सध्या चित्रपट कोणता चांगला, कोणता वाईट किंवा एखादी वेबसीरिज बघायची की नाही बघायची याचा निर्णय बहुतेक लोक हे ‘आयएमडीबी’ सारख्या साईटवरील रेटिंग पाहून ठरवतात. गेल्या काही वर्षात आयएमडीबी फॉलो करणाऱ्या लोकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. आजकाल चटकन एखाद्या चित्रपटाचं रेटिंग बघून त्या चित्रपटाची किंवा कलाकृतीची गुणवत्ता ठरवली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाला आयमडीबीवर ९.५ असं रेटिंग आहे. याआधी सूर्याच्या ‘जय भीम’ या चित्रपटालाही ८.९ असं रेटिंग मिळालं होतं. याचवर्षीचा सर्वात गाजलेला चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्याला १० पैकी १० असं रेटिंग मिळाल्याचं ऐकिवात आलं होतं. नंतर या रेटिंगवरुनही बराच वादंग झाला आणि मग या चित्रपटाचं रेटिंग ८.५ वर येऊन थांबलं. फक्त आयएमडीबी, रॉटन टोमॅटोज, बुक माय शो या अशा वेगवेगळ्या साइट्सवरही आपल्याला चित्रपटाचं आणि वेबसीरिजला मिळणारं रेटिंग आपल्याला समजतं.

या रेटिंगवर कितपत विश्वास ठेवावा?

आयएमडीबी किंवा तत्सम साईट्सवर रेटिंग करणं अजिबात अवघड नसतं. तुम्ही या साईटवर जाऊन तुमच्या फेसबुक किंवा गुगल अकाऊंटच्या सहाय्याने अकाऊंट तयार करून कोणत्याही चित्रपटाला तुम्ही रेट करू शकता. ही प्रक्रिया अधिक सोपी असल्याने या साईटवर एखाद्या सेलिब्रिटीचे किंवा दिग्दर्शकाचे चाहते त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीच्या चित्रपटाला जास्तीत जास्त रेटिंग देण्याची शक्यता अधिक दाट होते शिवाय हे रेटिंगसुद्धा किती लोकांनी रेट केलं आहे त्यांच्या संख्येच्या सरासरीनुसार दिलं जातं. त्यामुळे १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील काही हजार किंवा लाख लोकांनीच या रेटिंग प्रक्रियेत सहभाग घेतलेला असतो, आणि केवळ या लोकांच्या रेटिंगवर आपण एखाद्या कलाकृतीची गुणवत्ता ठरवू शकत नाही.

आणखी वाचा : ‘हर हर महादेव’ चित्रपटासाठी आवाज का दिलात? राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले…

याबरोबरच जर ‘आयएमडीबी’वर एखाद्या चित्रपटाला जे रेटिंग मिळालं आहे त्याच्या एकदम विरुद्ध आपल्याला रॉटन टोमॅटोजवर बघायला मिळतं. उदाहरण द्यायचं झालं तर काही वर्षांपूर्वी आलेल्या शाहरुख खानच्या ‘हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाला आयएमडीबीवर १० पैकी ५ असं रेटिंग देण्यात आलं होतं, तर त्याचवेळी रॉटन टोमॅटोजवर या चित्रपटाला सर्वात कमी रेटिंग दिलं गेलं होतं. त्यामुळे या रेटिंगवर कितपत विश्वास ठेवावा हे ज्याचं त्याने ठरवावं.

रेटिंग कसं ठरवलं जातं?

कोणत्याही साईटवर सामान्य प्रेक्षक आणि समीक्षक असे दोघेही त्यांच्या पद्धतीने एखाद्या चित्रपटाला किंवा सीरिजला रेटिंग देतात. प्रेक्षकांनी केलेलं रेटिंग आणि प्रोफेशनल समीक्षकांनी केलेलं रेटिंग आणि याबरोबरच एकूण किती लोकांनी रेटिंग केलं आहे याच्या सरासरी पद्धतीने एखाद्या चित्रपटाला किंवा सीरिजल रेटिंग दिलं जातं. ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार घडल्याचं आयएमडीबीने सांगितलं होतं. अचानक या चित्रपटाचं रेटिंग वाढू लागल्याने सरासरी पद्धतीने या चित्रपटाचं अचूक रेटिंग देण्याचा आयएमडीबीने प्रयत्न केला होता.

आणखी वाचा : दिवाळीच्या मुहूर्तावर रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ ओटीटीवर पाहता येणार?

‘आयएमडीबी’ या साईटने कधीच हे रेटिंग अचूक असल्याचा दावा केलेला नाही त्यामुळे या रेटिंगला अचूक म्हणता येणार नाही. कोणत्याही साईटवर समीक्षक आणि प्रेक्षक यांच्या सरासरीनेचे एखाद्या कलाकृतीला रेटिंग दिले जाते. याबरोबरच किती लोकं त्या कलाकृतीला रेट करतात हा मुद्दादेखील ग्राह्य धरणं अत्यावश्यक आहे. एखाद्या चित्रपटाला रेटिंग कमी त्यामुळे तो चित्रपट वाईट हा सरसकट नियम याबाबतीत तरी लावता येऊ शकत नाही. कारण या कोणत्याही साईटवर निष्पक्षपणे चित्रपटाला रेटिंग देणाऱ्या लोकांची संख्या ही फार कमी आहे. त्यामुळे ज्या चित्रपटाला आज सर्वात जास्त रेटिंग आहे त्याचं रेटिंग यापुढेही तसंच राहील याची शाश्वती नाही. याला केवळ एकच चित्रपट अपवाद आहे तो म्हणजे १९९४ साली प्रदर्शित झालेला ‘The Shawshank Redemption’ हा हॉलिवूडचा चित्रपट. गेली कित्येक वर्षं हा आयएमडीबीच्या पहिल्या नंबरचं स्थान पटकावून आहे. आजवर २२ लाखांहून अधिक लोकांनी या चित्रपटाला रेट केलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How imdb rating works and is it a accurate method to rate any kind of film or webseries avn
Show comments