इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून गाझा पट्टीमध्ये किती पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत याचे अचूक उत्तर मिळणे सोपे नाही. कारण इंटरनेट, विद्युत आणि इतर यंत्रणा बंद आहेत. मात्र गाझातील आरोग्य मंत्रालय, जी हमास नियंत्रित सरकारमधील यंत्रणा असून मृतदेहाची संख्या मोजत आहे, त्यांनी नुकताच मृतदेहांचा पहिला तपशीलवार अहवाल प्रसिद्ध केला. इतके सारे उद्ध्वस्त होत असतानाही, सततच्या हल्ल्यांमध्ये ही यंत्रणा कशी कार्य करते, युद्धातील मृतांची संख्या कशी मोजते, याचा आढावा…

गाझातील आरोग्य मंत्रालयाचे कार्य कसे चालते?

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात किती नागरिकांचा मृत्यू झाला याची अचूक आकडेवारी उपलब्ध करण्यासाठी गाझातील आरोग्य मंत्रालय काम करत आहे. गाझा पट्टीत किती नुकसान झाले, किती नागरिकांचा मृत्यू झाला, किती जखमी झाले याचा एकमेव अधिकृत स्रोत हे मंत्रालय आहे. नुकताच या आरोग्य मंत्रालयाने मृतांचा पहिला तपशीलवार अहवाल प्रसिद्ध केला. ज्यात मृत झालेल्या पॅलेस्टिनी नागरिकांची नावे, ओळख क्रमांक, वयोगट आणि लिंग यांची माहिती दिली आहे. एकूण ७,०२८ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात २,९१३ अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती हा अहवाल देतो. इस्रायलने परदेशी पत्रकार आणि मानवतावादी कामगारांना वगळून गाझाच्या सीमा बंद केल्या आहेत. काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थाही तिथे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या आहेत. हे पत्रकार सर्वसमावेशक मोजणी करू शकत नसले तरी, त्यांनी हवाई हल्ले, शवागृहे आणि अंत्यसंस्काराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृतदेह पाहिले आहेत. संयुक्त राष्ट्रे आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था, तज्ज्ञ यांनीही गाझा पट्टीत मृतांची आकडेवारी देणे सर्वात कठीण काम असल्याचे म्हटले आहे. अशा वेळी आरोग्य मंत्रालय याबाबत काम करत आहे. 

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
indonesia tsunami 2004 (1)
दोन लाखांहून अधिक जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ विध्वंसाने त्सुनामीचा पूर्वइशारा देणारी प्रणाली कशी बदलली?
20 years after Indian Ocean tsunami
Indian Ocean Tsunami: २००४ च्या त्सुनामीची भीषणता २० वर्षांनी काय शिकवून गेली?
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड

हेही वाचा – विश्लेषण: टाटांचा सिंगूर स्वप्नभंग आणि ताजा विजय!

आरोग्य मंत्रालय मृतदेहांची मोजणी कशी करते?

गाझातील आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल-किद्रा मृतदेह मोजणीतील अधिकृत स्रोत आहेत. गाझा शहरातील शिफा रुग्णालयातील कार्यालयातून अल-किद्रा यांच्याकडे प्रत्येक रुग्णालयातून माहिती व आकडेवारीचा सतत प्रवाह प्राप्त होतो. रुग्णालय प्रशासक सांगतात की, ते रुग्णशय्येवर असलेल्या प्रत्येक जखमी व्यक्तीची आणि शवागारात आणलेल्या प्रत्येक मृतदेहाची नोंद ठेवतात. ते ही माहिती व आकडेवारी अल-किद्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर सामायिक केलेल्या संगणकीकृत प्रणालीमध्ये प्रविष्ट करतात. संगणकीय प्रणालीमध्ये प्रत्येक माहिती नमूद करण्यासाठी विविध रंगसंगतींचा वापर करण्यात आला आहे. जसे की, नाव, ओळख क्रमांक, रुग्णालयात प्रवशाची तारीख, दुखापतीचा प्रकार, स्थिती आदी. कधी कधी नावे उपलब्धही नसतात. संपर्क यंत्रणांमध्ये बाधा येत असल्याने अल-क्रिद्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना व्यत्ययांचा सामाना करावा लागत असल्याचे ते सांगतात. मात्र आरोग्य मंत्रालय पॅलेस्टिनी रेड क्रेसेंटसह इतर स्रोतांकडून आकडेवारी गाेळा करते. या आकडेवारीची दोनदा तपासणी केली जाते. गाझाच्या इंडोनेशियन रुग्णालयाचे संचालक अतेफ अल्काहलोट म्हणाले, ‘‘आमच्या रुग्णालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद केली जाते. आरोग्य मंत्रालय दर काही तासांनी या माहितीची मागणी करतात. त्यांना मृत व जखमींची आकडेवारी, त्यातही पुरुष, महिला व अल्पवयीन अशी विभागणी करून माहिती प्रदान केली जाते. घटनास्थळावरील पत्रकार किंवा हमास संचालित सरकारी माध्यम कार्यालयाकडून काही मृतांची नावे, वय आणि ठिकाणे यांची माहिती गोळा केली जाते. नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात आरोग्य मंत्रालयाने मृत झालेल्या ६,७४७ जणांची नावे सामायिक केली आहेत. मात्र २८१ मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. 

