गेल्या काही दिवसांपूर्वीच काही तरुणांना रशियन सैन्यात जबरदस्तीने भरती करून युक्रेनमध्ये लढण्यासाठी पाठवले जात असल्याची बातमी आली होती. याबाबत परराष्ट्र मंत्रालय सतर्क झाले असून, त्यांनी रशियन सरकारशी चर्चा सुरू केली आहे. खरं तर रशियामध्ये भारतीयांना पाठवणाऱ्या एजंट्स आणि कंपन्यांवर सीबीआयने छापा टाकल्यानंतर युक्रेनविरुद्ध रशियाच्या युद्धात भारतीय तरुणांना कशा पद्धतीने फसवून पाठवले जात आहे हे उघड झाले आहे. काहींना डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी देण्याच्या बहाण्याने पाठवले गेले आहे, तर काहींना ते रशियन सैन्यात सहाय्यक म्हणून काम असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर छावणीच्या ठिकाणी जाऊन या तरुणांची सर्व वैध कागदपत्रे घेतली जातात. मग त्यांना युद्ध प्रशिक्षण दिले जाणार असून, फ्रंट लाइनवर पाठवले जाणार असल्याचं सांगितले जाते, जेव्हा तरुण नकार देतात, तेव्हा रशियन पोलिसांमार्फत त्यांना ताब्यात घेतले जाते आणि त्यांना अज्ञात स्थळी ठेवले जाते. एकतर आमच्याशी करार करा नाही तर त्यांना १० वर्षांची शिक्षा भोगा, अशी भीती घातली जाते. त्यामुळे तरुणांना तिथल्या भाषेत करारनामा दिला जातो आणि त्यावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर त्यांना युक्रेनविरोधातील युद्धात ढकलले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा