जपान हा लोकसंख्येने लहान देश आहे. त्यांची लोकसंख्या फक्त १२ कोटींच्या आसपास आहे. जपानमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे तेथे बऱ्याच गोष्टींसाठी तंत्रज्ञानाचा योग्य रीतीने वापर केला जातो. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे ‘व्हेंडिंग मशीन’चा देशभर केला जाणारा वापर! व्हेंडिंग मशीन म्हणजे असे यंत्र; ज्यामध्ये पैसे टाकल्यास स्नॅक्स, ड्रिंक्स, तिकिटे अथवा खाण्याच्या वस्तू इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. जपानमध्ये ठिकठिकाणी अशा मशीन्स असून, त्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. सर्वसामान्य जपानी माणूस या मशीन्सचा सर्रासपणे वापर करतो. मात्र, आता याच मशीन्स निरुपयोगी होण्याची शक्यता आहे. जपानने ३ जुलै रोजी नव्या चलनी नोटा (येन) जारी केल्या आहेत. या नव्या नोटांमुळे या मशीन्स वापरण्यायोग्य राहणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा : विश्लेषण : कमला हॅरिस जो बायडेन यांची जागा घेऊ शकतील का? डेमोक्रॅटिक पक्षात त्यांच्या नावाला का मिळतेय वाढती पसंती?

pune Penal action against two senior officers for facilitating bogus payments at Jijamata Hospital
पिंपरी : मानधनाची २१ लाखांची बोगस बिले लाटली; दाेन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पाचशे रुपये…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
Two months ago Thane Municipal Corporation requested bmc for 50 million liters of water
ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा, मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
four days week in japan
विश्लेषण : जन्मदर वाढविण्यासाठी जपानमध्ये चार दिवसांचा आठवडा..! काय आहेत कारणे? योजना कशी राबवणार?
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

व्हेंडिंग मशीन्सचा सुयोग्य वापर

संपूर्ण जपान अशा व्हेंडिंग मशीन्सनी व्यापलेले आहे. इतके की या मशीन्स जपानी लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. निक्की कम्पास यांनी व्हेंडिंग मशीन्स उद्योगाबाबत माहिती देताना म्हटले की, जपानमध्ये ४.१ दशलक्ष व्हेंडिंग मशीन्स आहेत. म्हणजेच प्रत्येकी ३१ जपानी व्यक्तीमागे एक मशीन कार्यरत आहे. संपूर्ण जगाचा विचार केल्यास, जपानमध्ये सर्वाधिक व्हेंडिंग मशीन्सचा वापर केला जातो. या व्हेंडिंग मशीन्सचा वापर विविध उपयोगी वस्तूंच्या विक्रीसाठी केला जातो. त्यामध्ये ड्रिंक्स, खाद्यपदार्थ, कपडे, खेळणी अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. अशा वस्तू उपलब्ध असलेल्या मशीन्स ठिकठिकाणी बसविलेल्या आहेत. रेल्वेस्थानके, कार्यालये, बसथांबे आणि अगदी हॉटेल्समध्येही अशा बहुपयोगी मशीन्स लावलेल्या दिसून येतील. रामेन (नूडल्सचा सुप्रसिद्ध जपानी प्रकार) शॉप्ससारखी छोटी भोजनालये लोकांच्या ऑर्डर्स घेण्यासाठी व्हेंडिंग मशीन्सचा वापर करतात. देशामध्ये काम करण्यासाठी मजूरवर्गाची उपलब्धता कमी असल्याने अशा यंत्रणेचा वापर प्रभावीपणे केला जातो.

रोख रकमेचा वापर

जपानमध्ये रोख रकमेचाच अधिक वापर केला जातो. तिथे डिजिटल पेमेंटचा वापर फारच हळुवार गतीने होत आहे. जपानच्या अर्थ, व्यापार व उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कॅशलेस पेमेंट्सचा एकूण वापर केवळ ३९ टक्क्यांइतकाच आहे. पाश्चात्त्य अर्थव्यवस्थांच्या तुलनेत ही टक्केवारी लक्षणीयरीत्या कमी आहे. जपानचा सर्वांत जवळचा शेजारी असलेल्या दक्षिण कोरियामध्ये मात्र कॅशलेस पेमेंट्सचे प्रमाण अधिक म्हणजे ८५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जपानी लोकांना रोख चलनाबाबत एवढी आत्मीयता असण्यामागेही अनेक कारणे आहेत. कॅशलेस पद्धतीने व्यवहार करताना वैयक्तिक माहितीची होणारी चोरी, क्रेडिट कार्डची चोरी होऊन गैरवापर होण्याची भीती, तसेच क्रेडिट कार्डमुळे जास्त खर्च होण्याची चिंता या आणि अशा कारणांमुळे जपानी लोक अधिकाधिक रोख रकमेच्या माध्यमातूनच व्यवहार करणे पसंत करतात. तसेच जपानी संस्कृतीमध्येही रोख रकमेबद्दल अधिक आत्मीयता बाळगली जाते. त्यामुळे डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याच्या कितीही सोई-सुविधा उपलब्ध असल्या तरीही रोख रकमेने व्यवहार करण्याची जपानी लोकांची आवड तशीच आहे. जपानमधील फारच थोड्या व्हेंडिंग मशीन्स डिजिटल पद्धतीने व्यवहार करू शकतात. बहुतांश मशीन्स रोख रकमेच्या माध्यमातूनच व्यवहार करू शकतात.

हेही वाचा : अबकी बार ब्रिटनमध्ये ‘४००’ पार! निर्विवाद बहुमत मिळवणाऱ्या मजूर पक्षाचा काय आहे इतिहास?

मोठा बदल

जपानमध्ये नव्या चलनी नोटा जारी करण्यात आल्यानंतर व्हेंडिंग मशीन्सबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण- यामुळे जपानमधील बहुतांश व्हेंडिंग मशीन्स निरुपयोगी ठरण्याची शक्यता आहे. एक तर त्या बदलाव्या लागतील अथवा त्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्या लागतील. फॉर्च्युन या मासिकातील एका अहवालानुसार, देशातील फक्त ३० टक्के मशीन्स नव्या चलनी नोटांचा स्वीकार करू शकतात. २०२१ मध्ये ५०० येनची नवी नाणीही जारी करण्यात आली होती. सध्या वास्तव असे आहे की, देशातील बहुतांश मशीन्स या नाण्यांचाही स्वीकार करीत नाहीत. द न्यूयॉर्क टाइम्सने २०२३ मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, जपानमधील फक्त ७० टक्के ड्रिंक व्हेंडिंग मशीन्स ५०० येनच्या नाण्यांचा स्वीकार करू शकतात. या मशीन्स अद्ययावत करण्याचा खर्च संबंधित व्यावसायिकांनाच करावा लागणार आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, नव्या मशीन्सच्या खरेदीचा खर्च १९ हजार डॉलर्सपर्यंत असू शकतो. छोट्या व्यावसायिकांना हा खर्च परवडणे अवघड आहे. मात्र, जपान अशा समस्येला पहिल्यांदाच तोंड देत आहे, असे नाही. २००४ मध्येही जपानच्या चलनी नोटा अद्ययावत करण्यात आल्या होत्या. तेव्हाही या चलनी नोटांना अनुकूल व्हेंडिंग मशिन्सची मागणी झाली होती. तेव्हा व्हेंडिंग मशिन्स बनविणाऱ्या ‘ग्लोरी’सारख्या कंपन्यांच्या उत्पन्नामध्ये तिपटीने वाढ झाली होती. जपानमधील धोरणकर्त्यांचे असे म्हणणे आहे की, बनावटगिरी रोखण्यासाठी हे एक आवश्यक पाऊल होते. नवीन नोटांमध्ये सुरक्षेसाठीच्या प्रगत गोष्टी समाविष्ट आहेत. त्यामुळे बनावट नोटांपासून सुरक्षा मिळते.

Story img Loader