नायलॉन किंवा चिनी मांजावर बंदी आहे. मात्र, असे असले तरी याची सर्रास विक्री केली जाते. पतंग उडवून राजस्थान आणि गुजरातसारख्या प्रदेशात मकर संक्रांत किंवा उत्तरायण हे सण साजरे केले जातात. मकर संक्रांतीला केवळ एक आठवडा शिल्लक राहिला आहे. पतंगाच्या सैल मांजामुळे होणाऱ्या गंभीर इजा टाळण्यासाठी गुजरात पोलिसांनी एक मोहीम सुरू केली आहे. मांजाचा विशेषत: दुचाकीस्वारांना जास्त धोका असतो. रविवारी (२९ डिसेंबर) सुरतमधील एका दुचाकीस्वाराचा घसा पतंगाच्या मांजाने कापला, दुचाकीस्वार वाचला असला तरी त्याला तब्बल २० टाके लागले.

वडोदरा आणि आनंद जिल्ह्यातही प्रत्येकी दोन मृत्यूंची आणि पाच जखमींची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. वाहनांवर संरक्षक पतंग स्ट्रिंग गार्ड बसविण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. हे स्ट्रिंग गार्ड अलीकडेच लोकप्रिय झाले. राज्यात २०२३ मध्ये उत्तरायणादरम्यान गळा कापला गेल्याची आणि दुखापतीची सुमारे १३० प्रकरणे नोंदवली गेली. त्यानंतर लोकप्रिय ठरत असलेले काइट स्ट्रिंग गार्ड काय आहेत? ते कसे कार्य करते? त्याविषयी जाणून घेऊ.

Undisciplined drivers fined Rs 18 lakh 90 thousand Traffic Department takes action
बेशिस्त वाहनचालकांना १८ लाख ९० हजार रुपयांचा दंड; वाहतूक विभागाची कारवाई
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Tipeshwar sanctuary hunters noose stuck around neck of tigress named PC
वाघिणीच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास, वाघांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
tiger poaching nagpur news in marathi
Tiger Poaching : वाघाच्या शिकारीतून कोट्यावधींचा आर्थिक व्यवहार, डब्ल्यूसीसीबीचा ‘रेड अलर्ट’
mla Vijay Shivtare of Shiv Sena Shinde faction has been removed from District Planning Committee
आमदार शिवतरेंना वगळले, महायुतीत वादाची ठिणगी ?
Which animals are banned in India
भारतात ‘हे’ २० प्राणी पाळण्यावर बंदी; घरात आढळल्यास होऊ शकते कारवाई
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
paragliding in goa
Paragliding in Goa : गोव्यातील पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारने ‘या’ उपक्रमावर आणली स्थगिती!

हेही वाचा : दरवर्षी ६८ कोटींना बाधा, दोन लाखांहून अधिक मृत्यू; काय आहे नोरोव्हायरस? याची लक्षणे अन् उपाय काय?

काइट स्ट्रिंग गार्ड म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?

काईट स्ट्रिंग गार्ड किंवा स्ट्रिंग प्रोटेक्टर म्हणजे मोटरसायकलच्या हॅण्डल बारवर लावलेली स्टील आणि लूप केलेली एक वायर असते. डिसेंबर-जानेवारीमध्ये पारंपरिक पतंग उडवण्याच्या हंगामात तुटलेल्या पतंग मिळविण्यासाठी त्याला जोडलेले मांजा पकडले जातात. त्यादरम्यान हवेत तरंगणारा हा मांजा अनेकदा दुचाकीस्वाराच्या डोक्यावर येतो. स्ट्रिंग प्रोटेक्टरला हॅण्डल बार किंवा रीअर व्ह्यू मिरर्सला जोडले जाऊ शकते. खेडा जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश घडिया यांच्या पथकाने जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्यांवर ५०० हून अधिक पतंग स्ट्रिंग गार्डचे वाटप केले आहे. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असला तरी मोठ्या प्रमाणात चिनी मांजाचा वापर केला जातो. परंतु, यामुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर उपाय म्हणून पोलिसांनी काइट स्ट्रिंग गार्ड मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

काईट स्ट्रिंग गार्ड किंवा स्ट्रिंग प्रोटेक्टर म्हणजे मोटरसायकलच्या हॅण्डल बारवर लावलेली स्टील आणि लूप केलेली एक वायर असते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

काइट स्ट्रिंग गार्डची शिफारस का करण्यात आली?

पोलिसांचे म्हणणे आहे की, जरी प्रतिबंधित चायनीज पतंगाचे मांजा किंवा काचेच्या लेपित पतंगाच्या तारांमुळे दुचाकीस्वारांना जीवघेण्या दुखापती होतात, असे मानले जात असले तरी परवानगी असलेल्या धारदार धाग्यांमुळेही मृत्यू होऊ शकतो. घडिया म्हणाले, “पतंग उडवणे हा परंपरेचा एक भाग आहे; परंतु यामुळे दुचाकीस्वारांना धोका निर्माण होतो. कारण- अनेकदा गाडी वेगात असल्याने त्यांना समोरून तरंगत जाणारा दिसू शकत नाही आणि हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराच्या मानेलाही दुखापत होऊ शकते. अशा वेळी काईट स्ट्रिंग गार्ड खूप उपयुक्त ठरू शकते.” वडोदरा पोलीस उपायुक्त (वाहतूक) ज्योती पटेल यांनी सांगितले की, शहर पोलीस स्वयंसेवी संस्थांच्या पाठिंब्याने जानेवारी महिन्यात मोफत काईट स्ट्रिंग गार्डच्या वाटपाची मोहीम सुरू करतील. “काईट स्ट्रिंग गार्ड मानेच्या ९० टक्के प्राणघातक दुखापती टाळण्यास मदत करू शकतो. आमच्यासाठी दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी उपाय शोधणे महत्त्वाचे आहे आणि आतापर्यंत काईट स्ट्रिंग गार्ड सर्वांत प्रभावी राहिले आहे”, असे त्या म्हणाल्या.

स्ट्रिंग गार्ड कसे बसवले जातात?

स्ट्रिंग गार्ड या तारा असतात, ज्यांना केवळ मिरर होल प्लगच्या आजूबाजूला घट्ट बांधण्यासाठी पक्कड लागते. वडोदरा येथील रस्त्याच्या कडेला असलेले रमेश परमार म्हणाले, “स्टील गार्ड बसवायला सुमारे १० मिनिटे लागतात. मोटरसायकल बहुतेक ग्राहक आम्हाला ते करण्यास सांगतात; परंतु काही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी अतिरिक्त तारादेखील घेतात आणि ते स्वतःच या तारा बसवण्यास प्राधान्य देतात. तारांची रुंदी सुमारे पाच ते सहा मिलिमीटर असल्याने एखाद्याने घरी उपलब्ध असलेली चिमटा किंवा पक्कड वापरल्यास त्यांना बसवणे सोपे आहे. ते सहजपणे वेगळे करता येण्याजोगे आणि पुन्हा वापरता येण्याजोगेदेखील आहे, असेही त्यांनी सांगितले.

पतंग उडवून राजस्थान आणि गुजरातसारख्या प्रदेशात मकर संक्रांत किंवा उत्तरायण हे सण साजरे केले जातात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

काईट स्ट्रिंग गार्डची किंमत किती आहे?

काईट स्ट्रिंग गार्डची किंमत ८० ते १५० रुपये आहे. परमार म्हणाले, “प्रत्येक संरक्षक विक्रेत्यांसाठी सुमारे ४० रुपये खर्च येतो आणि आम्ही ते ८० ते १०० रुपयांना विकतो. गेल्या महिन्यात मी सुमारे ६०० काईट स्ट्रिंग गार्डची विक्री केली.” संरक्षणात्मक नेक ब्रेसेसदेखील उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत ६० ते ४०० रुपयांपर्यंत आहे. काईट स्ट्रिंग गार्डला आर्क प्रोटेक्टरदेखील म्हटले जाते. कोणत्याही दुचाकीवर म्हणजेच बाईक किंवा स्कुटीवर याला बसवणे अगदी सोपे आहे.

मांजामुळे झालेले अपघात

नोव्हेंबर महिन्यापासून पतंग उडवण्यास सुरुवात केली जाते. अनेक जण छंद म्हणून पतंग उडवतात आणि एकमेकांत स्पर्धा करतात. जो ज्याची पतंग सर्वांत आधी कापेल तो विजेता असतो. त्यासाठी धारदार मांजाचा वापर केला जातो. अशात नायलॉनचा मांजा सर्वाधिक धारदार असल्याचे सांगितले जाते. पतंगाच्या या हंगामात अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर येतात; ज्यात मांजामुळे दुचाकीस्वारांना आघात झाल्याचे पाहायला मिळते. पतंगबाजीच्या काळात अशा अनेक घटना घडतात, ज्यामुळे लोक जखमी होतात, कोणाला अत्यंत गंभीर दुखापत होते आणि मृत्यूच्या घटनादेखील घडतात.

हेही वाचा : कर चुकवेगिरी करणाऱ्यांना पकडण्यासाठी होतोय सरकारच्या ‘डिजी यात्रा’ अ‍ॅपचा वापर? यामागील सत्य काय?

राज्य सरकारने १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ नुसार मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन करीत असल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र, असे असले तरी मांजाची गैर पद्धतीने विक्री केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर आता इतर उपाययोजना करणे महत्त्वाचे झाले आहे. काईट स्ट्रिंग गार्ड याच उपाययोजनांचा एक भाग आहे.

Story img Loader