भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवरील दबदबा कायम राखला. भारतीय संघाने अहमदाबाद येथे झालेला सामना सात गडी राखून जिंकत विश्वचषकाच्या गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले. एकदिवसीय विश्वचषक इतिहासात भारताचा हा पाकिस्तानवरील सलग आठवा विजय ठरला. या सामन्यात भारतीय संघाने सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करून बाजी मारली. भारतीय संघाने हा विजय कशा प्रकारे मिळवला आणि विश्वचषक स्पर्धेतील पुढील प्रवासासाठी हा सामना किती महत्त्वाचा होता, याचा आढावा.

भारतासाठी पाकिस्तानविरुद्धचा विजय किती महत्त्वाचा होता?

विश्वचषक स्पर्धेत या वेळी केवळ भारतच नाही, तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघाने अपराजित राहून सुरुवात केली आहे. भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान पाठोपाठ पाकिस्तानवर विजय मिळवून गुणतालिकेत आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने इंग्लंड, बांगलादेश, नेदरलँड्स यांचे आव्हान परतवून तीन विजय मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिका संघ त्यांच्याच मागे आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा सामना तुलनेने दुबळ्या नेदरलँड्सशी होणार आहे. त्यामुळे हा सामना मोठ्या फरकाने जिंकल्यास दक्षिण आफ्रिका संघ आघाडीवर जाऊ शकेल. त्यामुळे न्यूझीलंड आणि आफ्रिका या संघांपेक्षा गुणतालिकेत सरस राहण्याकरिता भारतासाठी पाकिस्तानविरुद्धचा विजय महत्त्वाचा होता.

India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य
Champions Trophy Javed Miandad Angry on India for Not Travelling Pakistan Said If We Dont Play India at all Pakistan cricket will Prosper
Champions Trophy: “भारत-पाकिस्तान सामनाच नाही झाला तर…”, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणार नसल्याने BCCI, ICCवर संतापले जावेद मियांदाद
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Pakistan Surpassed India And Holds Record of Most ODI Wins by Asian Team in Australia After AUS vs PAK match
पाकिस्तानने मोडला भारताचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या विजयासह अशी कामगिरी करणारा पहिला ठरला आशियाई संघ

हेही वाचा : इस्रायलने युद्धात पांढरा फॉस्फरस’ वापरल्यामुळे टीका का होतेय?

भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर कसे नियंत्रण राखले?

नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती. तसेच हिरवेगार मैदानही कमालीचे वेगवान होते. खेळपट्टी काळ्या मातीची असल्यामुळे चेंडू फारसा उसळत नव्हता. त्यामुळे चेंडूचा टप्पा अचूक राखणे आवश्यक होते. पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांनी सुरुवातीस केलेल्या फलंदाजीवरून ही खेळपट्टी गोलंदाजीसाठी फारशी अनुकूल नाही असे वाटू लागले होते. अशा वेळी भारतीय गोलंदाजांनी संयम राखून योजनेनुसार मारा करणे गरजेचे होते आणि त्यांनी ते केले. चेंडूच्या वेगावर नियंत्रण ठेवून भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांवर अंकुश ठेवला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतरही वेगाने धावा करू शकणार नाहीत याची भारतीय गोलंदाजांनी काळजी घेतली.

पाकिस्तानचा डाव गडगडण्यामागे निर्णायक क्षण कोणता?

फलंदाजीसाठी पोषक असणारी खेळपट्टी आणि वेगवान मैदान, यावर बाबर व रिझवान स्थिरावल्यामुळे भारताला धोका कमी नव्हता. अशा वेळी कर्णधार रोहित शर्माने मधल्या षटकांनंतर पुन्हा एकदा सिराज आणि बुमरा यांना गोलंदाजीला आणले. कुलदीपची फिरकी होतीच. सिराजने बाबरचा अडथळा दूर केला. त्यानंतर कुलदीपने सौद शकिल आणि इफ्तिखार अहमदला एकाच षटकात बाद केले. तरी समोर रिझवान उभा होता. भारतासाठी तो कायम धोकादायक ठरला आहे. सामना एकहाती फिरवण्याची क्षमता रिझवानकडे आहे. मात्र, बुमराच्या हळूवार आलेल्या इन कटरने रिझवानच्या यष्टी उद्ध्वस्त केल्या आणि पाकिस्तानच्या फलंदाजीतले उरले-सुरले अवसान गळून गेले. या क्षणापासून भारतीय संघ सामन्यात वरचढ ठरला.

