उत्तराखंडमधील नैनितालमध्ये गेल्या चार दिवसांपासून लागलेली आग सातत्याने वाढत आहे. नयनरम्य दृश्य आणि हिरव्यागार जंगलांसाठी प्रसिद्ध असलेला नैनितालचा डोंगराळ भाग आपत्तीचा सामना करीत आहे. आगीचा विळखा वाढत असल्याने अनेक वनस्पती आणि प्राण्यांचे जीवन धोक्यात आणले आहे. यंदाही वाढत्या उन्हाळ्यात जंगलात आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यातील जंगलात दोन दिवसांपासून आग पसरते आहे. या आगीमुळे नैनिताल, हल्दवानी आणि रामनगर वनविभाग सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. परिस्थिती इतकी भीषण आहे की आता भारतीय प्रशासकीय यंत्रणा आणि एनडीआरएफ मिळून जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हवाई दलाचे हेलिकॉप्टर भीमताल सरोवरामधून पाण्याच्या बादल्या भरून जंगलातील आगीवर ओतून तिच्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करतायत. जंगलाला लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत डोंगरावरील हजारो हेक्टर जमीन जळून खाक झाली आहे. एवढेच नाही तर नुकतेच नैनिताल परिसरातील जंगले तिथल्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशामक सेवेला हायकोर्ट कॉलनीपर्यंत पाचारण करावे लागले आहे. रुद्रप्रयागमध्ये शुक्रवारी जंगलाला आग लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही आजच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली असून, लवकरच या घटनांवर नियंत्रण आणले जाणार असल्याचे सांगितले आहे.

भारतात किती वेळा जंगलात आग लागते?

तीन कारणांमुळे जंगलात आग लागते, त्यात इंधनाचा भार, ऑक्सिजन आणि तापमान याचा समावेश असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कोरडी पाने जंगलातील आगीसाठी इंधन आहेत. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया (FSI) वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील जवळपास ३६ टक्के जंगलांना वारंवार आग लागण्याची शक्यता आहे. हिवाळा संपल्यानंतर आणि उन्हाळी हंगामात कोरड्या वातावरणामुळे मार्च, एप्रिल आणि मेमध्ये आगीच्या मोठ्या घटना नोंदवल्या जातात. विशेषतः कोरड्या पानझडीच्या जंगलात गंभीर आगीच्या घटना घडतात, तर सदाहरित आणि पर्वतीय समशीतोष्ण जंगलात तुलनेने कमी आगी लागतात. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०१५ नुसार, देशाच्या जवळपास ६ टक्के वनाच्छादित भागात आग लागण्याची शक्यता जास्त आहे . ईशान्य भारतातील राज्यांमध्ये जंगलात आग लागण्याची सर्वाधिक प्रवृत्ती दिसून आली. पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, दक्षिण छत्तीसगड, मध्य ओडिशा आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमधील प्रदेशांमध्येही आग प्रवण क्षेत्रे दिसून आली, अशीही ISFR २०२१ मधील FSI विश्लेषणात आढळून आले.

Fire breaks out on ground floor of apartment in Akola 11 two-wheelers gutted
अकोल्यात अपार्टमेंटच्या तळ मजल्याला आग; ११ दुचाकी जळून खाक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shocking video viral
थंडीत काकांनी केले जीवघेणे कृत्य, सिलिंडरला लावली आग अन्… VIDEO मध्ये पुढे काय घडलं एकदा पाहाच
mumbai scrap shops loksatta news
मुंबई : कुर्ला येथे भीषण आगीत भंगार दुकाने जळून खाक
Safety demonstration at fuel storage depot in Miraj sangli news
मिरजेतील इंधन साठवण आगारात सुरक्षा प्रात्यक्षिक
Fire at mahakumbh
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण अग्नीतांडव; १५ टेन्ट आगीच्या भक्ष्यस्थानी!
Building catches fire in Thane residents escape safely
ठाण्यात इमारतीला आग, रहिवाशांची सुखरूप सुटका
Fire breaks out at Goregaon furniture market
गोरेगावमध्ये फर्निचर मार्केटमध्ये आग; आगीची तीव्रता आणखी वाढली

हेही वाचा: ४ महिन्यांत २७ महिलांची हत्या; महिलांवरील वाढत्या हिंसाचारामुळे ऑस्ट्रेलिया पेटून उठलाय, देशात नक्की काय घडतंय?

