Jam Saheb of Nawanagar Memorial पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवासीय पोलंड दौर्‍यावर आहेत. ४५ वर्षांत पोलंडला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. आपल्या दौर्‍यादरम्यान ते नवानगर जाम साहेबांच्या स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. पोलंड आणि भारताचे अनेक वर्षांपासून राजकीय संबंध राहिले आहेत. पोलंड आणि भारताचं नातं इतकं घट्ट आहे की, पोलंडच्या घरोघरी भारतातील एका महाराजांची पूजा केली जाते. पंतप्रधान मोदींच्या दौर्‍याविषयी बोलताना पोलंडमधील भारतीय राजदूत नगमा मोहम्मद मल्लिक यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले, “महाराजांच्या स्मारकावर आदरांजली वाहणारे ते पहिले पंतप्रधान असतील.” त्यांनी असेही नमूद केले की, पंतप्रधान मोदी पोलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित करतील. पण, हे स्मारक कोणाला समर्पित आहे? त्यांना पोलंडमध्ये इतकी मान्यता कशी? याविषयी जाणून घेऊ.

स्मारक नक्की कोणाला समर्पित आहे?

पोलंडच्या वॉर्सा येथील नवानगर मेमोरियलचे जाम साहेब ‘गुड महाराजा स्क्वेअर’ किंवा ‘डोब्रेगो महाराडझी’ येथे आहे. हे स्मारक गुजरातमधील नवानगर (आता जामनगर) चे महाराज जाम साहेब दिग्विजयसिंहजी रणजितसिंहजी यांना समर्पित आहे. पोलंडमध्ये ते ‘गुड महाराजा’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक संघातून बाहेर पडलेल्या शेकडो पोलिश मुलांना आश्रय दिला होता. पोलंडमधील नागरिक त्यांच्या मानवतावादी प्रयत्नांसाठी त्यांची आठवण करतात. त्यांच्या स्मरणार्थ पोलंडमध्ये हे स्मारक तयार करण्यात आले.

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
smriti irani in Vasai Assembly constituency for Maharashtra Assembly Election 2024
वसईची परिस्थिती जैसे थे; स्मृती इराणी, महायुतीच्या प्रचारासाठी वसईत सभा
Mankhurd  Shivajinagar Muslim community in confusion print politics news
मानखुर्द- शिवाजीनगरात मुस्लीम समाज संभ्रमात
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
पोलंडच्या वॉर्सा येथील नवानगर मेमोरियलचे जाम साहेब ‘गुड महाराजा स्क्वेअर’ किंवा ‘डोब्रेगो महाराडझी’ येथे आहे. (छायाचित्र-इंडियन पोलंड/एक्स)

हेही वाचा : वॉटरस्पाउट म्हणजे काय? त्यामुळे इटलीतील समुद्रात जहाज कसे बुडाले?

जाम साहेब दिग्विजयसिंहजी रणजितसिंहजी नेमके कोण होते?

१८९५ मध्ये सरोदा येथे जन्मलेल्या जाम श्री दिग्विजयसिंहजी रणजितसिंहजी जडेजा यांनी राजकुमार कॉलेज, माल्व्हर्न कॉलेज आणि युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे आपले शिक्षण पूर्ण केले. १९१९ मध्ये त्यांना ब्रिटीश सैन्यात सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त करण्यात आले. ही लष्करी कारकीर्द त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ सांभाळली. त्यांच्या लष्करी कारकिर्दीच्या शेवटी त्यांची लेफ्टनंट-जनरल पदावर नियुक्ती करण्यात आली. १९३३ मध्ये रणजितसिंहजी त्यांचे काका प्रसिद्ध क्रिकेटपटू के. एस. रणजितसिंहजी यांच्यानंतर नवानगरचे महाराज झाले.

महाराजा रणजितसिंहजींनी पोलिश मुलांना कशी मदत केली?

दुसऱ्या महायुद्धादरम्यान, हिटलरने जेव्हा पोलंडवर आक्रमण केले तेव्हा पोलंडमधील सैनिकांनी महिला आणि मुलांना हजारो छावण्यांमध्ये आणि अनाथाश्रमांमध्ये पाठवले. तिथे भूकमारी आणि रोगराई पसरू लागली. १९४१ मध्ये निराधार निर्वासितांना सोव्हिएत युनियन सोडण्याची परवानगी देणारी कर्जमाफी जाहीर करण्यात आली. शेकडो पालक नसलेली पोलिश मुले अचानक निराधार झाली. त्यांच्यापैकी काहींना मेक्सिको, न्यूझीलंड आणि इतर दूरच्या देशांमध्ये आश्रय मिळाला. तेव्हाच महाराजा रणजितसिंहजींनी स्वेच्छेने शेकडो मुलांना घर उपलब्ध करून दिले. ग्रेट ब्रिटनच्या युद्ध मंत्रिमंडळात एक हिंदू प्रतिनिधी म्हणून महाराजांना त्यावेळच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीची चांगली जाणीव होती. त्यांच्या उदार स्वभावामुळे ते मुलांसाठी समोर आले. अँडर्स आर्मी (माफीनंतर सोव्हिएत युनियनमध्ये तयार झालेले पोलिश सशस्त्र दल), रेड क्रॉस, मुंबईतील पोलिश वाणिज्य दूतावास आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांनी मुलांना भारतात आणले.

