ओला आणि उबेर कर्नाटकात यापुढे मनमानीपणे काम करणार नाहीत, कारण कर्नाटक सरकारने ३ फेब्रुवारीपासून नवे नियम लागू केले आहेत. उबेर आणि ओला यांसारख्या ॲप आधारित एग्रीगेटर्सद्वारे चालणाऱ्या सिटी टॅक्सींना कर्नाटक परिवहन विभागाने जाहीर केलेल्या नवीन भाडे नियमांचे पालन करावे लागणार आहे. या निर्णयामुळे कॅब चालकांच्या कमाईत सुधारणा होऊ शकते. खरं तर हे भारताच्या विस्तृत प्रवासाच्या बाजारामध्येदेखील या नियमाने व्यत्यय येण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये कंपन्यांना स्पर्धात्मक धार मिळविण्याबरोबरच त्यांच्या व्यवसाय मॉडेलमध्ये नावीन्य आणण्यासाठी आणि वेगळे करण्यासाठी जागा मिळाली आहे. भाडे निवाडा यंत्रणा असो किंवा बुकिंग प्रक्रिया असो, Uber, Ola, BluSmart आणि inDrive यांसारख्या कंपन्या वेगवेगळ्या मार्गांनी समान सेवा देतात. कर्नाटकच्या परिवहन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांना राज्यात त्यांचे व्यवसाय मॉडेल पुन्हा तयार करावे लागणार आहे आणि स्पर्धात्मक राहण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

परिवहन विभागाचा आदेश काय?

कॅबचे तीन प्रकारात वर्गीकरण केले आहे. ज्या वाहनांची खरेदी किंमत १० लाख रुपये किंवा त्याहून कमी आहे, त्यांच्यासाठी किमान भाडे चार किमीपर्यंत १०० रुपये आणि त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त किमीसाठी २४ रुपये निश्चित करण्यात आले आहेत. १० लाख ते १५ लाख रुपये किमतीच्या वाहनांसाठी किमान भाडे ११५ रुपये आहे आणि प्रत्येक अतिरिक्त किमीसाठी भाडे २८ रुपये असेल. विशेष म्हणजे या नियमानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांमध्ये फरक केला जात नाही. मग त्यात सेडान असो किंवा एसयूव्हीमधील एअर कंडिशनिंगसारख्या वैशिष्ट्यांच्याही उपलब्धतेचा विचार केला जात नाही. शिवाय नियमाप्रमाणे केवळ प्रवास केलेल्या अंतराच्या आधारावर भाडे आकारण्याची परवानगी देते. प्रवास केलेल्या अंतराच्या आधारावर भाडे आकारत असताना पीक अवर्समध्ये भाडे वाढवणे समाविष्ट नाही. मध्यरात्री ते सकाळी ६ वाजताच्यादरम्यानच्या प्रवास भाड्यावर १० टक्के अधिभार लावण्याची परवानगी देते. १५ लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांचे किमान भाडे १३० रुपये निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरचे भाडे ३२ रुपये असेल.

नियमाचा Uber, Ola आणि BluSmart वर कसा परिणाम?

