Mango trade competition India and China लोकसत्ता डॉट कॉमच्या ‘आंबा निर्यातीत भारत-चीन आमने-सामने कसे? भारतीय आंब्यांचीच निर्यात चीन कशी करतो?’ या विश्लेषणात म्हटले आहे की, जागतिक आंबा उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के आंबा उत्पादन भारतात होते. पण, देशांतर्गत मागणी मोठी असल्यामुळे देशातून फारशी आंबा निर्यात होत नाही. तर निर्यातीच्या स्पर्धेत चीन भारताला तोडीस तोड टक्कर देत आहे. भारतातील हापूस, दशहरी, केशर, चौसा, लंगडा आणि तोतापुरी या प्रमुख निर्यातक्षम जाती आहेत. पण, याच जातींच्या आंब्याचे उत्पादन पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड, काही आफ्रिकन देशांसह आता चीनमध्येही घेतले जात असून भारतासाठी स्पर्धक तयार झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज भारतासाठी स्पर्धक ठरलेला आंबा चीनमध्ये पोहचला कसा हे पाहणे महत्त्वाचे ठरावे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चीनला भेट म्हणून आंब्याची रोप

अलीकडेच आंब्याचा हंगाम सरला! भारत हा जगातील सर्वात मोठा आंबा उत्पादक देश आहे, तर भारताच्या मागे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश म्हणजे चीन. पण तुम्हाला हे कोणी सांगितलं १९६० च्या दशकापर्यंत चीनला आंबा हे फळ माहीत नव्हतं, तर तुमचं उत्तर काय असेल? विश्वास ठेवा किंवा न ठेवा, अगदी १९५० पर्यंत, दक्षिण चीनमधील काही प्रदेश वगळता, आंबा हे फळ चिनी लोकांना जवळजवळ अज्ञातच होते. १९६८ साली पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री मियां अरशद हुसैन यांनी माओ यांना आंबे भेट म्हणून दिले होते. तेच आंबे माओ यांनी देशव्यापी प्रचाराचे साधन म्हणून वापरले, अशी कहाणी प्रचलित आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानकडून चीनला आंबे भेटवस्तू म्हणून मिळण्याआधी भारत सरकारने १९५० च्या दशकात आंब्याची मुत्सद्दीगिरी सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, हेही तितकेच अज्ञात आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे (MEA) असलेल्या अधिकृत कागदपत्रांमध्ये भारताने आंब्याची आठ रोपे पाठवण्याची तयारी केली होती याची माहिती आहे.

अधिक वाचा: विश्लेषण : आंबा निर्यातीत भारत-चीन आमने-सामने कसे? भारतीय आंब्यांचीच निर्यात चीन कशी करतो?

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील कागदपत्रांनुसार आंब्याची रोप ही तत्कालीन चीनचे पंतप्रधान झाऊ एनलाई यांच्यासाठी परतीची भेट होती. एनलाई यांनी १९५४ साली नोव्हेंबर महिन्यात भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना अनेक विदेशी आणि मौल्यवान भेटवस्तू दिल्या होत्या. या भेटवस्तूंमध्ये स्पॉटेड हरणांची जोडी, लाल क्रेस्टेड क्रेनची जोडी आणि १०० गोल्ड फिश यांचा समावेश होता. म्हणून, चीनमधील तत्कालीन राजदूत नेद्यम राघवन यांच्या सूचनेनुसार भारताने ऐतिहासिकदृष्ट्या भारताचा अभिमान असलेले आणि हिमालयाच्या पलीकडे शेजारील देशाला फारसे परिचित नसलेले फळ आणि रोप देण्याचा निर्णय घेतला.

