Dr. Babasaheb Ambedkar and Prabodhankar Thackeray’s Influence on Navaratri: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९२७ साली दादरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान भाषण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतु एका दलित व्यक्तीला धार्मिक उत्सवात आमंत्रण दिल्यामुळे उच्चवर्णीय हिंदूंमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यक्रमाला आले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असे आयोजकांना धमकावण्यात आले होते.

हिंदू-मुस्लिम दंगलींच्या (१८९४-९५) पार्श्वभूमीवर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन दिलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून काही काळातच गणेशोत्सवाने जुन्या बॉम्बे प्रेसीडेंसीत मोहरमच्या जागी सर्वात लोकप्रिय सणाचं स्थान घेतलं. परंतु या सणाची धुरा उच्चवर्णीय पुरोहित वर्गाकडे होती. त्यामुळेच या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंड पुकारलं. या बंडात त्यांच्याबरोबर ‘प्रबोधनकार’ केशव सीताराम ठाकरे आणि रावबहादूर सीताराम केशव बोले यांच्यासारखे दिग्गज होते. यांनी एकत्रिरीत्या नवरात्रोत्सव सार्वजनिक स्तरावर साजरा करण्यास सुरुवात केली. ती एक प्रकारची प्रतिसंस्कृती होती.

Congress Priyanka Gandhi road show today in West Nagpur and Gandhi Gate, Mahal in Central Nagpur
प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Congress Priyanka Gandhi held road show in two constituencies in Nagpur on Sunday
प्रियंका गांधींचा आज नागपुरात या दोन ठिकाणी ‘रोड-शो’
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…

अधिक वाचा: Video: संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते…

हळूहळू या नवरात्रोत्सवाच्या साजरीकरणाचा प्रसार महाराष्ट्रभर झाला. गणेशोत्सवाने आपली लोकप्रियता टिकवून ठेवली, कारण त्याचं क्रमशः ‘लोकशाहीकरण’ झालं आणि जनसामान्यांमध्ये सामावून घेतलं गेलं.

“उच्च वर्णीयांमध्ये खळबळ माजली होती. त्यांना भाषणाचं सार काय आहे, हे जाणून घेण्यात काहीही स्वारस्य नव्हतं. दादरमधील उच्चवर्णीय हिंदूंना असं वाटत होतं की साहेबांच्या (डॉ. आंबेडकर) स्पर्शाने गणपती अपवित्र होईल आणि आमच्या पूर्वज आणि भावी पिढ्यांना नरक यातना भोगाव्या लागतील. मग त्यांनी महाराच्या (ज्यांना आता नवबौद्ध म्हटलं जातं) भाषणामुळे झालेलं महापाप कसं टाळता येईल, यावर गुप्तपणे चर्चा सुरू केली,” असं आंबेडकरांचे चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांनी बाबासाहेबांवरील त्यांच्या दुसऱ्या खंडात (डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड २) लिहिलं आहे.

बाबासाहेबांना दादरमधील टिळक ब्रिजजवळील मंडपात पाऊल ठेवण्यापूर्वीच ठार मारण्याच्या धमक्या देणारी अनेक पत्रं मिळाली होती. त्यांच्या सहकाऱ्यांनीही त्यांना कार्यक्रम रद्द करण्याचं आवाहन केलं. परंतु बाबासाहेब ठाम होते. “साहेब म्हणाले होते, ‘माणसाला एक ना एक दिवस मरायचं आहेच, मग लढताना का मरू नये?'” असं खैरमोडे यांनी लिहिलं आहे. त्यानंतर बाबासाहेब सगळ्यात चांगले कपडे परिधान करून कार्यक्रमाच्या ठिकाणी निघाले आणि त्यांनी आपल्या कोटाच्या आतल्या खिशात एक लोडेड रिव्हॉल्व्हर घेतली. त्यांचे सहकारी प्रचंड घाबरले होते. मध्य मुंबईतील परळ येथील बलराम माने हा आंबेडकरांचा अंगरक्षक होता, तो त्यांच्याबरोबर होता, शिवाय त्याने आंबेडकरांच्या सुरक्षेसाठी १० ते १५ महार मल्लांना बोलावले.” खैरमोडे लिहितात.

बाबासाहेब भाषण करत असताना सुमारे पाच तरुण मल्लांनी त्यांच्या आजूबाजूला सुरक्षा कवच तयार केलं होतं. त्यांनी आपल्या बरोबर छुपी शस्त्रं आणली होती. जेणेकरून एखादा संघर्ष उद्भवला तर बाबासाहेबांचं संरक्षण करता येईल. बाबासाहेबांच्या भाषणादरम्यान उच्चवर्णीय लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं. आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले की, जोपर्यंत उच्चवर्णीय हिंदू आणि अस्पृश्य समान स्तरावर एकत्र येत नाहीत, तोपर्यंत हिंदूंचं सामाजिक आणि राजकीय बळ टिकू शकणार नाही.

अधिक वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी नागपूरचीच निवड का केली होती?

“माझी जीवनगाथा” मध्ये शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे सांगतात की, दादरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व जातींच्या लोकांनी देणगी दिली होती, परंतु आयोजन समितीवर ब्राह्मणांचेच वर्चस्व होतं. आमंत्रित केलेले वक्ते आणि कीर्तनकार देखील ब्राह्मणच होते. थोडक्यात, हा पूर्णपणे ब्राह्मण आणि उच्चवर्णीयांचा कार्यक्रम होता.

बाबासाहेबांनी गणेशोत्सवाच्या वेळी उच्चवर्णीयांच्या विरोधाचा सामना करून एक वर्ष झाल्यावर ठरवलं की, दलितांचा या कार्यक्रमात सहभाग असावा आणि ते आयोजन समितीवरही असावेत. मात्र, समाज समता संघाच्या प्रयत्नांनंतरही आयोजकांनी आपली मक्तेदारी सोडण्यास नकार दिला आणि कोणतीही तडजोड करण्यास तयार झाले नाहीत.
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी बाबासाहेब, प्रबोधनकार ठाकरे, बोले आणि त्यांचे सुमारे १०० सहकारी या ठिकाणी पोहोचले. त्यांनी दलित आणि ब्राह्मणेतरांना गणेशमूर्तीची पूजा करण्याची परवानगी मागितली. जर त्यांनी ही परवानगी दिली नाही, तर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊ देणार नाही, असा इशारा दिला.

प्रबोधनकारांनी धमकी दिली की ,जर पूर्वी अस्पृश्य असलेल्या हिंदूंना दुपारी ३ वाजेपर्यंत गणेशमूर्तीची पूजा करण्याची संधी दिली नाही, तर ते मूर्ती नष्ट करतील! विशेष म्हणजे, प्रबोधनकारांना त्यांच्या चांद्रसेनिय कायस्थ प्रभू (CKP) समाजाकडूनही विरोधाला सामोरे जावे लागले होते. शेवटी एक तडजोड करण्यात आली आणि बाबासाहेबांचे निकटचे सहकारी गणपत महादेव जाधव उर्फ मदकेबुवा यांना स्नान करून ब्राह्मण पुजाऱ्याला गणेशमूर्तीसमोर फुलं अर्पण करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु, जातीय अंधश्रद्धेने भरलेल्या हिंदूंसाठी हे दलितांनी केलेले बंड हा मोठा धक्का होता, आणि त्यांनी जाहीर केलं की, हा उत्सव पुन्हा कधीही साजरा केला जाणार नाही. यामुळे प्रबोधनकार आणि त्यांचे सहकारी हे उत्सव बंद होण्यास कारणीभूत असल्याचा आरोप झाला.

ही पोकळी भरून काढण्यासाठी प्रबोधनकार, बोले आणि इतरांनी नवरात्रौत्सव लोकसण म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. प्रबोधनकारांनी महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून शिवाजी महाराजांच्या उपास्य, तुळजापूरची देवी भवानी हिला अग्रस्थानी ठेवलं. या उत्सवामागचा उद्देश जातीभेदांच्या पलीकडे जाऊन हिंदूंना एकत्र आणणं हा होता. आपल्या चरित्रात प्रबोधनकार सांगतात की, शिवाजी महाराजांच्या काळात नवरात्र साजरी केली जायची, परंतु पुण्यातील ब्राह्मण पेशव्यांच्या राज्यकाळात गणेशपूजा अधिक महत्त्वाची ठरली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाच्या सार्वजनिक साजरीकरणाच्या माध्यमातून गणेशपूजेची परंपरा पुन्हा जिवंत केली.

अधिक वाचा: Anna Sebastian: कामाच्या अतिताणामुळे तरुणीचा मृत्यू; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कायद्यात केलेल्या सुधारणा या निमित्ताने चर्चेत!

परंतु, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, पुरातत्त्वज्ञ मधुकर केशव ढवळीकर यांनी त्यांच्या ‘श्री गणेश: महाराष्ट्राचे आराध्य दैवत’ या पुस्तकात गणेशपूजेच्या परंपरेचं मूळ एका पवित्र हत्तीच्या पूजेमध्ये असल्याचं सांगितलं आहे. याचे संदर्भ अलेक्झांडरच्या भारतावरच्या आक्रमणाच्या काळापासून आढळतात आणि गणेशाचा उल्लेख महाभारतात देखील आहे. १३ व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वरीची सुरुवात गणेशाच्या वंदनेनेच केली आहे.

प्रबोधनकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘लोकहितवादी संघ’ची स्थापना केली, या संघाने दादरमध्ये ‘शिव भवानी नवरात्रि महोत्सव’ आयोजित केला. या नवरात्रोत्सवात दलित आणि ब्राह्मणेतर जनसमूहांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्यांनी धार्मिक विधींमध्ये देखील भाग घेतला. एका दलित दाम्पत्याने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेचा धार्मिक विधी पार पाडला. दसऱ्याला एक भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि या प्रसंगी बाबासाहेबांनी भाषणही केलं. प्रबोधनकारांनी या घटनेचं वर्ष १९२६ असल्याचं नमूद केलं असलं तरी, खैरमोडे यांनी ही घटना १९२८ साली घडल्याचा उल्लेख केला आहे. हा परंपरागत चालत आलेला नवरात्र उत्सव आजही दादर पश्चिमेतील खांडके बिल्डिंगमध्ये साजरा केला जातो, येथे ठाकरे कुटुंब एकेकाळी राहत होते. विशेष म्हणजे ही जागा शिवसेना भवनाजवळ आहे.