भारतात आतापर्यंत ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही)ची सात प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हा एक श्वसन विषाणू आहे, ज्याची लक्षणे सामान्यतः सर्दीसारखी असतात. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये दोन बाळांना याची लागण झाली आणि महाराष्ट्रातील नागपूरमध्ये दोन मुलांची चाचणी पॉझिटिव्ह आली. नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात दोन एचएमपीव्हीचे संशयित रुग्ण आढळून आले. त्यात सात वर्षांच्या आणि १४ वर्षांच्या अशा दोन मुलांचा समावेश आहे आणि दोघांमध्येही लक्षण दिसत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे वृत्त समोर आले. परंतु, नागपूरच्या आयुक्तांनी सांगितले की, रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवल्याचे आणि दोन्ही रुग्ण आपल्या घरी गेल्याचे त्यांनी सांगितले .

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) हा आरएनए विषाणू आहे, जो न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील मेटाप्युमोव्हायरस वंशातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी सर्वांत पहिल्यांदा याचा शोध लावला होता. हा विषाणू श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो. मुलांच्या नमुन्यांचा अभ्यास करताना या विषाणूचा शोध लागला होता. संशोधन असे सूचित करते की, हा विषाणू किमान सहा दशकांपासून प्रसारित आहे आणि आता जागतिक स्तरावर तो प्रचलित श्वसन रोगजनक म्हणून ओळखला जातो. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, लहान मुले, ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक आणि ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे, त्यांना गंभीर आजार होण्याची अधिक शक्यता असते. खरंच या विषाणूची लागण झाल्याने लहान मुलांना गंभीर आजाराचा धोका उद्भवू शकतो का? त्याविषयी जाणून घेऊ.

Ranveer Allahbadia
Ranveer Allahbadia : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादिया YouTube वरून किती कमावतो? जाणून घ्या!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
school principal misconduct with female teacher
महिला पालक, शिक्षिकांना अपरात्री फोन, अश्लील संभाषण, मुख्याध्यापकावर आरोप, काय आहे प्रकरण?
ranveer allahbadia on indias got latent video
स्पर्धकाच्या आई-वडिलांच्या प्रायव्हसीवर अश्लील वक्तव्य; रणवीर अलाहाबादियावर लोकांचा संताप, म्हणाले, “विकृत…”
Akshata Murty chaturang loksatta
पालकत्वाचा संस्कार रुजवण्याची गोष्ट…
Car Crushed Child CCTV Footage Viral:
पालकांनो, लेकरांना सांभाळा! वडिलांच्या डोळ्यांसमोर पोटच्या मुलाच्या अंगावरून गेली कार…थरारक अपघाताचे CCTV Footage Viral
Crime News
Crime News : HIV पॉझिटिव्ह व्यक्तीकडून १७ वर्षीय मुलीचे अपहरण, १० महिने लैंगिक शोषण; इतके दिवस ‘असा’ राहिला फरार
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
साताऱ्यात ‘जीबीएस’चे चार संशयित आढळले
१४ आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये एचएमपीव्हीचे प्रमाण वाढत आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : भारताकडून ‘या’ देशाने घेतली प्रेरणा; नऊ कोटीहून अधिक मुलांना आणि महिलांना कसे मिळणार मोफत अन्न?

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसची लहान मुलांना लागण

चीनच्या सरकारी माध्यमांनुसार चीनमध्ये लहान मुलांमध्ये एचएमपीव्ही प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. चायना डेलीच्या गेल्या महिन्यात आलेल्या अहवालानुसार, चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन (सीडीसी) च्या अधिकाऱ्याने सांगितले की, एचएमपीव्ही हा देशात पसरणाऱ्या श्वसन विषाणूंपैकी एक आहे. आकडेवारी उघड न करता, चीनी सीडीसीने २३ डिसेंबर ते २९ डिसेंबरदरम्यान एकूण श्वसन आजारांमध्ये वाढ नोंदवली. चायना डेलीनुसार, चायना सीडीसीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेन्शनचे प्रमुख कान बियाओ यांनी २७ डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १४ आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये एचएमपीव्हीचे प्रमाण वाढत आहे. भारतात पाच एचएमपीव्ही प्रकरणे मुलांमध्ये आढळून आल्याची पुष्टी झाली आहे. तमिळनाडूने अद्याप दोन रुग्णांबद्दल तपशील जाहीर केलेला नाही.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार नागपुरात सात आणि १४ वर्षांच्या दोन मुलांना या विषाणूची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले. अहमदाबादमधील एका खासगी रुग्णालयात दोन महिन्यांच्या मुलाची एचएमपीव्ही चाचणी पॉझिटिव्ह आली. बंगळुरूमध्ये विषाणू आढळलेल्या तीन महिन्यांच्या मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि आठ महिन्यांच्या मुलावर उपचार सुरू आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, दोन्ही रुग्णांना पूर्वी ब्रॉन्कोप्न्यूमोनिया हा आजार झाला होता. या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर बंगळुरू शहरातील अनेक खासगी शाळांनी पालकांना त्यांच्या मुलांना खोकला, सर्दी किंवा ताप असल्यास वर्गात न पाठवण्याचा सल्ला दिला आहे, असे वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे. मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने गेल्या वर्षी एचएमपीव्ही संसर्गाची ३२७ प्रकरणे नोंदवली. २०२३ मध्ये हा आकडा २२५ इतका होता.