आंब्याची मुत्सद्देगिरी

ही आंब्याची रोपे १९५४ साली हिवाळ्यात ग्वांगझू (तेव्हाचे कँटन) येथील पीपल्स पार्कमध्ये लावण्यासाठी पाठवण्याची सुरुवातीची योजना होती. परंतु , बीजिंग (तेव्हाचे पेकिंग) येथील भारतीय दूतावासाने परराष्ट्र मंत्रालयाला सल्ला दिल्यावर ते रद्द करण्यात आले. हा कालखंड आंब्यांच्या रोपांच्या लागवडीसाठी योग्य नसल्याचे त्यांनी कळवले होते. त्यानंतर १९५५ साली उन्हाळयात बीजिंगमधील भारतीय दूतावासाने योग्य कालखंडात आंब्याच्या रोपांची व्यवस्था करण्यास सांगितले आणि पुन्हा एकदा भारतातून चीनमध्ये आंब्याची रोपे पाठवण्याचे प्रयत्न सुरु झाले. यासाठी बीजिंगमधील भारतीय दूतावासातील तत्कालीन समुपदेशक रामचुंदुर गोबुरधुन यांनी २९ एप्रिल १९५५ रोजी वरिष्ठ अधिकारी त्रिलोकी नाथ कौल यांना पत्र लिहिले होते. त्यांनी या पत्रात कँटनसाठी आंब्याची रोपे पाठविण्याची मागणी केली होती. त्यानंतर ५ जून १९५५ रोजी कोलकात्याहून भारतातील सांस्कृतिक शिष्टमंडळासह ही रोपे चीनला पाठवली जातील, असा निर्णयही घेण्यात आला. त्यादिशेने पाऊल म्हणून परराष्ट्र मंत्रालयातील कनिष्ठ सचिव हरबंस लाल यांनी आंतर-विभागीय अर्थसंकल्प मंजूरी आणि खरेदी प्रक्रिया सुरू केली.

शोध आणि रोपांची पेरणी

त्यानंतर विविध जातींची काही रोपे गोळा करण्यात आली. लाल यांनी २७ मे १९५५ रोजी अर्थ मंत्रालयाला पत्र लिहून विशेष खेपेसाठी अर्थसंकल्पीय मंजुरी मागितली. ‘चांगल्या स्थितीतील ११ आंब्याची रोपं ३१ मे १९५५ पर्यंत भारताच्या पंतप्रधानांकडून चीनला पाठवण्यासाठी तयार ठेवा. सुमारे १ १/२ एमडीएस वजनाची रोपे हवाईमार्गाने हाँगकाँगला पाठवण्याचा प्रस्ताव आहे. हाँगकाँगहून भारतीय सांस्कृतिक शिष्टमंडळ त्यांना चीनला घेऊन जाईल, हे मंडळ पहिल्या आठवड्यात चीनला पोहोचेल,’ असं लाल यांनी पत्रात लिहिलं होत. एकूण ११ रोपं पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु नंतर या रोपांची संख्या ११ वरून आठ करण्यात आली. हा बदल ३० मे १९५५ रोजी MEA ने बीजिंगमधील भारतीय दूतावासाला टेलिग्रामद्वारे आठ रोपं हाँगकाँगला हवाई मार्गे ४ जूनला येत आहेत, हे कळवलं. इतकंच नाही तर भारतीय शिष्टमंडळाचे नेते कँटनच्या महापौरांना ही रोपं देतील हेही हाँगकाँगमधील भारतीय मिशनलाही कळवण्यातआलं.

आंब्याची रोपे खास विमानाने रवाना

बीजिंगमधील भारतीय दूतावासाने मंत्रालयाला उत्तर दिलं की, याविषयी चिनी लोकांना माहिती दिली जात आहे, कृपया रोपांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करा. यावर उत्तर देताना मंत्रालयाने १ जून १९५५ रोजी कळवलं की, ही रोपं फक्त प्रायोगिक हेतूसाठी पाठवली जात आहेत. यशस्वी ठरल्यास आणखी रोपं पाठवली जातील. शेवटी ही रोपं ५ जून रोजी हाँगकाँग AII फ्लाइट क्रमांक AI 312 ने पाठवण्यात आली. मंत्रालयाने निर्जंतुकीकरण कस्टम क्लिअरन्स आणि फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रांची खात्री केल्यानंतर दोन चौसा, तीन दशेरी, एक लंगडा आणि दोन हापूस आंब्याच्या जातींची रोपं एअर इंडियाच्या विमानाने हाँगकाँगला पाठवण्यात आली. IARI ने आंबा लागवडीबद्दल तपशीलवार सूचना देखील पाठवल्या होत्या. ती आंब्याची रोप चीनला नेण्यात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कोणतीही कसर सोडली नाही. परंतु त्यानंतर जे घडले ते भारत-चीन मुत्सद्देगिरीच्या इतिहासात अगदी अस्पष्ट आहे. या रोपांविषयी माहिती कोणत्याही सार्वजनिक कागदपत्रांमध्ये उपलब्ध नाही. ती आंब्याची रोपं चीनला पाठवल्यानंतर काही वर्षांनी १९६२ च्या भारत-चीन युद्धाने या द्विपक्षीय संबंधात वितुष्ट आले. त्यानंतर अनेक वर्षांनी २००३ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या चीन भेटीदरम्यान दोन्ही देशांनी जागतिक व्यापार संघटना (WTO) द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्यानंतर २००४ साली चीनला भारतीय आंबे भेट देण्यात आले होते.