१९३३ मध्ये रणजितसिंहजी त्यांचे काका प्रसिद्ध क्रिकेटपटू के. एस. रणजितसिंहजी यांच्यानंतर नवानगरचे महाराज झाले. (छायाचित्र-दिग्विजयसिंहजी/फेसबुक)

त्यानंतर १९४२ मध्ये १७० मुलांचा पहिला गट लांब पल्ल्याचा प्रवास करून नवानगरमध्ये आला. महाराजांनी नवागतांचे अभिवादन केले आणि म्हणाले, “तुम्ही आता अनाथ नाहीत. आजपासून तुम्ही नवनगरीय आहात आणि मी बापू आहे. मी सर्व नवनगरीयांचा पिता आहे, म्हणून मी तुमचाही पिता आहे.” त्यांनी आपल्या राजवाड्यापासून काहीच अंतरावर असणार्‍या बालचडी नावाच्या ठिकाणी मुलांसाठी एक शिबिर बांधले आणि त्यांना वैद्यकीय मदत, निवास आणि शाळा उपलब्ध करून दिली. त्यांनी आपली मातृभाषा विसरू नये म्हणून पोलिश पुस्तकांसह एक खास लायब्ररीही स्थापन केली. त्यानंतर त्यांनी चेला येथे त्यांच्यासाठी आणखी एक शिबिर उघडले. मुलांसाठी निधी गोळा करण्यासाठी त्यांनी पटियाला व बडोदाच्या राज्यकर्त्यांशीही आणि टाटा समूहाशी संपर्क साधला. पोलिश मुलांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी लाखो रुपये जमा करण्यात आले.

राजाची मुलगी हर्षद कुमारी हिने ‘आउटलुक मॅगझिन’ला सांगितले की, “आमच्या वडिलांनी त्यांना राजकीयदृष्ट्या दत्तक घेतले.” जेव्हा युद्ध संपले आणि अनाथांना युरोपला परत जावे लागले तेव्हा मुले आणि महाराज दोघांचेही मन नाराज होते. रणजितसिंहजींनी त्यांना वैयक्तिकरित्या निरोप दिल्याचेही वृत्त आहे.

महाराजांच्या सन्मानार्थ पोलंडमध्ये शाळा, रस्ते आणि बरेच काही

रणजितसिंहजींनी आपल्या उदारतेच्या बदल्यात कधीही काहीही मागितले नाही. परंतु, मुक्त झालेल्या पोलंडमध्ये एखाद्या रस्त्याचे नाव त्यांच्या नावावर ठेवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यांच्या हयातीत असे घडले नसले तरी १९८९ मध्ये वॉर्सा येथील एका चौकाला महाराजांचे नाव देण्यात आले. त्यानंतर शहरातील एका लहान उद्यानालाही ‘स्क्वेअर ऑफ द गुड महाराजा’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच त्यांच्या सन्मानार्थ एक स्मारक उभारण्यात आले आणि त्यांना मरणोत्तर पोलंड प्रजासत्ताकाच्या ‘कमांडर क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट’ने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा : कोलकाता अत्याचार प्रकरणामुळे मुंबईतील १९७३ च्या दुर्दैवी घटनेची आठवण; काय होते अरुणा शानबाग प्रकरण?

वॉर्सा येथे महाराजांच्या नावावर असलेली एक शाळादेखील आहे. विशेष म्हणजे त्या शाळेला भारतीय स्मारकांची चित्रे, शास्त्रीय नृत्य आणि संस्कृतीच्या प्रतिमांनी सुशोभीत केले आहे. ही शाळा ‘फ्रेंड्स ऑफ इंडिया एज्युकेशन फाउंडेशन’द्वारे चालवली जाते. २००९ मध्ये पोलंडचे तत्कालीन पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी रणजितसिंहजींच्या दयाळूपणाची आठवण सांगितली होती. ते म्हणाले होते, “जेव्हा इतर देश आमच्या मुलांना छळत होते, तेव्हा तुम्ही त्यांना वाचवू शकलात.” बालाचडीमध्ये राहणाऱ्या अनेक मुलांपैकी एक कॅरोलिना रायबका यांनी ‘सीबीसी’ न्यूजला सांगितले की, आमच्या हजार मुलांचे काय झाले असते याची कल्पना करणेही कठीण आहे, त्यांनी आमचे प्राण वाचवले.”