोपी कल्पेश बैकर अनेक महिन्यांपासून समाज माध्यमावर एका महिलेशी चॅटिंग करीत होता. महिलेच्या सूचनेनुसार तो तिला माहिती देत असल्याचा आरोप आहे. चौकशीत आरोपीची २०२१ ते २०२३ या कालावधीत फेसबुक व व्हॉट्स ॲपद्वारे पाकिस्तानी गुप्तचर विभागाशी संबंधित एका महिलेची ओळख झाल्याचे उघड झाले. तपासणीत त्याने फेसबुक मेसेंजर व व्हॉट्स ॲपद्वारे प्रतिबंधक क्षेत्रातील गोपनीय माहिती महिलेला पुरवल्याचे निष्पन्न झाले.

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
senior citizen who wants to remarry was defrauded by cyber thieves
पुनर्विवाहाच्या आमिषाने कर्वेनगर भागातील ज्येष्ठाची फसवणूक, ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाईची धमकी
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

हेही वाचा : विश्लेषण : निअँडरथाल शिकारी, इराणी शेतकरी ते मध्य आशियाई गुराखी…भारतीय नक्की उत्क्रांत झाले कसे?

कोणती गोपनीय माहिती पुरवल्याचा संशय आहे?

कल्पेशने युद्धनौका व पाणबुड्यांच्या संरचनांचे आरेखन पाठवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी २०२० पासून तेथे कंत्राटी पद्धतीवर कामाला होता. यापूर्वी त्याच्या कंत्राटाचे तीन वेळा नूतनीकरण झाले आहे. आरोपीने महिलेच्या संपर्कात असताना माझगाव गोदीत आलेल्या युद्धनौका व पाणबुड्यांच्या रचनांची माहिती देणारे आरेखन आरोपीने महिलेला पुरवल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या एटीएस करीत आहे.

यापूर्वीही अशी प्रकरणे घडली आहेत का?

होय, यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील नौदल गोदीत काम करणाऱ्या २३ वर्षीय गौरव पाटीलला पाकिस्तानस्थित इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या (पीआयओ) एजंटला गोपनीय माहिती दिल्याप्रकरणी अटक केली होती. त्याला बोलण्यात गुंतवून गोपनीय माहिती मिळवण्यात आली होती. बैकर व पाटील यांच्या प्रकरणांमध्ये ऑनलाईन हनी ट्रॅपचा वापर करण्यात आला होता. अलिकडेच भारतीय संरक्षण कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी, तसेच लष्करी जवानांना पाकिस्तानी गुप्तचरांनी हनी ट्रॅप केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. हनी ट्रॅपिंग ही गुप्तचर संस्थांद्वारे वापरण्यात येणारी एक सामान्य पद्धत आहे. पण गंभीर बाब म्हणजे ही प्रकरणे शारीरिक संपर्काऐवजी सायबर स्पेसमध्ये घडतात. महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या संशोधन आणि विकास आस्थापना (डीआरडीओ) प्रयोगशाळेचा प्रमुख शास्त्रज्ञ कुरुलकर यास कथित पाकिस्तानी गुप्तचर एजंट झारा दासगुप्ताला संवेदनशील माहिती दिल्याप्रकरणी अटक केली होती.

हेही वाचा : विश्लेषण : स्मॉल-मिडकॅप फंडांच्या भाव तेजीवर सेबीचा आक्षेप काय? या वाढीस ‘बुडबुडा’ का संबोधले?

हनी ट्रॅप म्हणजे नक्की काय?

हनी ट्रॅपिंग ही एक अन्वेषणात्मक पद्धत आहे. एखाद्या व्यक्तीकडून महत्त्वपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी ही पद्धत वापरण्यात येते. या पद्धतीचा समावेश हेरगिरीच्या पद्धतींमध्येच मोडतो. देश, राज्य, स्थानिक, वैयक्तिक अशा सर्वच पातळीवर ही पद्धत अवलंबण्यात येते. इतर गुप्तहेरगिरी करण्याच्या पद्धतींमध्ये फरक आहे. या पद्धतीत प्रामुख्याने लैंगिक, रोमँटिक (प्रेम) भावभावनांचा शस्त्र म्हणून तुमच्या व तुमच्या देशाविरोधात वापर करण्यात येतो. अगदीच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर गुप्तहेर स्त्री किंवा पुरुष महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी संबंधित व्यक्तीला प्रेमाच्या – लैंगिक आकर्षणाच्या जाळ्यात ओढतात. भावनिक बंधनात अडकवून संबंधितांकडून हवी ती माहिती मिळविण्यात ते यशस्वी होतात. जेथे हे शक्य होत नाही अशा ठिकाणी लैंगिक संबंधांवरून ब्लॅकमेल करून माहिती मिळविण्यात येते.

मागील सर्व प्रकरणांमध्ये काय साम्य होते?

या संपूर्ण प्रकरणांमध्ये समाज माध्यमांचा वापर करण्यात आला आहे. समाज माध्यमांवर प्रोफाईलमध्ये आपण कोठे काम करतो, याबाबत या सर्वांनीच नमूद केले होते. याचाच फायदा घेऊन पाकिस्तानी गुप्तहेरांनी त्यांना हेरले. सुरक्षा दल, जहाज बांधणी विभाग, अणु विभाग अशा विभागांशी संबंधित असलेल्या व्यक्तींसोबत प्रथम समाज माध्यमांवरून मैत्री केली जाते. त्यांच्या सोबत मैत्रीपूर्ण संभाषण केल्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. त्यानंतर बोलण्याच्या ओघात संवेदनशील माहिती मिळवली जाते. अनेक प्रकरणांमध्ये देशाच्या सुरक्षेला आपण किती नुकसान पोहोचवत आहोत, याचे भानही त्या व्यक्तीला राहत नाही. विश्वास संपादन करण्यासाठी भारतीय महिलांची नावे व संबंधित अधिकारी, कर्मचारी याच्याशी संबंधित विभागात काम करत असलेल्या महिलेचे प्रोफाईलही तयार केले जाते.

हेही वाचा : किंग्ज सर्कल स्टेशनला नाव देण्यात आलेले तीर्थंकर पार्श्वनाथ कोण आहेत?

हनी ट्रॅप भारतीय संरक्षण यंत्रणेसाठी डोकेदुखी का ठरत आहे?

सध्या भारतीय संरक्षण यंत्रणेसाठी हनी ट्रॅपिंगची प्रकरणे डोकेदुखी ठरत आहेत. समाज माध्यम हे तंत्रज्ञाच्या दृष्टिकोनातून वरदान ठरत असले तरी प्रत्यक्ष त्याची नकारात्मक बाजू देशाच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये उघडकीस आलेली हनी ट्रॅपिंगची ९० टक्के प्रकरणे समाज माध्यमांतून घडल्याचे एका महत्त्वपूर्ण सर्वेक्षणातून उघड झाले आहे. फेसबुकवर अनेकदा हनी ट्रॅपिंगचे सापळे रचले जातात, व्हॉट्स ॲपच्या आगमनाने शत्रूंचे काम आणखी सोपे झाले आहे.

Story img Loader