पाकिस्तान आणि चीन

४ ऑगस्ट १९६८ रोजी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मियां अरशद हुसैन यांनी चीनच्या दौऱ्यादरम्यान अध्यक्ष माओ यांना आंब्याची पेटी भेट दिली. माओ यांना हे फळ नको होते. त्यांनी ते आंबे रेड गार्ड्सला आळा घालणाऱ्या कामगारांना देऊन टाकले. रेड गार्ड्स ही एक सामूहिक, विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील, निमलष्करी सामाजिक चळवळ होती. जी १९६६ साली माओ झेडोंग यांनी सांस्कृतिक क्रांतीच्या पहिल्या टप्प्यादरम्यान एकत्रित केली होती आणि १९६८ साली ती संपुष्टात आली. माओने विद्यार्थी रेड गार्ड्सना अधिकाऱ्यांविरुद्ध बंड करण्याचे आवाहन केले होते. यामागील हेतू मध्यमवर्गीय आणि पारंपरिक विचारसरणीपासून मुक्त होऊन समाजाला आकार देणे हा होता. परंतु १९६८ पर्यंत रेड गार्ड्स गट सत्तेसाठी स्पर्धा करू लागला आणि त्यामुळे यादवीसारखी परिस्थिती निर्माण झाली. माओने रेड गार्ड्सना आळा घालण्यासाठी ३० हजार कामगारांना बीजिंगमधील क्विंगहुआ विद्यापीठात पाठवले. शेवटी आत्मसमर्पण करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर भाले आणि सल्फ्यूरिक अॅसिडने हल्ला केला, यात पाच ठार आणि ७०० हून अधिक जखमी झाले. हे ज्यादिवशी घडले त्याच्या आदल्याच दिवशी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला ४० आंबे भेट दिले होते. हेच आंबे माओने कामगारांना भेट दिले. तोपर्यंत चीनमधल्या लोकांना आंबे माहीत नव्हते असे कला इतिहासतज्ज्ञ फ्रेडा मर्क यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे (Mao’s Golden Mangoes and the Cultural Revolution Edited by Alfreda Murck). हे अद्भुत फळ या कामगारांसाठी आश्चर्य ठरले. माओच्या प्रेमाचे प्रतीक ठरले. हे फळ ज्यावेळी वाटण्यात आले. त्यावेळी या मौल्यवान फळांभोवती लोक जमले, उत्साहाने गाणी गात होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहात होते. माओला कदाचित आंब्याचे दैवी चिन्हात होणारे रूपांतर अपेक्षित नव्हते. कामगार आंब्याकडे दूरच्या भूमीवरून आलेला नजराणा म्हणून पाहत होते. हे पाकिस्तानमधून आले आहेत, हे कोणालाही माहीत नव्हते. मर्क लिहितात, कामगार त्या रात्री उशिरापर्यंत जागे राहिले, उत्सुकतेने आंब्यांना स्पर्श करत आणि त्यांचे परीक्षण करत होते. हे अद्भुत फळ परिवर्तनाचं प्रतीक ठरलं होत. किंबहुना खुद्द माओने भेट दिलेलं फळ कामगारांसाठी प्राणापेक्षा प्रिय ठरलं. आंबे कमी आणि कामगारांची संख्या जात होती. त्यामुळे ज्यांना प्रत्यक्ष फळ भेट मिळालं त्यांच्यासाठी ते उत्सवापेक्षा काही कमी नव्हतं.

अधिक वाचा: ४० वर्षे चालला एका आंब्याच्या मालकीवरून झालेला खून खटला; भारतीयांना आंब्याचे एवढे आकर्षण का?

