सुनील कांबळी

कॅनडामधील वणव्यांमुळे अमेरिकेच्या अनेक शहरांत धुराचे लोट पसरले आहेत. हवेचा दर्जा घसरून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वणवे नेमके कुठे?

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Victims of bulldozer action in UP welcome SC verdict
‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई

उष्णतेच्या लाटांमुळे कॅनडात ४०० ठिकाणी वणवे पेटले आहेत. क्युबेकमधील वणवे भीषण असून, हा भाग अमेरिकेच्या ऱ्होड आयलंडपासून ८०० ते ९०० किलोमीटरवर आहेत. क्युबेकमध्ये १५० ठिकाणी वणवे पेटले आहेत. तिथून मोठय़ा प्रमाणात धूर अमेरिकेच्या दिशेने येत आहे. गेल्या १० वर्षांत इतके भीषण वणवे पाहिले नव्हते, असे निरीक्षण कोलोरॅडो विद्यापीठातील पर्यावरणशास्त्रज्ञ एरिक जेम्स यांनी नोंदविले आहे.

धूर दूरवर पोहोचण्यास पोषक वातावरण ?

वणव्यांना वेगवान वारे, उष्ण, कोरडय़ा हवामानाची साथ लाभल्याने अमेरिकेतील अनेक मोठी शहरे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. हवामानात बदल झाल्यानंतर स्थिती बदलेल. मात्र, प्रदूषण काही आठवडे कायम राहू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रदूषणाच्या पातळीत किती वाढ?

उत्तर अमेरिकेतील बहुतांश शहरांमध्ये हवेचा दर्जा वाईट होता. कॅनडाच्या अल्बर्टामध्ये हवेचा दर्जा अतिशय वाईट होता. उत्तर अमेरिकेतील सुमारे १० कोटी नागरिकांना खराब हवेचा सामना करावा लागत आहे. वॉशिंग्टन डीसी, न्यूयॉर्क आणि फिलाडेल्फियामध्ये हवेची गुणवत्ता सर्वात वाईट होती, असे अमेरिकी पर्यावरण संरक्षण संस्थेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

जनजीवनावर परिणाम काय?

धूर, कमी दृश्यमानता यामुळे अमेरिकेतील अनेक शहरांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. व्हाइट हाऊसमधील नियोजित कार्यक्रमासह क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. हवाई प्रवास ठप्प झाला आहे. वॉशिंग्टन डीसी येथील युनियन मार्केट दर गुरुवारी गर्दीने फुलून जाते. मात्र, गेल्या गुरुवारी तिथे शुकशुकाट होता. राष्ट्रीय प्राणिसंग्रहालये बंद ठेवून प्राण्यांना बंदिस्त भागात ठेवण्यात आले आहे.

श्वसनाच्या आजारांची भीती?

प्रदूषणामुळे फुप्फुसे, घसा, नाक, डोळे आदी अवयवांवर परिणाम होऊ शकतो. प्रौढ व्यक्ती या आजारपणातून लवकर बऱ्या होऊ शकतील. मात्र मुले, वयोवृद्ध, दमा आणि श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींना दीर्घकाळ आजारपणाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे दारे, खिडक्या बंद ठेवून घरातच राहण्याची सूचना अमेरिकेतील अनेक राज्यांनी केली आहे.

वणव्यांवर उपाय काय?

तापमानवाढीमुळे उष्णतेच्या मोठय़ा आणि दीर्घकालीन लाटा येत राहतील. त्यातून भीषण वणवे पेटतील आणि मोठय़ा प्रमाणात प्रदूषण निर्माण होईल, असा इशारा वॉशिंग्टन विद्यापीठाचे जोएल थॉर्नटॉन यांनी दिला आहे. तापमानवाढ रोखण्यासाठी अमेरिकेला दीर्घकालीन उपाययोजनेच्या दृष्टीने मोठा भार उचलणे आवश्यक आहे. औद्योगिक क्रांतीनंतर जगाच्या तापमानात १.०२ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. कर्बउत्सर्जन नियंत्रणात येईपर्यंत तापमानवाढ होतच राहणार आहे. अमेरिकेने २०५० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य ठेवले असले तरी हा विषय सरकारच्या प्राधान्यक्रमावर नाही, असे चित्र आहे.