इतक्या धोकादायक जागी कोण काम करत आहेत? 

गाझा पट्टीवर हमास या संघटनेचेच नियंत्रण आहे. गाझातील आरोग्य मंत्रालयावरही हमासचेच नियंत्रण आहे. मात्र हमासकडून चालवल्या जाणाऱ्या राजकीय व सुरक्षा यंत्रणांपेक्षा आरोग्य मंत्रालयाचे कार्य वेगळे आहे. २००७ मध्ये हमासने या क्षेत्रावर कब्जा करण्यापूर्वी पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे गाझावर नियंत्रण होते. हमासकडून केल्या जाणााऱ्या नियुक्त्या आणि पॅलेस्टाइनमधील फताह पक्षाशी संलग्न असलेल्या जुन्या नागरी सेवकांचे मिश्रण आहे. वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी शहरांचे व्यवस्थापन करणाऱ्या आणि फताह पक्षाचे वर्चस्व असलेल्या प्राधिकरणाचे रामाल्लामध्ये आरोग्य मंत्रालय आहे. गाझाला वैद्यकीय उपकरणे पुरवणे, गाझातील आरोग्य मंत्रालयाला वेतन देणे, आपत्कालीन परिस्थितीत इस्रायली रुग्णालयांमध्ये रुग्णांचे हस्तांतर करणे आदी कामे त्यांच्याकडून केली जातात. रामाल्लामधील आरोग्यमंत्री मई अल-कैला हे समांतर मंत्रालयावर देखरेख करतात. त्यांना रुग्णालयांकडून आकडेवारी प्राप्त होते. 

हेही वाचा – विश्लेषण : शिवसेना कोणाची याचा निर्णय हिवाळी अधिवेशनापूर्वी शक्य?

आधीच्या युद्धांतील मृत्यूची आकडेवारी काय आहे?

इस्रायल आणि हमास यांच्यात यापूर्वी झालेली चार युद्धे आणि अनेक रक्तलांच्छित चकमकींदरम्यान गाझातील आरोग्य मंत्रालयाने काम केले आहे. त्यांनी मिळवलेल्या मृतांच्या आकडेवारीला संयुक्त राष्ट्रांच्या यंत्रणांनीही अधिकृत मानले आहे. इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेडक्रॉस आणि पॅलेस्टिनी रेड क्रेसेंट यांनीही ही आकडेवारी वापरली आहे. युद्धानंतर संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी कार्यालयाने स्वत: संशोधन करून वैद्यकीय नोंदी केल्या असून अंतिम मृत्यूची संख्या प्रकाशित केली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये संयुक्त राष्ट्रांची संख्या गाझा आरोग्य मंत्रालयाशी सुसंगत आहे. काही आकडेवारींमध्ये विसंगती असली तरी बरीचशी आकडेवारी जुळत असल्याचे संयुक्त राष्ट्रांकडूनच सांगण्यात आले. यापूर्वी झालेल्या युद्धांत मारले गेलेले अतिरेकी व नागरिकांच्या संख्येबाबत इस्रालय आणि पॅलेस्टाइन यांच्यात मतभेद आहेत. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की २०१४ च्या युद्धात २,१२५ पॅलेस्टिनी मारले गेले, तर गाझा आरोग्य मंत्रालयाने २,३१० अशी नोंद केली. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार २,२५१ पॅलेस्टिनी ठार झाले. तीनही यंत्रणांची आकडेवारी सुसंगत नसली तरी त्यात फारशी विसंगती नाही. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था, मानवतावादी संघटना व कार्यकर्ते यांनी स्वतंत्र पडताळणी अशक्य असल्याने गाझा आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीचाच वापर केला आहे.

Story img Loader