उबेर आणि ओला या कंपन्या मिळून भारतातील बहुतेक राइड हेलिंग बाजारावर नियंत्रण ठेवतात. दोन्ही कंपन्या एक आगाऊ भाडे ऑफर करतात, ज्यात मूळ दर, अंदाजे वेळ आणि मार्गाचे अंतर, परिसरातील राइड्सची सध्याची मागणी यांचा समावेश असतो. तिसरा घटक अल्गोरिदमद्वारे निर्धारित केला जातो, जो युजर्सच्या परिसरातील राइड्सच्या मागणीवर आधारित ट्रिपची किंमत आपोआप वाढवतो. एकदा युजर्सने वाहन आणि संबंधित आगाऊ भाडे निवडल्यानंतर ॲप त्यांना जवळच्या ड्रायव्हरशी जोडते. परंतु आता नव्या नियमामुळे उबेर आणि ओलाच्या भाडे निवाडा यंत्रणेत मूलभूतपणे बदल होणार आहेत, कारण ते वाढीव किंमत आणि घेतलेल्या वेळेच्या आधारावर किंमत निश्चित करण्यास परवानगी देत नाही. उबेर आणि ओलाचे भाडेदेखील वाहनाच्या प्रकारावर अवलंबून असते. ऑर्डरचे पालन करण्यासाठी दोन कंपन्यांनी त्यांच्या व्यवसाय मॉडेलमध्ये कसा बदल करण्याची योजना आखली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Uber आणि Ola च्या उलट दिल्ली NCR आधारित BluSmart चे राइड भाडे मागणीतील चढ-उतारांना पाठिंबा देते. कारण BluSmart जे सध्या फक्त दिल्ली-NCR आणि बंगलोरमध्ये कार्यरत आहे. राईड कोणत्या अंतराच्या टप्प्यामध्ये येते यावर भाडे निश्चित केले जाते. फक्त दिल्लीच्या बाजारपेठेसाठी BluSmart आराम आणि गर्दीच्या वेळेमध्ये अतिरिक्त फरकदेखील लागू करते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास गर्दीच्या वेळी ६ किलोमीटरच्या राइडसाठी दिल्लीत ब्लूस्मार्ट कॅबचे बुकिंग करण्यासाठी विश्रांतीच्या वेळी १४९ रुपयांऐवजी १९९ रुपये मोजावे लागतात.

बंगळुरूमध्ये ६ किलोमीटरपर्यंतच्या शहरातील राइड्ससाठी ब्लूस्मार्ट १९९ रुपये दर आकारते. ६ ते ९ किलोमीटर दरम्यानच्या राइड्ससाठी २४९ रुपये शुल्क आकारले जाते. विमानतळाच्या राइड्स आणि भाड्यासाठी ते वेगवेगळ्या दरांसह समान प्रणालीचे अनुसरण करते. आदेशानुसार, १० लाख ते १५ लाख रुपये किमतीच्या कारमधील ६ किलोमीटरच्या राइडसाठी किमान भाडे १७१ रुपये असेल, ही अट BluSmart चे सध्याचे भाडे आरामात पूर्ण करू शकते. विचाराधीन राइड हेलिंग कंपन्यांपैकी BluSmart ला ऑर्डरचा सर्वात कमी परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण ती वाढीच्या किमतीमध्ये भाग घेत नाही, फक्त प्रवास केलेल्या अंतराचा विचार करते आणि आधीच किमान भाड्याची आवश्यकता पूर्ण करते.

नियमाचा inDrive वर कसा परिणाम होणार?

इनड्राइव्हचे राइड हेलिंग मॉडेल Uber, Ola आणि BluSmart पेक्षा लक्षणीयरीत्या वेगळे आहे, कारण प्रवासी आणि ड्रायव्हर यांच्यावर प्रवासाचे इथे कोणतेही पूर्वनिश्चित भाडे नसते. त्याऐवजी inDrive फक्त बेस भाड्याची शिफारस करते, जे प्रवासी आणि ड्रायव्हर यांच्यात ॲपच्या माध्यमातून वाटाघाटी करू शकतात, जेणेकरुन ते परस्पर सहमतीनुसार भाडे ठरवू शकतील. शिफारस केलेले भाडे प्रति किलोमीटर सामान्य किंमत आणि प्रति मिनिट सामान्य किंमत, पिक-अप स्थानावर येणाऱ्या ड्रायव्हरचा खर्च विचारात घेते.