आंब्याच्या अवमानासाठी फाशी

मर्क बीजिंगमधील एका कापड कारखान्याचे उदाहरण देतात. या फळांच्या स्वागतासाठी कारखान्यात मोठा समारंभ आयोजित करण्यात आला होता. ते जास्त काळ टिकण्यासाठी मेणाच्या आवरणात बंद करून सभागृहात ठेवण्यात आले. काही कामगार त्याची झलक पाहिल्यावर नतमस्तक झाले. बराच काळ गेल्याने आंबा खराब व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळे कारखान्यातील क्रांतिकारी समितीने तो सोलून एका मोठ्या भांड्यात त्याचा गर उकळला आणि एका समारंभात एक चमचा पाणीमिश्रित गर देण्यात आला. काही ठिकाणी ढोल ताशात आंब्याचे स्वागत करण्यात आले. एका स्थानिक दंतचिकित्सक डॉ.हान यांनी आंबा पाहिल्यानंतर त्याची तुलना रताळ्याशी केली. पवित्र आंब्याचे हे अनादर करणारे विधान निंदनीय असल्याचे ठरवण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली, त्यांची धिंड काढण्यात आली आणि अखेर फाशी देण्यात आली.

आंबा… बदलाचं प्रतिक

आंबा हे माओच्या पक्षाला पाठिंबा देण्याचे साधन ठरले होते. ज्या कामगारांना आंबा मिळाला नाही त्यांना मेणाची प्रतिकृती तयार करून देण्यात आली. एकूणच आंबा हे बदलाचं प्रतीक ठरलं होत. मँगो-ब्रँड सिगारेट तसेच आंब्याचे डिझाइन असलेले इनॅमल कप आणि ट्रे लाँच करण्यात आले. ज्यांना या वस्तू परवडत नाहीत, त्यांच्यासाठी आंबे असलेले बिल्ले हा स्वस्त पर्याय होता. नंतर, वर्ग संघर्षाची मुख्य थीम असलेला सॉन्ग ऑफ द मँगो हा चित्रपट १९७६ मध्ये तयार करण्यात आला आणि त्यात माओला भेट दिलेले आंबे दाखवण्यात आले. आंब्यांची तुलना चिनी पौराणिक कथांच्या अमरत्वाच्या मशरूम आणि दीर्घायुष्य असलेल्या पीच यांच्याशी केली गेली. १९७६ मध्ये माओच्या मृत्यूने आंब्याच्या ट्रेण्डने चीनच्या राजकारणातून त्याचे प्रतीकात्मक मूल्य गमावले.

पाकिस्तानी आंबा नेमका कोणाचा?

भारताने चीनला जी रोपं दिली त्याचं पुढे काय झालं, हे विस्मरणात गेलं. परंतु पाकिस्तानमधून चीनला भेट दिले गेलेले आंबे मात्र लक्षात राहिले. म्हणूनच पाकिस्तानमधले प्रसिद्ध आंबे नक्की कुठले हेही इथे सांगणं क्रमप्राप्त ठरत. १९८१ साली इंदिरा गांधी यांना तत्कालीन पाकिस्तानी अध्यक्षांनी अन्वर रतौल आंब्यांची टोपली भेट दिली. या भेटीचे इंदिरा गांधींनी कौतुक केले. त्याविषयीच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून आल्या. त्यामुळे रतौलमधील लोक इतके नाराज झाले की ते थेट इंदिरा गांधींना भेटायला गेले. रतौलच्या शेतकऱ्यांनी इंदिरा गांधींसमोर रतौल आंब्याचीमुळे पाकिस्तानात नसून भारतात कशी आहेत हे सिद्ध करून दाखवलं. फाळणी नंतर या आंब्याचे उत्पन्न पाकिस्तानमध्ये घेण्यात आले. पाकिस्तानमध्ये या आंब्याची तुलना हापूस आंब्याबरोबर केली जाते. इतकंच नाही तर ज्या शेतकऱ्याने पाकिस्तानमध्ये हा आंबा लावला त्याच्या नावामुळे इथे हा आंबा अन्वर रतौल म्हणून ओळखला गेला. याशिवाय चीनला भेट म्हणून दिले गेलेले सिंधरी आंबे पाकिस्तानचे प्रथम पंतप्रधान मुहम्मद खान जुनेजो यांच्या वडिलांनी मुंबईहून आणले होते आणि नंतर सिंधरी येथे त्याची लागवड केली. त्यांनीच (दिन मुहम्मद जुनेजो) या आंब्याचे नाव सिंधरी केले.