हृषिकेश देशपांडे
सर्वच राजकीय पक्षांसाठी मुंबईवर पकड राखणे महत्त्वाचे ठरते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरावर एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व होते. मुरली देवरा, गुरुदास कामत या नेत्यांनी मुंबईतून पक्षाला ताकद दिली. दलित, मुस्लीम तसेच परप्रांतीय हे प्रामुख्याने पक्षाचा आधार होते. मात्र पुढे काँग्रेसची ही मतपेढी त्यांच्याकडून निसटली. मराठी अस्मितेच्या जोरावर शिवसेनेने भक्कम पाय रोवले. हिंदुत्वाच्या जोरावर भाजपनेही शहरात ताकद वाढवली. यातून काँग्रेसला धक्का बसला. 

मुंबईत घटते अस्तित्व…

गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपपाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष राहिला असला तरी, पन्नास जागाही त्यांना जिंकता आल्या नाहीत. त्याला पक्षांतर्गत गटबाजी तसेच पक्षाचा हुकमी मतदार दुरावल्याने ही स्थिती ओढवली. आता लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतून काँग्रेसला उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई हे दोन मतदारसंघ मिळाले. उमेदवारीवरून पक्षात नसीम खान यांच्या सारख्या नेत्याने उघड नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या मुंबई विभागीय अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी मिळाल्याने शहरात बऱ्याच कालखंडानंतर काँग्रेसचा खासदार होणार काय, याची चर्चा आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत मुंबईतील सहापैकी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. तर २००९ मध्ये शहरातील सर्व सहा जागा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे होत्या. त्यातील राष्ट्रवादीकडे एक जागा होती.

ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी
Image Of Ramdas Athawale
Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा पक्षही दिल्लीच्या मैदानात, विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले १५ उमेदवार
Image Of Ramesh Bidhuri.
आधी मंत्रिपद हुकले आता उमेदवारी रद्द होण्याची शक्यता; प्रियांका गांधी, अतिशींविरोधातील वादग्रस्त विधाने रमेश बिधुरींना भोवणार?
Pyari Didi Yojana
Delhi Elections : भाजपा-सेनेच्या ‘लाडकी बहिण’च्या अभूतपूर्व यशानंतर काँग्रेसची दिल्लीत ‘प्यारी बहन’ला साद
Loksatta lalkilla Congress BJP campaign AAP alleges corruption Sheila Dikshit
लालकिल्ला: काँग्रेसच्या खांद्यावर भाजपची मोहीम!
Delhi Assembly Election 2025
Delhi Assembly Election 2025 : Delhi Assembly तिकीट वाटप ते प्रचार, दिल्ली विधानसभेसाठी मायावतींच्या पक्षाने आखली मोठी रणनीति

हेही वाचा >>>जंगलात आग कशी लागते? त्याला जबाबदार कोण? ‘त्या’ थांबवायच्या कशा?

मुंबईचे महत्त्व

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात विधानसभेचे ३६ मतदारसंघ येतात. थोडक्यात विधानसभेच्या एकूण २८८ सदस्य संख्येच्या दहा टक्क्यांहून अधिक आमदार मुंबईतून येतात. याखेरीज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे तसेच पालघरमधील विधानसभेच्या जवळपास ५० मतदारसंघांवर मुंबईच्या राजकारणाचा प्रभाव पडतो. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर तसेच नगर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईत कामानिमित्त वास्तव्याला आहेत. या साऱ्याचा विचार करता मुंबईभोवती राज्याचे राजकारण किती केंद्रित झाले हे लक्षात येते. यासाठी ज्या पक्षाचे मुंबईत प्राबल्य आहे. त्याला राज्यात ताकद मिळते. ही समीकरणे पाहता, लोकसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसने चांगली कामगिरी केली तर विधानसभेला त्याचे परिणाम दिसतील. तसेच आगामी मुंबई महापालिका असो किंवा विधानसभा निवडणुकीतही जागावाटपात काँग्रेसला अधिक महत्त्व येईल. अर्थात पालिका निवडणूक सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे अंदाजपत्रक देशातील अनेक छोट्या राज्यांपेक्षाही मोठे आहे. लोकसभेला जागावाटपातही महायुती असो किंवा महाविकास आघाडी यांच्यात मुंबईतील जागांवरून रस्सीखेच होती. कारण येथील कामगिरीचा परिणाम अप्रत्यक्षपणे राज्याच्या राजकारणावर होतो.