Uber आणि Ola च्या उलट शिफारस केलेल्या भाड्यात कोणतेही अल्गोरिदम आधारित वाढीव शुल्क समाविष्ट नसते. “आम्ही किमतीत फेरफार करत नाही आणि किंमत प्रवासी अन् ड्रायव्हर ठरवतात. एकदा प्रवाशाला जिथे जायचे आहे तिथले लोकेशन टाकल्यानंतर inDrive वर शिफारस केलेले भाडे प्रदर्शित करते, जे प्रवासी एकतर वाढवू किंवा कमी करू शकतात. प्रवासासाठी त्यांना कोणते भाडे द्यायचे आहे हे प्रवाशाने ठरवल्यानंतर जवळपासच्या चालकांना सूचित केले जाते. प्रवासी प्रस्तावित केलेले भाडे स्वीकारू शकतात किंवा नवीन भाडे प्रस्तावित करू शकतात. वैयक्तिक ड्रायव्हर राइडसाठी कोणतेही भाडे घेऊ शकतात आणि त्यांच्या पसंतीच्या आधारावर ते स्वीकारू किंवा नाकारू शकतात. प्रवासी आणि चालक दोघेही वाटाघाटी केलेल्या किमतीला सहमती देतात, तेव्हाच राइड निश्चित केली जाते. ऑर्डरसाठी inDrive चे मूळ भाडे त्याद्वारे निर्धारित केलेल्या किमान भाड्याशी जुळणे आवश्यक आहे. हे रायडर आणि ड्रायव्हरमधील अतिरिक्त वाटाघाटींवर कोणतेही निर्बंध लादत नसले तरी जास्त निश्चित आधारभूत किमतीमुळे inDrive सह ट्रिप अधिक महाग होऊ शकते.

हेही वाचाः नवाज शरीफ यांना लष्कराची पसंती? इम्रान खान यांना का डावललं जातंय? पाकिस्तानच्या निवडणुकीत काय घडतेय? वाचा….

“आमच्या अनुभवानुसार निश्चित दरांमुळे ड्रायव्हर्ससाठी प्रवासाच्या संधी वाढतील किंवा प्रवाशांसाठी वाहनाची उपलब्धता वाढेल,” असे इनड्राईव्ह इंडियाचे सार्वजनिक धोरण प्रमुख अरिजित दास यांनी सांगितले आहे. “इनड्राइव्ह सारखे प्लॅटफॉर्म विकेंद्रीकरणाचे समर्थन करतात, ग्राहक आणि ड्रायव्हर दोघांनाही सहकार्याने किमती निर्धारित करण्यासाठी सक्षम असतात. अशा बदलाचा पुनर्विचार करणे सरकारसाठी महत्त्वाचे आहे, त्याचा संभाव्य परिणाम केवळ एकंदर व्यवसायाच्या लँडस्केपवरच नव्हे, तर ग्राहक कल्याणावरसुद्धा होणार आहे, ” असेही दास पुढे म्हणाले.

हेही वाचाः विश्लेषण : संविधानात ‘समान नागरी कायद्या’चा समावेश कसा झाला? त्याबाबत डॉ. आंबेडकरांची भूमिका काय होती?

नियमामुळे ड्रायव्हर्सच्या कमाईमध्ये सुधारणा होईल का?

नियमामध्ये राइड हेलिंग कंपन्यांसाठी कमिशन दर ठरवून दिलेले नाहीत. सध्या Uber आणि Ola राईड भाड्याच्या ३० टक्क्यांपर्यंत कमिशन म्हणून आकारू शकतात, तर inDrive १० टक्के कमी आकारतात. BluSmart च्या चालकांना साप्ताहिक आधारावर पैसे दिले जातात आणि त्यांची कमाई त्यांनी प्लॅटफॉर्मवर करत असलेल्या व्यवसायाशी जोडलेली असते. कमिशनचे दर या स्तरांवर राहिल्यास ऑर्डरद्वारे सेट केलेले उच्च किमान भाडे चालकांच्या कमाईत सुधारणा करू शकतात. फेअरवर्क इंडिया रेटिंग २०२३ रिपोर्टनुसार, उबेर, ओला आणि ब्लूस्मार्ट या तीनही सहभागी राइड हेलिंग कंपन्यांनी फेअर पे निकषांमध्ये दोन पैकी शून्य गुण मिळवले आहेत.