देखिये वो काली काली बदलियाँ… ज़ुल्फ़ की घटा चुरा न ले कहीं..
‘बीस साल बाद’ या चित्रपटातील गाण्याच्या या दोन ओळी आपसूकच एक सुंदर प्रतिमा तयार करतात; ती म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतील चिरतरुण नायिका वहिदा रेहमान यांची. उपजत निरागस भारतीय सौंदय लाभलेल्या ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री वहिदा रेहमान सिनेसृष्टीतील आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखल्या जातात, त्यांच्या याच कार्याची दखल घेवून त्यांना २०२१ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे, हा पुरस्कार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या (I&B) चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून “भारतीय चित्रपटांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल” राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला जातो. कोविड-१९ महासाथीमुळे २०२१ सालचे पुरस्कार अलीकडेच जाहीर करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वहिदा रेहमान यांच्या निवडीची घोषणा एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) करण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी वहिदा यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचा संबंध संसदेत नुकत्याच मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाशी जोडला आहे. त्यांनी नमूद केले की, वहिदा रेहमान यांनी सिनेसृष्टीसाठी मोलाची भूमिका बजावलेली आहे. त्या सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री होत्या, चित्रपटानंतर त्यांनी आपले जीवन परोपकारासाठी आणि समाजाच्या हितासाठी समर्पित केले आहे.
आणखी वाचा: व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … कथा घुंगरांच्या सामर्थ्याची ! (भाग १)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वहिदा यांचे एक्सवर अभिनंदन केले आहे. “भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अभिनयाने महत्त्वाची छाप सोडली आहे. प्रतिभा, समर्पण आणि अदाकारी यांचे समीकरण असलेल्या वहिदा रेहमान या आमच्या चित्रपटसृष्टीतील वारशाचे सर्वोत्कृष्ट प्रतीक आहेत,” असे कौतुक पंतप्रधानांकडून करण्यात आले आहे.
वहिदा रेहमान आणि त्यांचे आयुष्य बदलणारे सिनेमे
वहिदा रेहमान यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. त्यांनी १९५५ सालापासून भारतीय चित्रपट क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी तेलगू सामाजिक चित्रपट ‘रोजुलु मरायीमधून’ नृत्यांगना म्हणून पदार्पण केले. वहिदा रेहमान यांच्या ‘संभाषण’ या चरित्रात, लेखिका नसरीन मुन्नी कबीर लिहितात की, त्यांचे चित्रपटातील ‘एरुवाको सागरो रन्नो चिन्नन्ना’ हे गाणे वादग्रस्त ठरले होते, त्यामुळे वहिदा या चित्रपटातील प्रमुख कलाकार, अक्किनेनी नागेश्वर राव (ANR) आणि सोवकर जानकी यांच्या इतक्याच प्रसिद्ध झाल्या. या चित्रपटाविषयी वहिदा यांनी कबीर यांच्याकडे कथन केल्याप्रमाणे “हा चित्रपट खूप गाजला. एकदा या चित्रपटाच्या कलाकारांना आंध्रप्रदेशमध्ये या चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, हा दौरा संपल्यावर आम्ही सगळे हैदराबादला पोहोचलो. तिथेच मी गुरुदत्तजींना पहिल्यांदा भेटले. तेलगू शीर्षक “रोजुलु मरायी” म्हणजे ‘दिवस बदलले आहेत’ आणि हे शीर्षक माझ्या आयुष्यातील त्या क्षणाचे अचूक वर्णन करते.”
सीआयडी (१९५६)
गुरू दत्त हे त्याकाळात सिनेसृष्टीतील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. यांच्या भेटीनंतर वहिदा या मुंबईला आल्या, त्या वेळेस त्यांना राज खोसला यांच्या CID- सीआयडी (१९५६) या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती, ज्यामध्ये त्यांनी तत्कालीन मॅटिनी आयडॉल देव आनंद यांच्या विरुद्ध खलनायिकेची भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.