चीनच्या सरकारी माध्यमांनुसार चीनमध्ये लहान मुलांमध्ये एचएमपीव्ही प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

लहान मुले गंभीरपणे आजारी का होऊ शकतात?

‘एचएमपीव्ही’ची बहुतेक प्रकरणे सौम्य असतात. परंतु, क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, लहान मुलांना गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असतो. कारण- एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा एचएमपीव्हीचा संसर्ग झाला, तर गंभीर आजार होण्याची शक्यता असते. “मुले, इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड (कमकुवत रोगप्रतिकार शक्ती) लोकसंख्या आणि वृद्ध लोक संवेदनाक्षम असतात. त्यांना इतर श्वसन विषाणूंचा सह-संसर्ग होण्याची शक्यता असते. ‘एचएमपीव्ही’मुळे अनेकदा सर्दीची सामान्य लक्षणे दिसतात. या लक्षणांमध्ये खोकला, ताप, नाक बंद होणे यांचा समावेश आहे. परंतु, अनेक वेळा गंभीर प्रकरणांमध्ये मुलांना ब्राँकायटिस आणि न्यूमोनिया होऊ शकतो,” असे चीनच्या ‘सीडीसी’ने सांगितले.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, २००१ मध्ये एचएमपीव्हीचा शोध लागल्यापासून त्याच्या जोखमीत विशेष बदल झालेला नाही. “एचएमपीव्हीचा पहिला शोध लागल्यापासून शतकाच्या सुरुवातीपासून जगभरात मोठी समस्या म्हणून ओळखली जाते,” असे यूकेमधील वॉर्विक विद्यापीठातील व्हायरोलॉजीचे प्राध्यापक अॅण्ड्र्यू ईस्टन यांनी यांनी ‘लाइव्ह सायन्स’ला सांगितले. “गेल्या जवळपास २५ वर्षांमध्ये हा धोका फारसा बदललेला नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. “संसर्गाच्या घटना किंवा पॅटर्नमध्ये बदल होणे नेहमीच चिंताजनक असते. एचएमपीव्ही आयुष्याच्या पहिल्या वर्षात असणाऱ्या अगदी लहान बाळांसाठी एक गंभीर चिंतेची बाब आहे,” असे ईस्टन म्हणाले.

हा चिंतेचा विषय आहे का?

एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नाही आणि घाबरून जाण्याची गरज नाही यावर सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ जोर देत आहेत. त्यांच्याकडून कोविडप्रमाणेच महामारी उद्भवण्याची भीतीदेखील फेटाळण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी ‘एक्स’वर लिहिले, हा एक ज्ञात विषाणू आहे; ज्यामुळे श्वसन संक्रमण होते आणि याची प्रकरणे सौम्य आहेत. लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करून, त्या म्हणाल्या, “सर्दी झाल्यास सामान्य खबरदारी घ्या, मास्क घाला, हात धुवा, गर्दी टाळा, गंभीर लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.”

हेही वाचा : माणसांमध्ये वेगाने पसरतोय ‘रॅबिट फिव्हर’; काय आहे हा विचित्र आजार? त्याची लक्षणे काय?

वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीचे संसर्गजन्य-रोग चिकित्सक व ज्येष्ठ विद्वान अमेश अडल्जा म्हणाले, “लोकांना हे समजत नाही की, मेटापन्यूमोव्हायरस हा विषाणूंच्या कॅडरपैकी एक आहे; ज्यामुळे श्वसनमार्गाचे संक्रमण होते.” संसर्ग टाळण्यासाठी तज्ज्ञांनी, हात धुणे, शिंकताना नाक व तोंड झाकणे, बाहेर मास्क घालणे आणि आजारी लोकांच्या संपर्कात येणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Story img Loader