वाहन खरेदी, गृह खरेदी तसेच अन्य कामांसाठी कर्ज घेतले जाते. मात्र या कर्जाच्या व्याजदरात चढउतार होत राहतो. हा चढउतार नेमका का होतो? असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. मात्र व्याजदरात बदल होण्याची अनेक कारणे आहेत. ती काय आहेत हे समजून घेऊया.

चलनविषयक धोरण

process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’

भारताच्या चलनविषय धोरणाची अंमलबजावणी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून केली जाते. प्रायमरी पॉलिसी रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट तसेच रोख राखीव प्रमाण (Cash Reserve Ratio ) वैधानिक तरलता प्रमाण (Statutory Liquidity Ratio) यांच्या माध्यमातून आरबीआय पतपुरवठा, तरलता तसेच व्याजदर यावर नियंत्रण ठेवते. RBI ने निश्चित केलेल्या दरांच्या तुलनेत इतर बँका व्याजदर निश्चित करतात. देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून आरबीआय आपले धोरण ठरवते.

हेही वाचा >>>विश्लेषण : प्रताप सरनाईक यांना ‘ईडी’ चौकशीतून दिलासा कसा मिळाला?

पुरवठा आणि मागणी

कर्जाची मागणी वाढली की व्याजदर वाढतात. जेव्हा ग्राहक बँक खाती उघडतात तेव्हा बँकांकडे कर्ज देण्यासाठी अधिक पैसे उपलब्ध होतात. मात्र कर्जदार जेव्हा कर्जाची परतफेड करत नाहीत तेव्हा बँकांकडील पैशाचे प्रमाण कमी होते. व्यवहारासाठी पैसे उपलब्ध नसल्यामुळे व्याजदर वाढतो. बाजारात भांडवलाची मागणी वाढली की त्याचा परिणाम व्याजदरावर होतो. आर्थिक मंदी किंवा मंदीच्या काळात व्याजदर अनेकदा कमी होतात.

हेही वाचा >>> विश्लेषण : तमिळनाडूची न्याहारी योजना काय आहे?

विदेशी गुंतवणूक आणि कर्ज

जागतिकीकरणामुळे जागतिक बाजाराची स्थितीदेखील व्याजदर ठरवण्यासाठी कारणीभूत ठरते. जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार स्थानिक उद्योगांमध्ये पैसे गुंतवतात. जागतिक पातळीवर व्याजदर वाढत असतील तर परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी देशांतर्गतही व्याजदर वाढवावे लागतात. आकर्षक व्याजदर असेल तर गुंतवणुकीला वाव मिळतो.

हेही वाचा >>> विश्लेषण : संसदेच्या स्थायी समित्या कशासाठी?

सरकारी कर्ज

सरकार मिळत असलेल्या महसुलापेक्षा जास्त पैसे खर्च करत असेल तर वित्तीय तूट निर्माण होते. ही वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकारलाही कर्ज घ्यावे लागते. सरकार हा बँकांचा सर्वात मोठा कर्जदार असतो. त्यामुळे सरकारने घेतलेल्या कर्जामुळे व्याजदरावरही परिणाम होतो. वाढलेल्या व्याजदराचा सरकारतर्फे घेतले जाणारे कर्ज आणि वित्तीय तुटीशी संबंध असतो.

Story img Loader