भारताच्या दोम्माराजू गुकेशने चीनच्या डिंग लिरेनविरुद्ध बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत अखेरच्या १४व्या डावात थरारक विजय मिळवला आणि जगज्जेतेपद खेचून आणले. त्याविषयी..

गुकेशचे पारडे जड होते…

डिंग लिरेन गतवर्षी रशियाच्या इयन नेपोम्नियाशीला हरवून जगज्जेता बनला. पण त्यानंतरच्या काळात त्याची कामगिरी फारशी चांगली होत नव्हती. उलट गुकेशने गेल्या दोन वर्षांमध्ये आपला खेळ कमालीचा उंचावला. या वर्षी एप्रिल महिन्यात कँडिडेट्स स्पर्धा, बुद्धिबळ ऑलिम्पियाड अशा स्पर्धांमध्ये तो अप्रतिम कामगिरी करत होता. ऑलिम्पियाडमध्ये त्याच्याशी भिडणे डिंग लिरेनने चक्क टाळले. या लढतीपूर्वी गुकेशचे एलो रेटिंग होते २७८३, तर लिरेनचे रेटिंग होते २७४०. त्यामुळे निव्वळ रेटिंग आणि ताज्या कामगिरीचा विचार करायचा झाल्यास गुकेशचे पारडे जडच होते.

Border-Gavaskar Trophy Test series Team India defeat australia jasprit bumrah virat kohli rohit sharma
विश्लेषण : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या पराभवास कारणीभूत ठरले हे सहा घटक…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Border-Gavaskar Trophy India defeat against Australia sport news
‘डब्ल्यूटीसी’तील आव्हानही संपुष्टात
Magnus Carlsen match fixing
विश्लेषण : जागतिक अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपदासाठी कार्लसनकडून ‘फिक्सिंग’? नक्की प्रकरण काय?
Rohit Sharma has played his last Test in Melbourne India will move on Said Sunil Gavaskar IND vs AUS
IND vs AUS: “रोहित शर्मासाठी मेलबर्न कसोटी शेवटची…”, सिडनी कसोटीदरम्यान सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य
neet ug exam supreme court
शिफारशींची नीट अंमलबजावणी केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती
Mumbai University TYBCom semester 5 result announced
तृतीय वर्ष ‘बी. कॉम.’ पाचव्या सत्र परीक्षेत ४१.७५ टक्के उत्तीर्ण; मुंबई विद्यापीठाकडून १८ दिवसांत निकाल जाहीर
Rohit Sharma Might Dropped From Sydney Test Head Coach Gautam Gambhir Statement IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्माला सिडनी कसोटीतून वगळणार? कोच गंभीरच्या उत्तराने सर्वांनाच बसला धक्का; कर्णधाराच्या खेळण्याबाबत संभ्रम

अनुभवावर युवा ऊर्जेची मात…

बुद्धिबळाच्या इतिहासात गुकेश हा सर्वांत युवा कँडिडेट्स विजेता आणि आव्हानवीर ठरला होता. त्याचे वय आहे १८ वर्षे. डिंग लिरेन आहे ३२ वर्षांचा. माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद विरुद्ध मॅग्नस कार्लसन यांच्यात २०१३मध्ये झालेल्या लढतीतही युवा ऊर्जेने अनुभवावर मात केली होती. डिंग लिरेनने बहुतेकदा काहीशा रटाळ ओपनिंग पद्धतीचा अवलंब केला. त्याचे प्राधान्य बरोबरी साधून सामना टायब्रेकरमध्ये नेण्यास होते. टायब्रेकरमध्ये रॅपिड प्रकारामध्ये डिंग लिरेन सरस ठरण्याची शक्यता होती. पण बरोबरीच्या स्थितीतही गुकेशने अखेरपर्यंत खेळत राहण्याची ऊर्जा दाखवली. त्यामुळे १४ डावांअखेरीस डिंग लिरेनच काहीसा थकल्यासारखा झाला. गुकेशचे हेच डावपेच होते आणि ते यशस्वी ठरले.

हेही वाचा : विश्लेषण : रब्बी हंगामात डीएपी खताची टंचाई?

डिंग लिरेनची कमकुवत मनस्थिती…

गतवर्षी उत्कृष्ट खेळ करत जगज्जेतेपद पटकावल्यानंतर डिंग लिरेनची मानसिक स्थिती अनाकलनीयरीत्या ढासळू लागली होती. त्याला पटावर एकाग्रता साधता येत नव्हती. फुटकळ चुका होऊ लागल्या. नैराश्याने ग्रासले. जगज्जेतपदातून मिळालेल्या प्रसिद्धीने त्याला विचलित केले असावे, असा अंदाज काहींनी व्यक्त केला. तर त्याला शारीरिक आजार असावा आणि त्याचा परिणाम पटावरील कामगिरीवर होत असल्यामुळे तो निराश झाला असावा, असा एक अंदाज वर्तवला गेला. बुद्धिबळाचे डाव खेळताना तो थरथरत होता आणि विख्यात बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसननेही डिंग लिरेन यातून सावरू शकेल की नाही, याविषयी शंका उपस्थित केली होती. गुकेशविरुद्ध लढतीपूर्वी डिंग लिरेन बऱ्यापैकी मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती दाखवत होता. पण लढत पुढे सरकू लागली, तशा लिरेनच्या मानसिक स्थितीच्या मर्यादा स्पष्ट होऊ लागल्या. अनेक मोक्याच्या क्षणी लिरेनला कणखरपणा दाखवता आला नाही. याउलट पॅडी अप्टनसारख्या मानसिक बळकटी प्रशिक्षकाला गुकेशने मदतीस घेतले. त्याचा मोठा फायदा गुकेशला झाला. मोक्याच्या क्षणी त्याचा धीर आणि एकाग्रता ढळली नाही. पॅडी अप्टनने अनेक क्रिकेट आणि हॉकी संघांना यापूर्वी मार्गदर्शन केले आहे. २०११मध्ये भारतीय विश्वविजेत्या क्रिकेट संघाचा एक सहायक प्रशिक्षक अप्टन होता.

विश्वनाथन आनंदचे योगदान…

गुकेश, आर. प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगेसी या तीन युवा बुद्धिबळपटूंची अलौकिक प्रतिभा हेरून त्यांना विश्वनाथन आनंदने आपल्या हाताखाली घेतले. त्यांच्या अभ्यासाला, सरावाला, मानसिकतेला, डावपेचांना वेगळी दिशा दिली. गुकेशचा प्रमुख सहायक पोलंडचा ग्रेगर गाजेवस्की हा याआधी आनंदचा विश्वासू सहायक होता. त्याला आनंदने खास गुकेशला मदत करण्यासाठी पाठवला. याशिवाय भारतीय ग्रँडमास्टर पेंटाल्या हरिकृष्ण, पोलिश ग्रँडमास्टर्स राडोस्लाव वोयतासेक आणि यान ख्रिस्तॉफ डुडा हेदेखील आनंद आणि गाजेवस्कीमुळे टीम गुकेशमध्ये दाखल झाले. अनेक जगज्जेतेपदांच्या लढतींचा अनुभव आनंदकडे असल्यामुळे गुकेशसाठी त्यासंबंधीच्या टिप्स महत्त्वाच्या ठरल्या.

हेही वाचा :Fossilized Dinosaur Dung: डायनासोरची विष्टा आणि उलटी सांगतेय त्याच्या अस्तित्त्वाची कथा; नवीन संशोधनाने ज्युरासिक कालखंडाचे कोणते रहस्य उलगडले?

मॅग्नस कार्लसनची अनुपस्थिती

२०११पासून जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला माजी जगज्जेता मॅग्नस कार्लसन सध्या रॅपिड आणि ब्लिट्झ प्रकारात जगज्जेता आहे. पण गेल्या वर्षी तोडीस तोड प्रतिस्पर्धी मिळत नाहीत म्हणून त्याने पारपंरिक बुद्धिबळ जगज्जेतेपदाचा त्याग केला आणि यापुढे अशा लढतींमध्ये खेळणार नसल्याचे जाहीर केले. त्याच्या अनुपस्थितीमुळे बुद्धिबळ विश्वात पोकळी निर्माण झाली हे नाकारता येत नाही. २०१३ ते २०२३ अशा दहा वर्षांत जगज्जेतेपदाच्या पाच लढतींमध्ये तो विजेता ठरला. यात त्याने दोन वेळा विश्वनाथन आनंद आणि पुढे सर्गेई कार्याकिन (रशिया), फॅबियानो करुआना (अमेरिका) आणि इयन नेपोम्नियाशी (रशिया) यांना हरवले. आजही तो अनेक मोठ्या स्पर्धा जिंकतो. त्याच्याविरुद्ध खेळणे गुकेशसाठी नक्कीच अधिक खडतर ठरले असते हे नाकारता येत नाही.

Story img Loader