अमेरिकेच्या अध्यक्षांची निवड करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. अमेरिकेची ५० राज्ये आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया या राजधानीच्या भागात निवडणूक वर्षाच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या मंगळवारी मतदान होते. पण निवडीची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. ती कशी?

एकूण किती जागा?

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ५३८ जागांसाठी मतदान होते. अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या ४३८ जागा अधिक अमेरिकी सेनेटच्या १०० जागा यांचे मिळून ५३८ मतदारसंघ असतात. २७० जागा मिळवणारा उमेदवार विजयी ठरतो. या निवडणुकीत दोन प्रकारची मते असतात – प्रत्यक्ष मते (पॉप्युलर वोट्स) आणि प्रातिनिधिक मते (इलेक्टोरल वोट्स). इलेक्टोरल कॉलेज किंवा प्रतिनिधीवृंद हे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. दोन्ही पक्ष प्रत्येक राज्यात आपले प्रतिनिधी (इलेक्टर) नेमतात. मतदार अध्यक्षीय उमेदवारांना थेट मत न देता संबंधित प्रतिनिधींना देतात. कॅलिफोर्निया राज्यात सर्वाधिक ५४ प्रातिनिधिक मते किंवा इलेक्टोरल वोट्स आहेत. त्याखालोखाल टेक्सास (४०), फ्लोरिडा (३०), न्यूयॉर्क (२८), पेनसिल्वेनिया आणि इलिनॉय (प्रत्येकी १९), ओहायो (१७), जॉर्जिया व नॉर्थ कॅरोलिना (प्रत्येकी १६) असे क्रमांक लागतात. राजधानी वॉशिंग्टनमध्ये (डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया) ३ इलेक्टोरल वोट्स आहेत. त्याचप्रमाणे नॉर्थ डकोटा, साउथ डकोटा, अलास्का, डेलावेर, वेरमॉन्त या राज्यांमध्येही प्रत्येकी ३ इलेक्टोरल मते आहेत. त्या दृष्टीने ही राज्ये निवडणूकदृष्ट्या सर्वांत छोटी ठरतात. अमेरिकेतील ४८ राज्ये आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामध्ये इलेक्टोरल वोट्सचा विचार होतो. पण नेब्रास्का आणि मेन ही दोन राज्ये यास अपवाद आहेत. तेथे प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्यक्ष मते अधिक मिळवणाऱ्या उमेदवारास त्या जिल्ह्याचे प्रातिनिधिक मत मिळते. गत निवडणुकीत नेब्रास्कातील ५ पैकी १ मत जो बायडेन यांना, तर उरलेली ४ ट्रम्प यांना मिळाली. याउलट मेन राज्यात बायडेन यांना ४ पैकी ३ प्रातिनिधिक मते मिळाली, तर चौथे प्रातिनिधिक मत ट्रम्प यांना मिळाले. 

Election Commission, maharashtra Director General of Police, Rashmi Shukla
विश्लेषण : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर निवडणूक आयोगाने का हटविले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What is A B form Why A B form so important during elections
ए. बी. फॉर्म म्हणजे काय? या फॉर्मला निवडणूक काळात इतके महत्त्व का?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा >>>Ant Farmers: ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी मानवाने नाही तर ‘या’ कीटकाने केली शेतीला सुरुवात; नवीन संशोधन काय सांगते?

अध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब कधी?

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी मुख्य मतदान होते. पण त्याआधीपासूनच अनेक राज्यांमध्ये टपालाद्वारे मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली असते. अमेरिकेचे जगभरात वास्तव्यास असलेले मुत्सद्दी, राजनैतिक कर्मचारी, सैनिक आणि सामान्य नागरिक टपालाद्वारे मतदान करतात. मुख्य मतदानाच्या रात्रीच अनेकदा वाहिन्या आणि वृत्तसंस्थांच्या पाहणीतून मतदानाचा कल स्पष्ट होतो. त्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी उमेदवार विजयी ठरल्याचे स्पष्ट झाले तरी अध्यक्ष म्हणून निवडून येण्याची औपचारिकता बाकी असते. डिसेंबरच्या मध्यावर विजयी पक्षाचे प्रतिनिधी किंवा इलेक्टर अध्यक्षपदाच्या उमेदवारास कौल देऊन तो विजयी झाल्याचे जाहीर करतात. या निवडीस जानेवारीमध्ये अमेरिकी काँग्रेसची मान्यता मिळते. जानेवारीमध्येच नवीन अध्यक्षांचा शपथविधी होतो. इलेक्टर्सनी निर्धारित अध्यक्षीय उमेदवारास मतदान करणे अपेक्षित असते. तसे न करणाऱ्यांना ‘फेथलेस इलेक्टर्स’ असे संबोधले जाते. काही राज्यांमध्ये अशा प्रकारे पक्षादेश धुडकावणाऱ्यांवर कारवाईची तरतूद आहे. 

