-अनिश पाटील
शेअर बाजारातील गुंतवणूक, कूट चलनातील गुंतवणूक, टास्क गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर फसवणुकीच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. त्यासाठी मुंबई पोलिसांनी नुकतीच ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध करून त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही फसवणूक कशी होते, काय काळजी घ्यावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक कशी?

शेअर बाजार, कूट चलन, विदेशी चलनात गुंतवणुकीची थेट जाहिरात करून भामटे अनेकदा फसवणूक करतात. त्याशिवाय अर्धकालीन नोकरीच्या नावाखाली सुरुवातीला विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर गुंतवणुकीस भाग पाडले जाते. व्हीडिओ लाईक करायला सांगितले जातात. ते केल्यानंतर ५०-१०० रुपये खात्यात जमा केले जातात. अशा प्रकारे विश्वास संपादन करून मोठ्या गुंतवणुकीचे आमिष दाखवले जाते. त्यानंतर गुंतवणूक दाराला व्हॉट्सअॅप अथवा टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील करण्यात येते. काही वेळेला गुंतवणुकीच्या जाहिराती पाहूनही नागरिक संबंधितांशी संपर्क साधतात. अशा व्यक्तींना कूट चलनात (क्रीप्टोकरन्सी) अथवा शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. डीमॅट खात्याच्या नावाखाली अॅप्लिकेशनमध्ये आभासी खाते उघडले जाते. त्यात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला फायदा होत असल्याचे दिसून येते. ती रक्कम मात्र त्याला काढता येत नाही. रक्कम काढण्यासाठी दरवेळी अधिकाधिक शुल्क जमा करण्यास सांगितली जाते. अशा पद्धतीने पाच लाखांपासून अगदी ५० लाखांपर्यंत रक्कम जमा करण्यास भाग पाडून फसवणूक करण्यात आली आहे.

77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
Chandrapur district bank loksatta news
चंद्रपूर जिल्हा बँक नोकर भरती : एका जागेसाठी ४० लाख दर; आमदाराचा विधानसभेत आरोप
37 thousand cybercrime complaints in year and fraud of Rs 429 crore with citizens in Pimpri Chinchwad
Cyber Crime: काय सांगता? वर्षभरात ४२९ करोडचा नागरिकांना गंडा; ३७ हजार तक्रारी, नेमकं सायबर पोलीस काय म्हणाले? वाचा..
fraud by Police on pretext of doubling money in jalgaon
पैसे तिप्पट करण्याच्या बहाण्याने पोलिसांकडूनच फसवणूक
share market karad fraud
कराड : भांडवली बाजारातील गुंतवणुकीतून दुप्पट परताव्याच्या आमिषाने ७० लाखांना गंडा

आणखी वाचा-विश्लेषण : साखर उद्योगावर पुन्हा एकदा महाराष्ट्राची मक्तेदारी?

अशी केली जाते फसवणूक…

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाने कंपनीचे बनावट संकेतस्थळ पाठवून एका ४४ वर्षांच्या महिलेची १५ लाख रुपयांची सायबर फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलिसांनी अनया रेड्डी, अर्जुन शर्मा आणि समीर मल्होत्रा या तिघांविरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला अंधेरीतील इंडियन ऑईल नगर येथे वास्तव्याला असून त्यांचे पती इंडियन ऑईलमध्ये कार्यरत आहेत.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांना फेसबुकवर शेअर बाजार गुंतवणुकीसंदर्भात एका कार्यशाळेची माहिती मिळाली. या कार्यशाळेत नोंदणी करण्यासाठी तेथे दिलेल्या एका संकेतस्थळावर त्यांनी स्वतःची माहिती दिली. त्यानंतर काही तासांत त्यांना व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. त्या ग्रुपची ॲडमिन अनया रेड्डीने आपण एका खाजगी कंपनीची अधिकृत प्रतिनिधी असल्याचे सांगून कार्यशाळेबाबत माहिती दिली. आठवड्यातून तीन वेळा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत होते. याचदरम्यान महिलेला एक लिंक पाठवून स्वतःचे डीमॅट खाते उघडण्यास सांगण्यात आले. त्यानंतर अनयासह इतर दोघांनी तक्रारदार महिलेला विविध बँक खात्यात रक्कम जमा करण्यास प्रवृत्त केले. या गुंतवणुकीवर चांगला परवाता मिळेल असे सांगून रक्कम हस्तांतरित करण्यास सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर नफा होऊन तक्रादार महिलेच्या डीमॅट खात्यात आठ लाख रुपये जमा असल्याचे दिसून येत होते. या रकमेवर नऊ हजार ७०५ रुपये कर वजा झाल्याचे दाखवण्यात आल्यामुळे तक्रारदार महिलेला विश्वास वाटू लागला. अनयाच्या सांगण्यावरून तक्रारदार महिलेने आणखी काही रक्कम शेअर बाजारात गुंतवली. काही दिवसांनी तिने पैसे काढण्यासाठी अर्ज केला होता. यावेळी कर वजा करून त्यांना तीन लाख ३९ हजार ६७५ रुपये मिळाले.

आणखी वाचा-स्वस्तिकचा हिटलरशी संबंध कसा आला? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे?

गुंतवणुकीवर परताव्यासह पैसे मिळत असल्याने तिने आणखी गुंतवणूक केली होती. अशा प्रकारे १५ नोव्हेंबर २०२३ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत तक्रारदार महिलेने एकूण १५ लाख ५३ हजार ५७० रुपयांची गुंतवणूक केली. मात्र नंतर तक्रारदार महिलेच्या गुंतवणुकीवरील रक्कम डीमॅट खात्यातून काढता येत नव्हती. त्यांना अनयासह तिचे दोन सहकारी अर्जुन शर्मा आणि समीर मल्होत्रा विविध शुल्क बाकी असल्याचे सांगून आणखी रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदार महिलेच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सायबर सेल पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित सायबर ठगांविरुद्ध, कट रचून फसवणूक करणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

आकडेवारी काय सांगते?

कूट चलनात गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीचे गेल्या दोन महिन्यात १६ गुन्हे नोंदवले गेले आहेत. गेल्या वर्षीही कूट चलनात गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीचे ४९ गुन्हे मुंबईत दाखल झाले होते. त्यात केवळ सात गुन्ह्यांमध्येच आरोपींना अटक झाली आहे. टास्क फसवणूक अथवा नोकरीच्या नावाखाली, शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीची गेल्या वर्षी ४०० हून अधिक प्रकरणे घडली आहेत.

आणखी वाचा-विश्लेषण : ब्रिटनची वाटचाल संपूर्ण सिगारेटबंदीकडे… काय आहे नवा धूम्रपान बंदी कायदा?

फसवणूक कशी टाळता येईल?

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या अशा आमिषाला बळी पडू नये. अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन येणारे व्हॉटसअॅप संदेश किंवा एसएमएसद्वारे प्राप्त प्रलोभनाला प्रतिसाद देऊ नये. डीमॅट खाते उघडताना अधिकत ब्रोकरकडून खाते उघडावे. पैसे कमविणे हा सापळा आहे. अनोळखी ब्रोकरपासून दूर राहणेच योग्य आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीतून मोठा लाभ मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही समाजमाध्यम संदेश, व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम चॅनेल किंवा मोबाईल ॲपपासून दूर राहण्यास पोलिसांनी सांगितले आहे. तसेच अशा प्रकारे गुंतवणूक सुरू केली असल्यास ती तात्काळ थांबवून त्याबाबतची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्यावी, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे .

Story img Loader