जपान सरकारचे एक पाऊल भारतीय शेअर बाजारासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी निप्पॉन वैयक्तिक बचत खाते (NISA) ‘नवीन भांडवलशाही’चा भाग म्हणून लोकांना उपलब्ध करून दिले असून, घरगुती संपत्ती आणि मालमत्ता होल्डिंगला चालना देण्याबरोबरच कुटुंबांना शेअर्ससारख्या धोकादायक साधनात सुरक्षित गुंतवणूक करण्यास मदत मिळणार आहे. भारतीय शेअर बाजाराला ते कशी मदत करू शकते? जाणून घेऊ यात
NISA ही मूलत: जपान सरकारची करमुक्त शेअर गुंतवणूक योजना आहे. फंड घराण्यांकडे रोखीने ठेवलेले ट्रिलियन येन निसाद्वारे शेअर बाजारामधील गुंतवणुकीत रूपांतरित करू शकते. जपानने २०१४ मध्ये NISA लाँच केले. ते UK च्या वैयक्तिक बचत खाते (ISA) प्रणालीनुसार तयार केले गेले. NISA खाती दोन प्रकारची असून, एक सामान्य NISA खाते आणि tsumitate (बचत) NISA खाते आहे. सामान्य खात्यामध्ये देशी आणि विदेशी इक्विटी तसेच एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF), रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REITs) आणि म्युच्युअल फंड यांचा समावेश होतो. Tsumitate NISA खाते म्युच्युअल फंड घराणे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वापरतात.
सध्या व्यक्ती सर्वसाधारण NISA खात्यांमध्ये प्रति वर्ष १.२ दशलक्ष येन (८०२० डॉलर)पर्यंत किंवा Tsumitate खात्यांमध्ये ४००,००० येनपर्यंत गुंतवणूक करू शकतात आणि त्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न जपानच्या २० टक्के भांडवली नफा करातून सूट मिळण्यास पात्र असते. गुंतवणुकीचे प्रमाण आणि कर सवलत सर्वसाधारण NISA खात्यांना पाच वर्षांसाठी आणि tsumitate NISA साठी २० वर्षांसाठी वैध आहे. जानेवारीपासून सामान्य आणि Tsumitate NISA मधील गुंतवणूक वाढवण्यासाठी फ्रेमवर्कमध्ये बदलले गेले आहेत. जी व्यक्ती वार्षिक गुंतवणूक ३.६ दशलक्ष येन रकमेपर्यंत करू शकते, त्यांना सामान्य NISA खात्यातील मर्यादा दुप्पट करून २.४ दशलक्ष येन केली जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला NISA मध्ये एकत्रित एकूण १८ दशलक्ष येन ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे, जी कायमस्वरूपी करमुक्त असेल.
हेही वाचाः सेमीकंडक्टर चिप आता भारतात तयार होणार, टाटा ग्रुपही प्लांट उभारणार, नेमकी योजना काय?
किशिदाने NISA ला का दिली चालना?
किशिदा यांनी NISA ला भांडवलशाहीच्या नवीन स्वरूपासाठी आधारस्तंभ बनवले आहे, जे उत्तम संपत्ती वितरण आणि वाढीचे चक्र यांसारख्या संकल्पनांवर जोर देते. वृद्धत्वाच्या समाजात जिथे अर्ध्याहून अधिक घरगुती आर्थिक मालमत्ता रोखीने ठेवली जाते, तिथ घरगुती उत्पन्न दुप्पट करणे आणि व्यक्तींना सार्वजनिक पेन्शन निधीवर कमी अवलंबून राहण्यास मदत करण्याचे किशिदा यांचे उद्दिष्ट साध्य होते. बँक ऑफ जपानच्या म्हणण्यानुसार, जपानी कुटुंबांकडे जूनपर्यंत विक्रमी २११५ ट्रिलियन येनची आर्थिक मालमत्ता होती, जी एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ४.६ टक्क्यांनी जास्त आहे. निम्म्याहून अधिक रक्कम रोखीत ठेवण्यात आली होती. FSA नुसार यंदा जूनपर्यंत NISA खात्यांची संख्या १९.४ दशलक्ष होती, जी जून २०१४ मध्ये ७.२७ दशलक्ष होती. एकूण खात्यांपैकी त्यांच्या ४० च्या दशकातील लोकांचा वाटा १८.९ टक्के होता, यंदाचा सर्वात मोठा भाग त्यांच्या ५० च्या दशकातील लोकांचा वाटा १८ टक्के आहे. त्यांच्या ८० च्या दशकात असलेल्यांनी एकूण ६.७ टक्के भाग घेतला.
हेही वाचाः विश्लेषण : मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार का? कोणते मुद्दे उपस्थित होऊ शकतात?
FSA नुसार, NISA खातेधारकांनी २०१४ पासून आणि जूनपर्यंत शेअर आणि इतर आर्थिक उत्पादने खरेदी करण्यासाठी ३२.८ ट्रिलियन येन खर्च केले आहेत. या वर्षी त्यांनी २.७ ट्रिलियन येन खर्च केले. सर्वात लोकप्रिय उत्पादने गुंतवणूक ट्रस्ट आहेत, लोकांनी आतापर्यंत त्यापैकी १९ ट्रिलियन येन म्हणजे एकूण ५८.८ टक्के, त्यानंतर १२.४ ट्रिलियन येन म्हणजेच ३८ टक्के किमतीचे वैयक्तिक शेअर्स खरेदी केले आहेत. त्यांनी ७९३ अब्ज येन किमतीचे ETF आणि २३९ अब्ज येन किमतीचे REIT खरेदी केले आहेत. बहुतेक विश्लेषकांच्या अंदाजानुसार पैसे प्रामुख्याने यूएस इक्विटी फंड आणि यूएस सिंगल शेअर्समध्ये गेले आहेत.
ते भारतीय शेअर बाजाराला कशी मदत करणार?
बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजचे मुख्य जपान FX स्ट्रॅटेजिस्ट शुसुके यामादा यांनी सांगितले की, २०२३ च्या मध्यापासून जपानी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक वाढवत आहेत. यामादा म्हणाले की, जपानने जानेवारीमध्ये भारताशी संबंधित गुंतवणूक साधनांमध्ये १५७ अब्ज येनची गुंतवणूक केली. त्यात विदेशी गुंतवणूकदारांकडून ४३ टक्के इक्विटी आणि डेट सिक्युरिटीजचा समावेश आहे. “फेब्रुवारीमध्ये बाह्य तोशिन (गुंतवणूक ट्रस्ट) गुंतवणुकीला गती येईल आणि भारत केंद्रित तोशिन्सकडे येणारा ओघ स्पष्टपणे वाढत आहे,” असंही यामादाने म्हटले आहे. ईस्टस्प्रिंग इन्व्हेस्टमेंट्सचे विक्री आणि विपणन प्रमुख यासुतोमो मेंतानी यांनीसुद्धा भारतीय समभागांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं आहे. मेंतानी पुढे म्हणाले की, शेअर बाजारातील चांगली कामगिरी आणि जागतिक पुरवठा साखळी चीनपासून दूर झाल्यामुळे भारत हे गुंतवणुकीचे ठिकाण बनले आहे.