Republic Day 2024 In India : २६ जानेवारी २०२४ रोजी भारत आपला ७५वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. १९५० मध्ये याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली होती. या दिवसाची आठवण म्हणून भारतात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. विशेष म्हणजे दरवर्षी या सोहळ्याला एखाद्या देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले जाते. यंदा फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मात्र, प्रजासत्ताकदिनी निमंत्रित करण्यात येणाऱ्या पाहुण्यांची निवड कशी केली जाते? आणि ही प्रकिया नेमकी कधी सुरू होते, तुम्हाला माहिती आहे का? या लेखातून याविषयीच जाणून घेऊया.

हेही वाचा – Republic Day 2024: ध्वजवंदन, पथसंचलन, चित्ररथ, पुरस्कार….कसा पार पडतो प्रजासत्ताक दिनाचा सोहळा?

PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
What is the National Health Claim Exchange health insurance
आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?
Both exams held statewide school registration and student applications were open from October 17 to December 7
विद्यार्थ्यांनो अंतिम मुदतवाढ, अन्यथा,,
Pune crowded Lakshmi road, Lakshmi road pune,
विश्लेषण : पुण्यातील गजबजलेला लक्ष्मी रस्ता होणार वाहनमुक्त! कर्कश हॉर्न, बेशिस्त पार्किंग, बेदरकार वाहनचालकांना चाप… कसा? कधी?

प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते?

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुण्यांची निवड करताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. परराष्ट्र मंत्रालयाकडून ही प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी सुरू केली जाते. यावेळी भारत आणि संबंधित देशातील संबंधांचा प्रामुख्याने विचार केला जातो. तसेच भारताच्या राजकीय, व्यावसायिक, लष्करी आणि आर्थिक हितसंबंधांचाही विचार केला जातो. त्यानुसार संभाव्य पाहुण्यांची यादी तयार केली जाते. त्यातून पाहुण्यांची निवड केल्यानंतर त्यावर पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांची मंजुरी घेतली आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी शिक्कामोर्तब करताच परराष्ट्र मंत्रालयाकडून पुढील कारवाई सुरू केली जाते. महत्त्वाचे म्हणजे संबंधित पाहुण्यांच्या दौऱ्याचे नियोजन भारत सरकार, ते भेट देऊ शकतील अशा राज्यातील सरकारे आणि संबंधित देशाचे सरकार यांच्याकडून केले जाते.

याशिवाय प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुण्यांची निवड करताना ‘अलिप्ततावादी चळवळ’ हा घटकही महत्त्वाची भूमिका बजावतो. अलिप्ततावादी चळवळ ही शीतयुद्धाच्या काळात सुरू झाली होती. ही चळवळ म्हणजे विकसनशील राष्ट्रांचा असा गट होता, ज्या राष्ट्रांनी औपचारिकपणे अमेरिका किंवा रशिया या देशांच्या गटात सहभागी होण्यास नकार देत त्याऐवजी त्यांनी स्वतंत्र किंवा तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. १९५० साली पहिल्या प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो यांना निमंत्रित करण्यात आले होते. अलिप्ततावादी चळवळ सुरू करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, १९९९ ते २००२ दरम्यान चीफ ऑफ प्रोटोकॉल राहिलेले भारतीय परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी मनबीर सिंग म्हणाले, “प्रजासत्ताक दिनानिमित्त निमंत्रित संबंधित देशाचे प्रमुख हे भारताच्या आनंदात सहभागी असतात. तसेच, भारताचे राष्ट्रपती आणि संबंधित देशाचे प्रमुख यांच्यातील मैत्री यातून प्रतिबिंबित होते. या मैत्रीचे राजकीय महत्त्वदेखील असते. भारताचे इतर देशांशी असलेले संबंध अधिक दृढ करण्यासाठी संबंधित देशातील प्रमुखांना निमंत्रित केले जाते.”

हेही वाचा – Republic Day: ७५ वा की ७६ वा? प्रजासत्ताक दिनाचे यंदा कितवे वर्ष, भारतासाठी का महत्त्वाचा असणार यंदाचा सोहळा?

प्रमुख पाहुण्यांना दिला जातो ‘गार्ड ऑफ ऑनर’ :

खरं तर भारतात येणार्‍या प्रत्येक परदेशी उच्च प्रतिष्ठित व्यक्तीला भारत सरकारतर्फे सन्मान दिला जातो. मात्र, प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे महत्त्व आणि भव्यता पाहता, या सोहळ्याच्या अध्यक्षपदाचे निमंत्रण हा भारताकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान समजला जातो. प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त निमंत्रित केलेल्या प्रमुख पाहुण्यांना राष्ट्रपती भवन येथे ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिले जाते. तसेच सायंकाळी राष्ट्रपती भवन येथे स्वागत समारंभ आयोजित केला जातो. याचबरोबर प्रमुख पाहुणे राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहतात. याशिवाय, प्रमुख पाहुण्यांना पंतप्रधानांकडूनही जेवणासाठी निमंत्रित केले जाते.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्य काय?

भारत यावर्षी आपला ७५वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी ‘विकसित भारत’ आणि ‘भारत-लोकशाहीची जननी’ अशी थीम ठरवण्यात आली आहे. या वर्षीच्या परेडमध्ये महिला पथकाच्या संचलनाकडे विशेष लक्ष असेल. त्याचं कारण म्हणजे यंदा प्रथमच शंख, नगाडे यांसारख्या भारतीय वाद्यांचा समावेश असलेले १०० महिलांचे एक पथक या परेडमध्ये सहभागी होणार आहे. यामध्ये सीआरपीएफमधील महिलांच्या तुकडीचाही समावेश असेल. याशिवाय फ्रान्सच्या ३३ जणांचा समावेश असलेले बॅंड पथक आणि ९५ जणांचा समावेश असलेले मार्चिंग पथकही यंदाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहे.

हेही वाचा – Republic Day Parade 2024: प्रजासत्ताकदिनी होणारी परेडची तिकिटं बुक करण्यापासून ते ऑनलाइन कुठे पाहता येईल, जाणून घ्या

यावर्षी परेडसाठी पहिल्यांदाच देशातील १५०० शेतकऱ्यांना विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी उत्पादक संस्था आणि सिंचन योजनांच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. सर्व स्तरातील लोकांना या राष्ट्रीय सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. तसेच या वर्षीच्या परेडमध्ये एकूण १६ राज्यांच्या आणि नऊ मंत्रालयांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत.

Story img Loader