‘स्विंग स्टेट्स’ ठरवणार अध्यक्ष

अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाची पारंपरिक समर्थक राज्ये आहेत. कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क ही राज्ये नेहमी डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करतात. तर टेक्सास सदैव रिपब्लिकनांच्या पाठीशी उभे राहते. या गणितानुसार डमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांना २२६ इलोक्टोरल आणि ट्रम्प यांना २१९ इलेक्टोरल मते मिळतील हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे हॅरिस यांना ४४ आणि ट्रम्प यांना ५१ मतांची गरज आहे. यासाठी पेनसिल्वेनिया (१९), व्हिस्कॉन्सिन (१०), मिशिगन (१५), जॉर्जिया (१६), नॉर्थ कॅरोलिना (१६), अॅरिझोना (११) आणि नेवाडा (६) ही ९३ मते निर्णायक ठरणार आहेत. ही राज्ये स्विंग स्टेट किंवा बॅटलग्राउंड स्टेट म्हणून ओळखली जातात. कारण ती कोणत्याही उमेदवाराकडे फिरू शकतात. या बहुतेक राज्यांनी गेल्या अनेक निवडणुकांमध्ये बदलता आणि संमिश्र कौल देऊन स्विंग स्टेट म्हणून ओळख निर्माण केली आहे.

हेही वाचा >>>फसवे फोन कॉल ते ऑनलाइन हस्टलिंग; आजी-आजोबांच्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले; कारण काय? संरक्षणात्मक उपाय काय?

रंजक काही थोडे…

दोन्ही उमेदवारांना २६९ इलेक्टोरल मते मिळाली, तर अमेरिकी काँग्रेसच्या प्रतिनिधिगृहातील विद्यमान संख्याबळानुसार अधिक जागा असलेल्या पक्षाचा उमेदवार विजयी ठरतो. अध्यक्षीय निवडीबरोबरच अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या सर्व ५३८ जागांसाठीही निवडणूक होत आहे. त्याचबरोबर काही सेनेटच्या जागा आणि काही राज्यांमध्ये गव्हर्नर पदासाठी मतदान होत आहे.

सन २००० पासून गेल्या सहा अध्यक्षीय निवडणुकांमध्ये पाच वेळा (२०००, २००८, २०१२, २०१६, २०२०) डेमोक्रॅटिक पक्षाला सर्वाधिक मते मिळाली. पण यांपैकी २००० आणि २०१६ या वर्षी अधिक इलेक्टोरल मतांच्या जोरावर रिपब्लिकन अध्यक्ष निवडून आले.  

कमला हॅरिस निवडून आल्या तर त्या अमेरिकेच्या अध्यक्ष म्हणून निवडून येणाऱ्या पहिल्या महिला ठरतील. अमेरिकेचे पहिले गौरेतर अध्यक्ष बनण्याचा मान बराक ओबामा यांनी यापूर्वीच मिळवला आहे. डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तर ते या पदावर निवडून येणारे सर्वांत वयस्कर अध्यक्ष ठरतील. तसेच दोन वेगवेगळ्या टर्ममध्ये निवडून येणारे ते ग्लोव्हर क्लीव्हलँड यांच्यानंतरचे दुसरे अध्यक्ष ठरतील. ग्रोव्हर क्लीव्हलँड हे १८८५-१८८९ आणि १८९३-१८९७ असे दोन कार्यकाळ अध्यक्ष होते, परंतु सलग दोन टर्म अध्यक्ष नव्हते. त्यामुळे एकच व्यक्ती असूनही त्यांना २२वे आणि २४वे अध्यक्ष म्हणून संबोधले जाते. ट्रम्प निवडून आल्यास त्यांना ४५वे आणि ४७वे अध्यक्ष असे संबोधले जाईल.