जंगलात आग का लागते?

उत्तराखंडच्या जंगलात आगीची समस्या विशेषतः फेब्रुवारी ते जून या महिन्यांत दिसून येते, कारण यावेळी हवामान कोरडे आणि गरम असते. नैनितालच्या जंगलात आग लागण्याचे मुख्य कारण म्हणजे आर्द्रतेचा अभाव आहे. जंगलात असलेली कोरडी पाने आणि इतर ज्वलनशील पदार्थ तीव्र उष्णतेमुळे पेट घेतात. शेतीतील बदल आणि अनियंत्रित जमीन वापराच्या पद्धतींमुळे बहुतेक आग मानवनिर्मित असल्याचे मानले जाते. वनविभागाने उत्तराखंडमधील जंगलातील आगीसाठी चार प्रमुख कारणे जबाबदार असल्याचे सांगितले. स्थानिकांकडून जाणीवपूर्वक लावलेली आग, निष्काळजीपणा, शेतीशी संबंधित कामे आणि नैसर्गिक कारणे जबाबदार असल्याचं वनविभागाने म्हटलं आहे. अनेकदा स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या दुर्लक्षामुळे जंगलात आगीच्या घटना घडतात. स्थानिक लोक चांगल्या प्रतीच्या गवताच्या लागवडीसाठी आग लावून जमीन सपाट करतात. तर अवैध वृक्षतोड, अवैध शिकार इत्यादीसाठीसुद्धा जंगलात आग लावली जाते, त्यामुळे आग संपूर्ण जंगलात पसरते. याशिवाय काही वेळा पर्यटक जळत्या सिगारेट किंवा इतर पदार्थ जंगलात टाकतात, त्यामुळे आग संपूर्ण जंगलात पसरते. नैसर्गिक कारणांमुळेही जंगलात आगी लागतात. वाळलेल्या पानांवर विजेच्या तारांच्या घर्षणामुळे वीज पडण्यासही जंगलातही आग लागते. त्याचवेळी बदलत्या हवामानामुळे हवामान उष्ण आणि कोरडे होत असून, त्यामुळे जंगलांमध्ये आगी लागताना दिसत आहेत. भारतीय दंड संहितेनुसार जंगलाला आग लावणे हा दंडनीय गुन्हा आहे. वन अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत, परंतु अशा बहुतेक प्रकरणांमध्ये आरोपी अज्ञात आहेत.

हेही वाचाः भारतीय नृत्यकलेचे स्वरूप कसे बदलत गेले? नृत्य केल्याने खरंच आरोग्य सुधारते का?

जंगलातील आग कशी विझवली जाते?

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEFCC) जंगलातील आग रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी काही पद्धतींचा वापर करतात. आगीचे क्षेत्र लवकर शोधण्यासाठी वॉच टॉवर्सचे बांधकाम करतात. तसेच अग्निशमन निरीक्षकांची तैनाती करतात; त्यात स्थानिक समुदायांचा सहभाग आणि फायर लाईन्सची निर्मिती आणि देखभालीचाही समावेश असतो. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी (NDMA) च्या वेबसाइटनुसार, दोन प्रकारच्या फायर लाइन्स निश्चित केलेल्या असतात. कच्छा किंवा कव्हर फायर लाइन्स आणि पक्के किंवा ओपन फायर लाइन्स. कच्चा फायर लाइन्समध्ये झाडे काढून टाकली जातात आणि इंधनाचा भार कमी केला जातो. पक्क्या फाइर लाइन्समध्ये अग्निशमन रेषा ठरवून तिथली आग नियंत्रित केली जाते. आगींचे वास्तविक वेळेवर निरीक्षण करण्याबरोबरच जळालेल्या जंगलाचा अंदाज लावण्यासाठी, तसेच आगीचे उत्तम प्रतिबंध आणि व्यवस्थापन करण्यासाठी उपग्रह आधारित रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान आणि GIS साधने प्रभावी ठरली आहेत.

Story img Loader