आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मनिष सिसोदिया हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या खूप जवळचे सहकारी मानले जातात. दिल्ली सरकारमधील अनेक महत्त्वाची खाती मनिष सिसोदिया यांच्याकडे आहेत. आम आदमी पार्टीने पंजाबमधील विधानसभा निवडणूक जिंकलेली आहे. आपचा राष्ट्रीय राजकारणात उतरण्याच्या मानस असताना सिसोदियांवर झालेली कारवाई म्हणजे केजरीवाल यांच्यासाठी मोठा फटका असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनिष सिसोदिया अरविंद केजरीवाल तसेच आप पक्षासाठी किती महत्त्वाचे आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

हेही वाचा >>> विश्लेषण: दिल्लीतील मद्य घोटाळा काय आहे? उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक का झाली?

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Worli hit and run case, High Court, Mihir Shah claim,
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली

मनिष सिसोदियांकडे वेगवेगळी १८ खाती

सिसोदिया यांच्याकडे शिक्षण खाते आहे. दिल्लीमध्ये आप सरकारने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आप पक्षाकडून सिसोदिया यांचा देशातील सर्वोत्तम शिक्षणमंत्री म्हणून उल्लेख केला जातो. याच कारणामुळे सिसोदिया यांना राज्य तसेच देशपातळीवर वेगळी ओळख मिळालेली आहे. सिसोदिया अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत जवळचे सहकारी आहेत. दिल्लीमधील आप सरकारमध्ये त्यांच्याकडे शिक्षण, अर्थ, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह असशी एकूण १८ वेगवेगळी खाती आहेत. आप सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर जैन यांचे खातेदेखील सिसोदिया यांच्याकडे सोपवण्यात आले होते.

हेही वाचा >>> अरविंद केजरीवाल यांचे साथीदार, दिल्ली सरकारमध्ये सांभाळली अनेक महत्त्वाची खाती; अटक झालेले मनिष सिसोदिया कोण आहेत?

केजरीवाल यांना मनिष सिसोदियांची कमतरता जाणवणार

सिसोदियांच्या अटकेमुळे केजरीवाल यांच्यापुढील अडचणी वाढणार?

मनिष सिसोदिया हे अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी आहेत. या द्वयींनी परिवर्तन या संस्थेत सोबत काम केलेले आहे. समाजसवेत असताना त्यांनी रेशन धान्याची उपलब्धता, वीजबिलाचा मुद्दा, माहितीचा अधिकार या महत्त्वाच्या विषयांवर काम केलेले आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल आणि आप सरकार यांच्या लढाईत सिसोदिया यांनी नेहमीच आप पक्षाच्या सेनापतीची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे केजरीवाल सरकार तसेच आप पक्षामध्ये सिसोदिया यांचे महत्त्वाचे स्थान आहे. मार्च महिन्यात दिल्लीमधील आप सरकार विधिमंडळात आपला अर्थसंकल्प मांडणार आहे. एकीकडे अर्थसंकल्पाची तयारी होत असताना दुसरीकडे सिसोदिया यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे सिसोदिया तुरुंगात गेल्यामुळे केजरीवाल यांना त्यांची कमतरता जाणवणार आहे.

हेही वाचा >>> ‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत,’ देवेंद्र फडणवीसांच्या विधानाचा अर्थ काय? पुन्हा युती होणार?

आप पक्ष कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचीही निवडणूक लढण्याची शक्यता

सिसोदिया यांच्या अटकेचा आप पक्षावर प्रतिकूल परिणाम पडणार आहे. आप पक्ष राष्ट्रीय राजकारणात उडी घेण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या पंजाबची बिधानसभा निवडणुकीत आप पक्षाने उडी घेतली होती. विशेष म्हणजे ही निवडणूक जिंकून आपने येथे एकहाती सत्ता स्थापन केलेली आहे. तसेच आप पक्षाने गुजरात, हिमाचल प्रदेशचीही निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता आप पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे. तसेच हा पक्ष कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचीही निवडणूक लढण्याची शक्यता आहे. सिसोदिया हे पक्षाची रणनीती आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. असे असताना सिसोदियांच्या अटकेमुळे आप पक्षाच्या आगामी वाटचालीवर परिणाम पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> ‘एमआयएम’ला राज्यात अल्पसंख्याक समुदायाचा किती पाठिंबा मिळणार ?

मनिष सिसोदियांच्या अटकेचा आपवर काय परिणाम होणार?

याबाबत बोलताना सिसोदिया यांच्या अटकेचा परिणाम फक्त सरकार नव्हे तर कार्यकर्त्यांच्या मनोबलावरही पडणार आहे, अशी प्रतिक्रिया आप पक्षाच्या एका नेत्याने दिली आहे. तर पक्ष आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. असे असतानाच सिसोदिया यांची अटक ही चिंतेची बाब आहे, अशी भावना दुसऱ्या एका नेत्याने व्यक्त केली आहे. भाजपालादेखील सिसोदिया यांचे आपसाठी किती महत्त्व आहे, याची कल्पना आहे. “केजरीवाल हा लोकांना माहीत असलेला चेहरा आहे. तर सिसोदिया हे प्रशासन आणि सरकारचा चेहरा आहेत. ते वेगवेगळी कार्यालयं, विभागांना अचानकपणे भेट द्यायचे आणि अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश द्यायचे. या कारवाईंचे फोटो आणि व्हिडीओज समाजमाध्यमांत पसरले. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमासंवर्धनासाठी त्याचा फायदा झाला,” अशी प्रतिक्रिया भाजपाच्या एका नेत्याने दिली.

हेही वाचा >>> शिंदे गटाच्या आमदाराला अडचणीत आणण्याची भाजपचीच खेळी

दरम्यान, पक्षाने मनिष सिसोदिया यांच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी सिसोदिया यांच्या अनुपस्थितीत आप पक्षाची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.