वसई, विरार शहरासह पालघर जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणाऱ्या सुरूच्या झाडांची वनराई आता हळूहळू कमी होऊन जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. या वनराईचे संवर्धनाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. समुद्र किनाऱ्याची सुरक्षा भिंत म्हणून काम करणाऱ्या या सुरूची वनराईविषयी घेतलेला आढावा…

सुरूची वनराई फायदेशीर कशी?

वसई, विरार शहराच्या पश्चिम किनारपट्टीला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात सुरूची वनराई आहे. ही वनराई पर्यावरण संवर्धनाचे काम करते. तसेच नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण यासह इतर जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते.

Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर

वसईत वनराई विकसित कधी झाली?

वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी येथील पर्यावरणप्रेमी व शासन यांच्या पुढाकाराने विविध ठिकाणी हजारो सुरूच्या झाडांची लागवड केली होती. आज ही सुरूची बाग वसईच्या किनारपट्टीच्या सौंदर्यात भर घालत आहे.

हेही वाचा >>>पत्नीवर १० वर्षे ५० हून अधिक लोकांकडून बलात्कार, पती आढळला दोषी; फ्रान्सला हादरवणारे सामूहिक बलात्कार प्रकरण काय?

शेतकरी आणि पर्यटनाला फायदा कसा?

सुरूच्या वनराईमुळे नैसर्गिक सौंदर्य टिकून राहते. तसेच शेतकऱ्यांसाठी एक नैसर्गिक संरक्षित भिंत म्हणून सुरूची झाडे काम करतात. यामुळे समुद्राच्या भरतीच्या वेळी खारे पाणी शेतातील सुपीक जमिनीत येत नाही व हवेद्वारे उडणारी वाळूही सुरूच्या झाडांकडून रोखली जाते. वनराईमुळे येथील वातावरण अधिक निसर्गरम्य व थंडगार राहते. अशा या निसर्गरम्य परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी ही सुरूची वने आकर्षण ठरत आहेत. या सुरूच्या झाडांच्या सावलीत बसून हे पर्यटक आनंद लुटत असतात.

वनराई कोणत्या कारणामुळे धोक्यात आली?

वनराई धोक्यात येण्याची विविध प्रकारची कारणे आहेत. यामध्ये विशेषत: झाडांची छुप्या मार्गाने बेसुमार कत्तल होणे, काही ठिकाणी कत्तल करून माती भराव टाकून ती नष्ट करणे या कारणांचा समावेश आहे. याशिवाय समुद्रातील विविध ठिकाणी बेकायदा मार्गाने होणारा वाळू उपसा याचा परिणामही वनराईवर होत आहे. समुद्रकिनारे खचू लागल्याने हळूहळू सुरूची झाडे कोसळू लागली आहेत. लाटांचे तडाखे रोखण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे नसल्याने थेट लाटांचे तडाखे हे सुरूच्या मुळावर बसून ती नष्ट होत आहेत. सुरुवातीला सुरूच्या वनराईला चारही बाजूने कुंपण होते. आता तसे कुंपण नसल्याने काही गर्दुल्लेही या झाडांच्या परिसरात घुसखोरी करून त्यात मेजवान्या करणे, शेकोट्या पेटविणे याचाही परिणाम या झाडांवर होत आहे. अशा विविध कारणांमुळे दरवर्षी हजारोंच्या संख्येने सुरूच्या झाडांची वाताहत होत आहे.

हेही वाचा >>>डेस्टिनेशन अलिबाग!… रायगड जिल्हा पर्यटकांचे आवडते ठिकाण का बनले आहे? शेती, मासेमारीपेक्षा पर्यटनात अधिक रोजगारनिर्मिती?

वनराई कमी झाल्यास काय परिणाम होईल?

वसई तालुक्यातील समुद्र किनारे पर्यटक,पक्षीप्रेमीसाठी खूप प्रसिद्ध आहे. तसेच किनाऱ्यालगत विविध प्रकारच्या पशुपक्षीही आश्रयाला येत असल्याने सागरी जिवांवर अभ्यास करणारे संशोधक व पक्षी निरीक्षक वसई, विरारमध्ये येत असतात. मात्र येथील सुरूच्या बागांचे निसर्गसौंदर्य नष्ट होत असल्याने विविध पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येण्याची शक्यता आहे. सुरूची झाडेच दिवसेंदिवस कमी होत असल्याने समुद्राचे पाणी थेट किनाऱ्यालगत असलेल्या शेतात घुसू लागले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. पाणी शेतात येत असल्याने शेतजमिनीची पूर्णत: कस निघून जाऊन येथील विविध प्रकारची शेती धोक्यात आली आहे. सुरूची झाडे नष्ट झाली तर हळू हळू वाळवंट तयार होईल. यामुळे निसर्ग पर्यटनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

सुरूच्या वनराईचे संवर्धन का नाही?

वसईसह पालघर किनारपट्टीची होणारी धूप व लाटांच्या तडाख्याने किनारपट्टीच्या भागातील होणारे नुकसान टाळण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे तयार करण्यात येणार आहेत. कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत ११ धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे घेतली जाणार होती. यासाठी ७० कोटीं रुपयांचा निधी ही मंजूर केला होता. मात्र प्रत्यक्षात कामांवर अंमलबजावणी होत नसल्याने अजूनही धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे या उपाययोजना कागदावर राहिल्या आहेत. 

उपाययोजना आवश्यक

समुद्र किनारपट्टीवरील निसर्गसौंदर्य टिकवायचे असेल तर येथील सुरूची वनराई वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी किनारपट्टीच्या भागात धूपप्रतिबंधक बंधारे तयार करणे, कत्तली रोखण्यासाठी प्रयत्न करणे, वाळू उपसा रोखणे, नव्याने सुरूच्या झाडांची लागवड, अस्तित्वात असलेल्या झाडांची गणना तसेच कोसळून जाणाऱ्या झाडांच्या नोंदी ठेवणे अशा विविध उपाययोजना आवश्यक आहेत. तसेच ‘पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र’ व ‘एक मोकळी जागा’ म्हणून या बागेचे संरक्षण करून येथील जैवविविधता वाचविणे गरजेचे आहे.

Story img Loader