प्यासा (१९५७)
त्यांचा पुढचा चित्रपट गुरूदत्त दिग्दर्शित ‘प्यासा’ (१९५७) हा होता, या चित्रपटात त्या मुख्य भूमिकेत होत्या. त्यांनी या चित्रपटात गणिका म्हणून भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांची समिक्षकांकडून प्रशंसादेखील झाली होती. त्या १९५० आणि ६० च्या दशकात सर्वात जास्त मागणी असलेल्या आघाडीच्या महिला अभिनेत्रींपैकी एक ठरल्या, हा कालखंड ‘हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ’ म्हणून ओळखला जातो.
रेश्मा और शेरा (१९७१)
१९७१ साली त्यांनी सुनील दत्त दिग्दर्शित आणि सहकलाकार असलेल्या ‘रेश्मा और शेरा’ या प्रेमकथेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. गाइड (१९६५) आणि नील कमल (१९६८) साठी त्यांना अनेक वेळा फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. त्यांच्या गाजलेल्या काही सिनेमांमध्ये कागज के फूल (१९५९), साहिब बीबी और गुलाम (१९६२), अभिजन (१९६२), तीसरी कसम (१९६६), राम और श्याम (१९६७), खामोशी (१९६९) हे सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेले इतर चित्रपट आहेत. कभी कभी (१९७६), नमकीन (१९८२), लम्हे (१९९१), १५ पार्क अव्हेन्यू (२००५), रंग दे बसंती (२००६), आणि विश्वरूपम II (२०१८) इत्यादी काही सिनेमांचा उल्लेख करणे गरजेचे ठरते.
आणखी वाचा: विश्लेषण: Camille Claudel: एका फ्रेंच (श)सकुंतलेची कहाणी नेमकी आहे तरी काय?
वहिदा रेहमान यांच्या भूमिकांनी स्त्रीत्वाच्या बदलत्या पैलूंचे प्रतिबिंब कसे दर्शविले?
६० च्या दशकात वहिदा या यशाच्या शिखरावर पोहचल्या होत्या. त्या काळात त्यांना अनेक चित्रपटांमध्ये, बरोबरच्या सहकलाकारांपेक्षा त्यांना अधिक मानधन मिळाले होते; नील कमल, शगून (१९६४), पत्थर के सनम (१९६७), आणि खामोशी (१९६९) यांसारख्या चित्रपटांचा यात समावेश होतो. त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काळाच्या पुढे जावून पारंपरिक नायिकेच्या आवरणाला छेद देणाऱ्या भूमिका साकारल्या होत्या आणि त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाने मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटांच्या सीमा पार केल्या होत्या.
प्यासामध्ये, त्यांनी हिंदी सिनेमात ‘हुकर विथ अ हार्ट ऑफ गोल्ड’ (ज्यामध्ये सेक्स वर्कर किंवा गणिका दयाळूपणा, औदार्य आणि सचोटी यांसारखे गुण प्रदर्शित करते) ही भूमिका परिपूर्णतत्वाने साकारली होती. त्यांची ही भूमिका नंतर आलेल्या चित्रपटांसाठी महत्त्वाची ठरली. पाकीझा (१९७०), उमराव जान (१९८१), गंगुबाई काठियावाडी (२०२२), आणि बऱ्याच इतर चित्रपटातील नायिकांनी वहिदा यांच्या त्या भूमिकेतून प्रेरणा घेतली आहे.
सर्वाधिक प्रसिद्ध ठरलेल्या गाइड या चित्रपटामध्ये वहिदा यांनी रोझीची भूमिका केली होती. वहिदा यांनी या चित्रपटात एका गणिकेच्या मुलीचे काम केले आहे. त्या गणिकेला आपल्या वाटेला आलेले भविष्य आपल्या मुलीच्या वाटेला यायला नको होते. तर रोझी हिचे लग्न एका पुरातत्वशास्त्रज्ञाशी झाले होते ज्याला सहवासापेक्षा समाजभयाची काळजी अधिक होती, त्यामुळे रोझीचा जीव गुदमरायला लागतो परंतु हे तिला अमान्य होते. चित्रपटात ती एका टूर गाईडसोबत पळून जाते आणि एक यशस्वी नर्तिका होते. परंतु ज्या दिवशी तिला समजते की तो टूर गाईड सुद्धा तिचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहे, त्या क्षणी ती त्या टूर गाईडलाही तिच्या आयुष्यातून काढून टाकते. आजही, मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटातील एक स्त्री जी तिचा नवरा आणि प्रियकर दोघांनाही बाहेर काढते ही खळबळ उडवून देणारी घटना आहे, जे वहिदा यांच्या रोझीने १९६५ सालात केले होते. वहिदा यांना ‘रेश्मा और शेरा’ साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, ज्यामध्ये त्यांनी एका चपळ राजस्थानी स्त्रीची भूमिका केली होती, जी विरोधी कुळातील मुलाच्या प्रेमात पडण्याचे धाडस करते. सहकलाकार सुनील दत्त यांचा सोबतचा त्यांचा अभिनय, संवाद वितरण आणि केमिस्ट्री यांनी कायमची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे.