हेही वाचा >>>४ महिन्यांत २७ महिलांची हत्या; महिलांवरील वाढत्या हिंसाचारामुळे ऑस्ट्रेलिया पेटून उठलाय, देशात नक्की काय घडतंय?

उत्तर-मध्य मुंबईतील समीकरणे

उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड या धारावीच्या आमदार आहेत. हा भाग दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात येतो. येथील जागेसाठीच काँग्रेस आग्रही होती. मात्र ठाकरे गटाने स्थानिक लोकाधिकार समितीमध्ये कार्यरत असलेल्या अनिल देसाई यांना येथून संधी दिली. यामुळे वर्षा गायकवाड यांना दुसऱ्या मतदारसंघात जावे लागले. हा एकेकाळचा काँग्रेसचा हुकमी मतदारसंघ. सुनील दत्त यांच्या पाठोपाठ त्यांच्या कन्या प्रिया दत्त यांनी येथून यश मिळवले. मात्र गेल्या दोन निवडणुकीत भाजपने येथून बाजी मारली. मिश्र वस्तीच्या या मतदारसंघात अंदाज वर्तवणे कठीण आहे. वर्षा गायकवाड यांचा सामना ज्येष्ठ विधिज्ञ व भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांच्याशी आहे. काँग्रेसचे झिशान सिद्दिकी यांचा अपवाद वगळता या मतदारसंघातील सर्व आमदार हे सत्तारूढ गटाकडे आहेत. यंदा लोकसभा निवडणुकीतील घसरलेला मतटक्का पाहता, आपले हुकमी मतदार बाहेर काढण्यासाठी पक्षांना संघटनात्मक ताकद दाखवावी लागेल. आता त्यात भाजप की काँग्रेस सरस ठरते यावर येथील निकाल ठरेल. वर्षा गायकवाड या मुंबईच्या अध्यक्ष असल्याने पक्षासाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेला ठाकरे गटाचे संघटनात्मक बळ येथे उत्तम आहे. आघाडीतील मित्र पक्षांनी उत्तम सहकार्य केले तर काँग्रेससाठी आशा बाळगता येईल अशी स्थिती आहे. काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या अन्य उत्तर मुंबई या मतदारसंघात भाजपने गेल्या दोन निवडणुकीत चार लाखांहून मताधिक्य घेतले आहे. त्यावरून तेथील भाजपच्या प्रभावाचा अंदाज येऊ शकतो.

राज्यातून काँग्रेसला यशाची अपेक्षा कुठे?

मुंबई महानगर प्रदेश आणि कोकणचा विचार केला तर येथील लोकसभेच्या १२ जागांपैकी काँग्रेसकडे लढवण्यासाठी मुंबईतीलच या दोन जागा आल्या आहेत. भिवंडीची पारंपरिक जागाही काँग्रेसला मिळाली नाही. त्यामुळेच उत्तर मध्य-मुंबईवर काँग्रेस लक्ष केंद्रित करणार हे उघड आहे. महाविकास आघाडीतून राज्यात १७ जागा काँग्रेस लढवत असून, विदर्भात पक्षाला यशाची आशा आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली मतदारसंघ संघर्ष करूनही काँग्रेसला मिळाला नाही. आता सोलापूर तसेच कोल्हापूर या जागा त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीत देशभरात जर काँग्रेसला चांगली कामगिरी करायची असफल तर, ४८ जागा असलेला महाराष्ट्र महत्त्वाचा ठरतो. यामुळेच या निवडणुकीत मुंबई अध्यक्षांनी चांगली कामगिरी करणे हे पक्षाच्या राज्यातील आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कळीचे ठरेल.

hrishikesh.deshpande@expressindia.com

Story img Loader