How is a National Party in India Defined : केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी आम आदमी पक्षाला (AAP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस (TMC) आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) या तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला. दरम्यान, निवडणूक आयोगाने राष्ट्रीय लोकदल (उत्तर प्रदेश), भारत राष्ट्र समिती (आंध्र प्रदेश), पीडीए (मणिपूर), पीएमके (पुद्दुचेरी), राष्ट्रीय समाज पार्टी (पश्चिम बंगाल) आणि एमपीसी (मिझोराम) या पक्षांचा राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला. निवडणूक आयोगाने म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा अनुक्रमे नागालॅण्ड आणि मेघालय या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा कायम राहील. नुकत्याच दोन्ही राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी चांगली कामगिरी केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
त्याचबरोबर लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) नागालॅण्डमध्ये अधिकृत प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला आहे. ‘व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी’ला मेघालय तर टिप्रा मोथा पक्षाला त्रिपुरामध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला आहे. तर भाजपा, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी आणि आता आम आदमी पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय?
राष्ट्रीय पक्ष या नावातूनच राजकीय पक्षाचे संपूर्ण देशात अस्तित्व असल्याचे दिसून येते. तर फक्त एखाद-दुसऱ्या राज्यापुरत्या मर्यादित असलेल्या पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळतो. भाजपा आणि काँग्रेस हे दोन मोठे राष्ट्रीय पक्ष आहेत. तर काही छोट्या पक्षांनाही राष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला असेल तर याचा अर्थ असा होत नाही की, देशभरात त्या पक्षाला राजकीयदृष्ट्या फार महत्त्व आहे. काही पक्ष फक्त एखाद्या राज्यातच प्रभावशाली असतात. जसे की, तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्ष, ओदिशामध्ये बिजू जनता दल, आंध्र प्रदेशमध्ये वायएसआरसीपी, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि तेलंगणामध्ये तेलगू राष्ट्र समिती. हे पक्ष त्या त्या राज्यांत सर्वात मोठे असले तरी ते प्रादेशिक पक्ष म्हणून गणले जातात.
हे वाचा >> विश्लेषण : राजकीय पक्षांची नोंदणी नेमकी कशी होते? मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांसाठी काय आहेत नियम?
राजकीय पक्षाला ‘राष्ट्रीय पक्षा’चा दर्जा कसा मिळतो?
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा ठरविण्यासाठी निवडणूक आयोगाने काही निकष ठरविलेले आहेत. या निकषांची पूर्तता झाल्यानंतर किंवा निकष पूर्ण होत नसतील तेव्हा, वेळोवेळी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो किंवा काढून घेतला जातो. हे त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार ठरविले जाते. राजकीय पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाने २०१९ साली दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय पक्ष म्हणजे…
अ. ज्याची चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांत अधिकृत नोंदणी आहे. किंवा
ब. चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यातून शेवटच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत अशा पक्षाच्या उमेदवारांनी कमीत कमी ६ टक्के वैध मते मिळवलेली असावीत. तसेच शेवटच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे किमान चार खासदार निवडून आलेले असावेत.
क. जर तीन राज्यांत (त्यापेक्षा कमी नाही) लोकसभेच्या एकूण जागांपैकी दोन टक्के जागा जिंकल्या तर
प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा मिळतो?
अ. शेवटच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात कमीत कमी सहा टक्के वैध मतदान मिळवलेले असावे किंवा किमान दोन आमदार असावेत. तसेच लोकसभा निवडणुकीत कमीत कमी सहा टक्के वैध मतदान मिळवलेले असावे आणि लोकसभा निवडणुकीत किमान खासदार जिंकून आलेला असावा. किंवा
ब. शेवटच्या विधानसभा निवडणुकीत कमीत कमी तीन टक्के जागा जिंकाव्यात किंवा तीन आमदार निवडून आलेले असावेत. यापैकी जे अधिक असेल ते ग्राह्य धरले जाईल.
क. लोकसभा निवडणुकीत २५ जागांमागे किमान एक जागा संबंधित पक्षाने मिळवलेली असावी.
ड. शेवटच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संबंधित पक्षाला एकूण आठ टक्के वैध मते मिळालेली असावीत.
आम आदमी पक्ष कोणत्या निकषात बसतो?
आम आदमी पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान घेऊन बहुमताच्या आधारावर विजय मिळवलेला आहे. मागच्या वर्षी झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना ६.७७ टक्के मतदान मिळाले होते. तसेच गुजरात राज्यात मागच्या वेळी निवडणूक लढवून चौथ्या राज्यांत देखील अधिकृत पक्षाचा दर्जा आम आदमी पक्षाने मिळवला होता. गुजरातमध्ये त्या पक्षाने १३ टक्के मतदान मिळवले होते, जे की आवश्यक असलेल्या ६ टक्के मतदानाच्या मागणीपेक्षा दुप्पट होते. दिल्ली, पंजाब, गोवा आणि गुजरात राज्यांत मतदान मिळवण्याचे निकष पूर्ण केल्यामुळे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. त्यासोबतच डिसेंबर २०२२ मध्ये हिमाचल प्रदेश येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला एकच टक्के मतदान मिळाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा का गेला?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १० जून १९९९ रोजी झालेली आहे. त्यानंतर काही महिन्यांतच १० जानेवारी २००० रोजी त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हा दर्जा कायम होता. मात्र त्यानंतर निकषांची पूर्तता होत नसल्याकारणाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्यांना वारंवार नोटीस बजावण्यात आली होती. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि नागालॅण्ड या ठिकाणी पक्षाचे अस्तित्व कमी झालेले आहे.