अन्वय सावंत
यंदाची ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा विविध कारणांमुळे वेगळी ठरणार आहे. जगातील महासत्ता असलेली अमेरिका क्रिकेटच्या बाबतीत मात्र अजून ‘विकसनशील’ आहे. आता याच अमेरिकेत प्रथमच संयुक्तरीत्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळेच भारतीय वेळेनुसार, २ जूनला पहाटे सहा वाजता अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाकडे जगाचे लक्ष आहे. यासह यंदा तब्बल २० संघ एकत्रित खेळणार असल्यानेही विश्वचषक स्पर्धा अत्यंत वेगळी ठरत आहे. यातील नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा यांसारख्या संघांचा इथपर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. मात्र, आता हे संघ धक्कादायक निकाल नोंदवण्यासाठी सज्ज झाले आहेत. हेच क्रिकेटविश्वातील ‘नवे’ संघ विश्वचषकासाठी कसे पात्र ठरले याचा आढावा.

युगांडा

पूर्व आफ्रिकेतील युगांडा या देशात क्रिकेटचा प्रसार होण्यासाठी खूप वेळ लागला. पूर्व आफ्रिकेचा संघ १९७५ च्या विश्वचषकात खेळला होता आणि या संघात युगांडाच्या खेळाडूंचाही समावेश होता. पुढे १९९८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) युगांडाला सहयोगी देशाचा (असोसिएट नेशन) दर्जा दिला. परंतु युगांडामधील क्रिकेट खऱ्या अर्थाने बहरले ते २०२० नंतरच. लॉरेन्स माहातलेन यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून २०२० ते २०२३ हा चार वर्षांचा कार्यकाळ युगांडाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. फारशा सोयी-सुविधा उपलब्ध नसतानाही युगांडाच्या संघाने गेल्या चार वर्षांत झटपट प्रगती केली. परिणामी आता ते प्रथमच क्रिकेट विश्वचषकात खेळणार आहेत. युगांडाची राजधानी काम्पालामधील निम्म्याहून अधिक लोक झोपडपट्टीत राहतात. येथूनच जुमा मियागी हा वेगवान गोलंदाज पुढे आला आहे. यासह वर्षानुवर्षे युगांडाचे अभिमानाने प्रतिनिधित्व करणारा ४३ वर्षीय फिरकीपटू फ्रँक एनसुबुगा यंदाच्या स्पर्धेतील सर्वांत वयस्कर खेळाडू ठरणार आहे. युगांडाने गेल्या वर्षीच्या आफ्रिकन पात्रता फेरीत दुसरा क्रमांक मिळवला आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील त्यांचे पदार्पण निश्चित झाले. त्यांनी या स्पर्धेत झिम्बाब्वे आणि केनिया यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव असलेल्या संघांनाही पराभूत केले. त्यामुळे त्यांचा इथपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.

e cycle ferry for Mahapex 2025 exhibition in Mumbai reached Nashik Roads Head Post Office on Thursday
इ सायकल फेरीत नाशिकमधील टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
india exports contract 1 percent in december 2024
डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?
experts express affordable housing solutions in indian expres thinc our event
शहरांमध्ये परवडणारी घरे उपलब्ध करून देणे शक्य!
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?
Sunil Gavaskar and others felicitated by MCA at Wankhede Stadium
वानखेडे स्टेडियमचे योगदान महत्वाचे! सुनील गावस्कर यांची भावना; तारांकित खेळाडूंच्या उपस्थितीने क्रिकेट पंढरी दुमदुमली
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?

आणखी वाचा-विश्लेषण : देशात १०० टन सोने माघारी आणण्याबाबत रिझर्व्ह बँकेची भूमिका काय? इतक्या सोन्याचा उपयोग काय?