हेही वाचा : पोटातील मुलाच्या जगण्याचा अधिकार महत्त्वाचा? की महिलेच्या निर्णयाला अधिक महत्त्व? गर्भपात कायद्याची नव्याने चर्चा का होत आहे? 

भारताविरुद्ध खेळण्याचे दडपण पाकिस्तानवर होते का?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या मैदानावरील सामन्यात दोन्ही संघांवर समान दडपण असते. दोन देशांमध्ये असलेल्या तणावपूर्ण संबंधामुळे मैदानापेक्षा या सामन्यातील निर्णयाचे परिणाम मैदानाबाहेर अधिक उमटत असतात. या दडपणाचा सामना करण्यात पाकिस्तानी खेळाडू कमी पडले हे नक्की. द्विदेशीय लढतींचा इतिहास पाकिस्तानच्या बाजूने आहे. मात्र, विश्वचषक स्पर्धेचा इतिहास भारताच्या बाजूने आहे. सिडनीत १९९२ पासून हे सुरू झाले. तेव्हापासून भारतीय संघाने पाकिस्तानवर पूर्ण वर्चस्व गाजवले आहे. याचे दडपण यंदाही पाकिस्तान संघावर दिसले. त्यामुळेच चांगल्या सुरुवातीनंतरही त्यांनी १३ षटकांत ३६ धावांत ८ फलंदाज गमावले. एकवेळ २ बाद १५५ अशा सुस्थितीत असलेल्या पाकिस्तानचा डाव केवळ १९१ धावांत आटोपला.

भारताने या दडपणाचा कसा सामना केला?

मुळात हा सामना भारतात असल्यामुळे यजमानांचेच पारडे जड होते. त्यात जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट मैदानावर लाखभर प्रेक्षकांची उपस्थिती होती. सामन्यापूर्वी राष्ट्रगीत ते सामना सुरू झाल्यावर प्रेक्षकांच्या तोंडून निघणारा भारत..भारत..इंडिया…इंडिया हा जयघोष इतका टिपेला पोहोचला होता की जणू यामुळे भारतीय खेळाडूंना स्फुरण चढले. दुसरे महत्त्वाचे म्हणजे कर्णधार रोहितने गोलंदाजांवर दाखवलेला विश्वास निर्णायक ठरला. पाकिस्तानी फलंदाज सिराजचा समाचार घेत असतानाही त्याला सलग सहा षटके देण्याचे धाडस रोहितने दाखवले. डावाची मधली षटके हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाकडून उत्तम पद्धतीने टाकून घेतली. पुन्हा निर्णायक क्षणी सिराज, बुमराला गोलंदाजीला आणण्याचा त्याचा निर्णय कमालीचा ठरला.

हेही वाचा : विश्लेषण : कथित एमथ्रीएम आणि आयआरईओ आर्थिक घोटाळा काय आहे? ईडीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचे कोणते महत्त्वाचे निरीक्षण?

भारतीय फलंदाजीचे योगदान किती?

विजय गोलंदाजांनी दृष्टिक्षेपात आणला. फलंदाजांनी तो साकार केला. या वेळी पुन्हा एकदा धावगतीकडे ठेवलेले लक्ष खूप महत्त्वाचे ठरले. रोहितने सुरुवातीपासून आक्रमक शैलीत खेळायला सुरुवात केली आणि पाकिस्तानी गोलंदाजांना निष्प्रभ केले. गिल आणि कोहली लवकर बाद झाले, पण श्रेयस अय्यरने आपल्या मुंबईकर सहकाऱ्याला साथ दिली आणि धावगती कमी होणार नाही याची काळजी घेतली. हा झटपट विजय आणि वाढलेली धावगती पुढे जाऊन कामी येईल.

भारत उपांत्य फेरीसाठी कसा पात्र ठरू शकतो?

भारताचा उपांत्य फेरीपर्यंतचा मार्ग सुकर झाला हे निश्चित, पण त्यासाठी अजून किती विजय भारताला आवश्यक आहेत हे आता सांगणे कठीण आहे. २०१९ची स्पर्धा याच पद्धतीने खेळविली गेली होती आणि न्यूझीलंडचा संघ केवळ पाच विजयांसह उपांत्य फेरीत पोहोचला होता. यंदा उपांत्य फेरी गाठण्यासाठी ६ विजय (१२ गुण) पुरेसे ठरतील असे सध्या म्हणता येऊ शकते. म्हणजे भारताला अजून तीन विजय आवश्यक आहेत. बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स या सहा संघांविरुद्ध भारताचे उर्वरित सामने होणार आहेत.