गुलजार यांच्या ‘नमकीन’मध्ये, वहिदा यांनी हिमाचल प्रदेशच्या ग्रामीण भागातील एका लहान कुटुंबातील माता-जुगनीची भूमिका केली होती. वहिदा यांनी त्या भूमिकेमध्ये उत्साही कामगिरीद्वारे स्त्रिया स्वावलंबी कशा असू शकतात आणि आपल्या मुलांना त्रासांपासून वाचवण्यासाठी त्यांना खुद्द पतीशीच कशा प्रकारे झगडावे लागते, हे दाखवून दिले आहे. वहिदा यांनी इतर चित्रपटांत देखील अशाच प्रकारे स्त्रीत्त्वाच्या वेगवेगळ्या छटा रेखांकित केल्या आहेत. खामोशी या चित्रपटात त्यांनी एका मनोरुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेची भूमिका साकारली आहे. जिचे द्वंद्व तिचे काम आणि विचार यांच्यातच आहे. १९७२ साली प्रदर्शित झालेला आणि कमी-प्रसिद्ध असलेला ‘जिंदगी जिंदगी’ हा सिनेमाही त्यांच्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखला जातो, ज्यामध्ये त्या एका अविवाहित आईच्या भूमिकेत आहेत. आणि पुढे जावून त्यांच्या पूर्वीच्या प्रियकराबरोबर पुन्हा एकत्र येवून आंतरजातीय विवाह करतात. त्यानंतर १५ पार्क अव्हेन्यू या सिनेमात त्यांनी एका वृद्ध आईची भूमिका साकारली आहे, जी स्किझोफ्रेनियाने पीडित तिच्या मुलीची काळजी घेते. एकूणच वहिदा रेहमान यांनी केलेल्या भूमिका काळ पाहता निश्चितच धाडसाच्या होत्या, हे मात्र नक्की !
काय आहे दादासाहेब फाळके पुरस्कार? यापूर्वी कुठल्या अभिनेत्रींना हा पुरस्कार मिळाला आहे?
चित्रपट निर्माते दादासाहेब फाळके यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाच्या स्मरणार्थ १९६९ साला मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. फाळके यांनी १९३१ साली भारतातील पहिला पूर्ण-लांबीचा चित्रपट, ‘राजा हरिश्चंद्र’ दिग्दर्शित केला, ज्याने जगातील सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगाची पायाभरणी केली. आशा पारेख, वहीदा रेहमान या दोन्ही अभिनेत्रींना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सुवर्ण कमळ पदक, शाल आणि १० लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराची पहिली विजेती देविका राणी होती, ज्यांना ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला’ म्हणून सर्वत्र ओळखले जाते, त्या भारतातील काही सुरुवातीच्या यशस्वी चित्रपटांमागे एक अग्रणी भूमिकेत होत्या.
बॉम्बे टॉकीजच्या सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे देविका आणि अशोक कुमार अभिनीत ‘अछूत कन्या (१९३६)’. यात दलित मुलगी आणि ब्राह्मण मुलगा यांच्यातील प्रेमकथा चित्रित करण्यात आली होती आणि देशात प्रचलित असलेल्या जातीय पदानुक्रमाला थेट आव्हान दिले होते. गेल्या वर्षी, ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री आशा पारेख यांना हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील योगदानाबद्दल पुरस्कार मिळाला होता. त्यांनी १९५२ सालामध्ये बाल कलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तसेच ६० आणि ७० च्या दशकात आशा पारेख या हिंदी सिनेसृष्टीतील अग्रेसर नायिकांपैकी एक होत्या.