नेपाळ

नेपाळचा संघ आता दशकभरानंतर पुन्हा ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आशियाई पात्रता स्पर्धेत नेपाळने साखळी फेरीत सिंगापूर आणि मलेशिया या संघांना पराभूत केले, तर ओमानकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यानंतरही त्यांनी बाद फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या संयुक्त अरब अमिराती संघाचे आव्हान होते. घरच्या प्रेक्षकांनी पूर्ण भरलेल्या स्टेडियममध्ये नेपाळने अमिरातीचा आठ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. यासह त्यांचे ट्वेन्टी-२० विश्वचषकातील स्थानही निश्चित झाले. अंतिम लढतीत ओमानकडून त्यांना पराभव पत्करावा लागला, पण या निकालाने फारसा फरक पडला नाही. नेपाळच्या संघाला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा बऱ्यापैकी अनुभव आला आहे. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेतही खेळण्याची संधी नेपाळला मिळाली होती. आता हा अनुभव ट्वेन्टी-२० विश्वचषकात कामी येईल अशी नेपाळला आशा असेल.

ओमान

ओमानचा संघ तिसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. परंतु मुख्य फेरीत खेळण्याची ही त्यांची पहिलीच वेळ असेल. यापूर्वी दोन वेळा ओमान संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषकातील प्राथमिक फेरीचा अडथळा ओलांडता आला नव्हता. गेल्या वर्षीच्या आशियाई पात्रता फेरीतील चमकदार कामगिरीसह ओमान संघ यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला. त्यांनी पात्रता स्पर्धेतील सर्व सामने जिंकले. यात अंतिम सामन्यात नेपाळवरील विजयाचाही समावेश होता. या वर्षी आशियाई क्रिकेट परिषदेच्या प्रीमियर चषक स्पर्धेतही ओमानने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यानंतर ओमानच्या निवड समितीने झिशान मकसूदऐवजी अकिब इलयास याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. ओमानला २०१६ आणि २०२१ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे. २०१६ मध्ये त्यांनी प्राथमिक फेरीत आयर्लंड, तर २०२१ मध्ये पापुआ न्यू गिनी संघाला पराभूत केले होते. आता तुलनेने बलाढ्य मानल्या जाणाऱ्या संघांना झुंज देण्याचा ओमनचा प्रयत्न असेल.

आणखी वाचा-विश्लेषण : एक्झिट पोल किती अचूक असतात?… अंदाज फसल्याची उदाहरणे किती?

नामिबिया

गेल्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये क्रिकेटविश्वातील आघाडीच्या संघांविरुद्ध खेळल्यानंतर आता एक पाऊल पुढे जात काही धक्कादायक निकाल नोंदवण्याचा नामिबियाचा प्रयत्न असेल. शुष्क वाळवंट, राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीवन यासाठी प्रसिद्ध असलेल्या नामिबियाला क्रिकेटमध्येही चांगला इतिहास आहे. १९०० पासून या देशात क्रिकेट खेळले जात आहे. पहिल्या महायुद्धानंतर येथे क्रिकेटला अधिक चालना मिळाली असे म्हटले जाते. १९६० सालापासून दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक क्रिकेट संघटनेचा भाग राहिल्याने नामिबियातील क्रिकेट चांगल्या स्थितीत राहिले. १९९२ मध्ये नामिबियाला ‘आयसीसी’चे सदस्यत्व मिळाले, तर २०१८ मध्ये त्यांना एकदिवसीय संघाचा दर्जा मिळाला. त्यानंतर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही नामिबियाने वेगाने प्रगती केली आहे. त्यांनी २०२१ आणि २०२२ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात सहभाग नोंदवला. तर गेल्या वर्षी आफ्रिकन पात्रता स्पर्धेत सहा सामने अपराजित राहत नामिबियाने यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात प्रवेश मिळवला. पात्रता स्पर्धेत त्यांनी ‘आयसीसी’चे कसोटी सदस्यत्व असलेल्या झिम्बाब्वे आणि युगांडा या संघांनाही पराभूत केले. त्यामुळे आता अन्य संघ विश्वचषकात नामिबियाला कमी लेखण्याची चूक करणार नाहीत. ट्वेन्टी-२० विश्वचषकात नामिबियाचा ‘ब’ गटात समावेश असून त्यांचे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, ओमान आणि स्कॉटलंड यांच्याविरुद्ध साखळी सामने होतील.

Story img Loader