उत्तराखंडमधील नैनितालमध्ये गेल्या चार दिवसांपासून लागलेली आग सातत्याने वाढत आहे. नयनरम्य दृश्य आणि हिरव्यागार जंगलांसाठी प्रसिद्ध असलेला नैनितालचा डोंगराळ भाग आपत्तीचा सामना करीत आहे. आगीचा विळखा वाढत असल्याने अनेक वनस्पती आणि प्राण्यांचे जीवन धोक्यात आणले आहे. यंदाही वाढत्या उन्हाळ्यात जंगलात आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यातील जंगलात दोन दिवसांपासून आग पसरते आहे. या आगीमुळे नैनिताल, हल्दवानी आणि रामनगर वनविभाग सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. परिस्थिती इतकी भीषण आहे की आता भारतीय प्रशासकीय यंत्रणा आणि एनडीआरएफ मिळून जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हवाई दलाचे हेलिकॉप्टर भीमताल सरोवरामधून पाण्याच्या बादल्या भरून जंगलातील आगीवर ओतून तिच्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करतायत. जंगलाला लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत डोंगरावरील हजारो हेक्टर जमीन जळून खाक झाली आहे. एवढेच नाही तर नुकतेच नैनिताल परिसरातील जंगले तिथल्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशामक सेवेला हायकोर्ट कॉलनीपर्यंत पाचारण करावे लागले आहे. रुद्रप्रयागमध्ये शुक्रवारी जंगलाला आग लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही आजच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली असून, लवकरच या घटनांवर नियंत्रण आणले जाणार असल्याचे सांगितले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा