बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम चार वर्षे आणि पारंपरिक अभ्यासक्रमाची पदवी तीन वर्षांची हा वर्षानुवर्षांचा साचा नव्या शिक्षण धोरणात मोडीत काढण्यात आला. अगदी पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांतही अनेक वेगवेगळे रचना पर्याय समोर आले आहेत. तीन आणि चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. संशोधनासह पदवी घेण्याची मुभा आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या रचनेत अनेक बदल करण्यात आले. साधारण दोन वर्षांपूर्वीच हे बदल जाहीर करण्यात आले असले तरी त्याची अंमलबजावणी आता हळूहळू सुरू झाली आहे. काही विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालयांनी पदवी अभ्यासक्रमांचे नवे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यातील कोणत्या अभ्यासक्रमातून काय मिळणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

किती वर्षांचा पदवी अभ्यासक्रम?

तीन वर्षांच्या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाला आता चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्ध आहे. दोन्ही प्रकारातील पदवी अभ्यासक्रमांचा मूलभूत अभ्यासक्रमाचा साचा, विषय समान असतील. मात्र चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात एक वर्ष ज्या विषयाचे शिक्षण घ्यायचे त्यातील सखोल अभ्यासासाठी किंवा संशोधनासाठीचे असणे अपेक्षित आहे. त्यामुळे चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शेवटच्या वर्षात संशोधन किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव (प्रशिक्षण, आंतरवासिता) यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या विषयातील पदवी घ्यायची ते मुख्य विषय, त्याच विद्याशाखेतील किंवा दुसऱ्या विद्याशाखेतील पर्यायी विषय, आंतरविद्याशाखीय विषय, कौशल्य विकासाचे विषय आणि संशोधन किंवा आंतरवासिता अशी साधारणपणे विषय रचना असेल. तीन वर्षांच्या पदवीसाठी १२० श्रेयांक (क्रेडिट्स) तर चार वर्षांच्या पदवीसाठी १६० श्रेयांक गरजेचे असतील. चार वर्षांचाचा पदवी अभ्यासक्रम करणे बंधनकारक नाही. तो उपलब्ध करून देण्याचे किंवा न देण्याचे स्वातंत्र्य शिक्षणसंस्थांना आहे. या अभ्यासक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्तता होणेही आवश्यक आहे.

expert answer on career advice questions career advice tips from expert
करीअर मंत्र
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
expert answer on career advice questions career advice tips
कराअर मंत्र
Today is the last day to apply for various courses of Idol Mumbai print news
‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
Career mantra MPSC Graduation STUDY FOR COMPETITIVE EXAMINATION job
करिअर मंत्र

हेही वाचा >>>विश्लेषण: हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी आत्महत्या का वाढल्या?

चार वर्षांच्या अभ्यासक्रमाचा फायदा काय?

जी पदवी तीन वर्षांतच मिळू शकते त्यासाठी चार वर्षे का खर्ची घालावीत, असा सामान्यपणे पडणारा प्रश्न आहे. अनुषंगाने तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आणि चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम समकक्ष असले तरी चार वर्षांचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही फायदे नक्कीच होतील. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे एका वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची मुभा असेल. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे श्रेयांक ७.५ पेक्षा अधिक असतील त्यांना थेट नेट किंवा पीएचडी प्रवेश परीक्षा देऊन पीएचडीसाठी प्रवेश घेता येईल. काही विद्यापीठे किंवा शिक्षणसंस्थांनी देशातील किंवा परदेशातील विद्यापीठांसह चार वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अशा अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सत्र दुसऱ्या विद्यापीठात शिकता येईल.

ऑनर्स आणि रिसर्च पदवीमध्ये फरक काय?

चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात ऑनर्स आणि रिसर्च म्हणजे संशोधनासह पदवी असे पर्याय आहेत. प्रशिक्षण आणि मुख्य विषयासह पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनर्स अशी पदवी देण्यात येईल. संशोधनासह पदवी मिळवण्यासाठी पहिल्या सहा सत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी ७५ टक्के गुण मिळवणे गरजेचे असेल. पदवीच्या मुख्य विषयातील संशोधन प्रकल्प किंवा शोधप्रबंध चौथ्या वर्षात सादर करावा लागेल. एकूण १६० पैकी १२ श्रेयांक संशोधनासाठी मिळवणे आवश्यक असेल.

हेही वाचा >>>चांदीपुरा व्हायरसचा कहर; ५ दिवसांत ६ मुलांचा मृत्यू, हा व्हायरस किती घातक? काय आहेत याची लक्षणे?

तीन वर्षांच्या अभ्यासक्रमातून चार वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल का?

तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चार वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची मुभा नियमानुसार आहे. मात्र, ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा तेथे जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. तीन वर्षांच्या पदवीसाठी ज्या संस्थेत प्रवेश घेतला आहे तेथे किंवा दुसऱ्या संस्थेत प्रवेश घ्यायचा असल्यास संस्थेची परवानगी आवश्यक आहे. संस्थेने परवानगी दिल्यास आधीच्या अभ्यासक्रमाचे श्रेयांक पुढील अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मुभा आहे. चार वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर तीन वर्षानंतर अभ्यासक्रम सोडल्यासही पदवी मिळू शकेल. तीन किंवा चार वर्षांच्या कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या वर्षीनंतर प्रमाणपत्र, दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर पदविका तीन वर्षे पूर्ण झाल्यावर पदवी आणि चार वर्षे पूर्ण झाल्यावर ऑनर्स किंवा संशोधनासह पदवी देण्यात येईल.