सध्या संपूर्ण देशाला पावसाची चाहूल लागली असून अनेक ठिकाणी पावसाने हजेरीदेखील लावली आहे. महाराष्ट्रात अद्यापही मान्सून दाखल झालेला नाही. याच कारणामुळे अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा कायम आहेत. या वर्षी देशभरात अनेक ठिकाणी पारा चांगलाच चढला होता. अद्यापही अनेक ठिकाणी उन्हाचा कहर कायम आहे. याच पार्श्वभूमीवर उष्माघात का होतो? उष्माघातापासून संरक्षण व्हावे यासाठी काय काळजी घ्यायला हवी? हे जाणून घेऊ या…

मनसुख मांडविया यांनी आयोजित केली बैठक

या वर्षी देशात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवायला मिळाली. अजूनही देशातील काही भागांत उन्हाची तीव्रता कायम आहे. उन्हामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. हीच बाब लक्षात घेता केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी (२० जून) एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उष्णतेच्या लाटेसंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. तसेच देशातील ज्या भागात उष्णतेची लाट कायम आहे, त्या राज्यांना केंद्रीय पथकांच्या मदतीने साहाय्य केले जाईल. ही पथके मदतीसाठी संबंधित राज्यांमध्ये पाठवली जातील, असे मनसुख मांडविया यांनी सांगितले. यासह त्यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीने उष्माघातामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी अल्प आणि दीर्घ काळासाठी योजना बनवण्याचीही सूचना दिली आहे.

nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
maharashtra Government climate action cell plan to face climate change zws
राज्यातील हवामान कृती कक्ष कसा करणार हवामान बदलांचा सामना?
North Maharashtra gets colder Know why cold and how long
उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली; जाणून घ्या, थंडी का आणि किती दिवस?
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास

उष्णतेचा शरीरावर काय परिणाम होतो?

रखरखत्या उन्हात घराबाहेर पडल्यावर सर्वांनाच थकवा जाणवतो. उन्हात गेल्यामुळे तापमानाचे संतुलन साधण्यासाठी शरीरातून घाम येतो. परिणामी शरीरातील पाणी कमी होते. “उष्माघात होऊ नये म्हणून उन्हात घराच्या बाहेर पडू नये, असा सल्ला दिला जातो. ऊन लागल्यामुळे मृत्यू ओढावण्याचा धोका कमी असतो. उन्हातून परत सावलीत आल्यानंतर तसेच पाणी प्यायल्यानंतर शरीर थंड होण्यास सुरुवात होते. उष्माघात झाल्यानंतर मात्र काळजी घेणे गरजेचे आहे.” असे नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर सुरंजित चटर्जी यांनी दिली.

…तेव्हा उष्माघात होतो.

बाहरचे तापमान वाढलेले असते आणि दुसरीकडे शरीरातील तापमान नियंत्रित करण्यासाठी घाम येणे शक्य होत नाही, तेव्हा उष्माघात होतो. अशा परिस्थितीत शरीरातील मिठाचे संतुलन बिघडते. सोडियम, पोटॅशियम हे घटक कमी होतात. शरीरातील तापमान वाढलेल्या परिस्थितीत मिठाचेही संतुलन बिघडते तेव्हा उष्माघाताची लक्षणं दिसू लागतात.

उष्माघातामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता!

“उष्माघातामुळे मेंदूवर परिणाम होतो. एखाद्या व्यक्तीला स्षष्टपणे दिसत नाही. तसेच तंद्री येते. काही प्रकरणांत तर संबंधित व्यक्ती कोमातही जाऊ शकते. उष्मातामुळे मूत्रपिंड, यकृतावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अशा लक्षणांमुळे उष्माघात झालेल्या व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो. यासह हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते,” असे डॉ. चटर्जी यांनी सांगितले. अशा परिस्थितीत उष्माघात झालेल्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान कमी करणे हा प्रमुख उद्देश असायला हवा. अंगावर पाणी टाकणे, प्यायला पाणी देणे अशा प्रकारचे तत्काळ उपाय करता येतात, असेही चटर्जी यांनी सांगितले.

उष्माघात झाल्यानंतर रुग्णालयात कधी जावे?

शरीराचे तापमान वाढलेले आहे. मात्र घाम येत नसेल, शुद्ध हरपत असेल, उलटी होत असेल, लघवी होत नसेल, नीट श्वास घेता येत नसेल तर संबंधित रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करायला हवे. अशा परिस्थितीत वयोवृद्ध आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यायला हवी. लहान मुले, वयोवृद्धांसह तरुणांनीही तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे. तरुणांनाही उष्माघात होण्याची शक्यता असते, असे मत डॉ. चटर्जी यांनी मांडले.

उष्माघात टाळण्यासाठी काय करावे?

उष्माघात टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे उन्हामध्ये घराबाहेर न पडणे. ऊन जास्त असेल तर दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर पडणे टाळले पाहिजे. या काळात मेहनतीचे काम करणे टाळायला हवे. ऊन असताना घराबाहेर पडायचे असल्यास सोबत पाण्याची बॉटल घेणे गरजेचे आहे. तसेच शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी लस्सी, लिंबूपाणी, ओआरएस तसेच अन्य पेय प्यायला हवे. ऊन असताना मद्य, चहा, कॉफी, कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेऊ नये. अशा काळात हलके, हलक्या रंगाचे, सैल सुती पकडे परिधान करावेत. चष्मा, छत्री, शूजचा वापर करावा. राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने दिलेल्या सल्ल्यानुसार ऊन जास्त असेल तर घराला थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच घरावर कापडाचे आच्छादन करावे. शरीराचे तापमान वाढू नये यासाठी अंगावर ओले कापड टाकावे, अंघोळ करायला हवी.

परिसरात उष्षतेची लाट असेल तर स्थानिक प्रशासनाने त्यासंबंधीच्या सूचना द्यायला हव्यात. यामुळे मृतांची संख्या कमी होण्यास मदत होईल. गांधीनगरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे संचालक डॉ. दिलीप मावळंकर यांच्या नेतृत्वाखाली एका टीमने अहमदाबाद शहरासाठी उष्णतेच्या काळात एक कृती कार्यक्रम आखला होता. त्यामुळे या भागात उष्माघातामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाले होते. त्यामुळे ऊन असताना अशा प्रकारचे कृती कार्यक्रम आखणे गरजेचे आहे.

वातावरणातील आर्द्रता आणि तापमान यांचा उष्माघाताशी काय संबंध?

डॉ. मावळंकर यांनी उष्माघाताशी रात्रीचे तापमान आणि आर्द्रता यांच्यातील संबंध सांगितला आहे. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कमी असेल तर शरीरातील घामाचे पूर्णपणे बाष्पीभवन होत नाही. त्यामुळे शरीरातील तापमानात संतुलन राखणे अवघड होऊन जाते. अशा वेळी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

“जेव्हा तापमान वाढलेले असते तेव्हा शरीराला पूर्ण विश्रांती मिळत नाही. समजा, बाहेर ४४ अंश सेल्सिअस वातावरण असेल आणि तुम्ही घराच्या बाहेर पडून परत घरात आले तर कालांतराने तुमच्या शरीराचे तापमानही हळूहळू घटते. अशाच प्रकारे रात्री जेव्हा तापमान कमी असते तेव्हा शरीराचे तापमान आपोआप कमी होते. रात्रीदेखील तापमान कमी झालेले नसेल तर शरीर जास्त काळ तग धरू शकत नाही,” असेही डॉ. मावळंकर यांनी सांगितले.