सूर्यमालेत पृथ्वी हा एकमात्र ग्रह आहे, जिथे जीवसृष्टी आहे. मात्र, सूर्यमालेत एक असाही ग्रह आहे, जिथे जीवन असल्याचा दावा शास्त्रज्ञ करतात, तो ग्रह आहे मंगळ. मंगळावर जीवन होते हे सांगणारे अनेक पुरावे आजवर संशोधनातून समोर आले आहेत; ज्याची चर्चा संपूर्ण जगभरात सुरू आहे. नवीन पुरावे सूचित करतात की, मंगळाच्या पृष्ठभागावर एकेकाळी पाणी वाहत होते. याचा अर्थ असा की, हे पाणी गोठण्यापासून रोखण्यासाठी मंगळावर दाट वातावरण होते. सुमारे ३.५ अब्ज वर्षांपूर्वी मंगळावरील जीवन संपले. ते कसे घडले हा आतापर्यंत एक गूढ प्रश्न होता. मात्र, आता शास्त्रज्ञांनी हे कोडे सोडवले आहे. लाल ग्रह म्हणून ओळखला जाणार्‍या मंगळावरील मातीमुळेच या ग्रहावरील वातावरण खराब झाले असल्याची माहिती समोर आली आहे. नेमके संशोधनात काय समोर आले? मंगळावरील जीवन नक्की कसे संपले? त्याविषयी जाणून घेऊ.

मंगळावरील जीवन कसे संपले हे जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत. २४ सप्टेंबर रोजी सायन्स ॲडव्हान्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासात त्यासंबंधित अनेक गोष्टी उघड झाल्या. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे भूगर्भशास्त्रज्ञ जोशुआ मरे आणि ऑलिव्हर जगौट्झ यांनी दावा केला आहे की, मंगळाच्या पृष्ठभागावर काही विशिष्ट प्रकारच्या खडकांमधून पाणी गळत होते. ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साइडदेखील होते. हळूहळू हवामान बदलाच्या परिणामांमुळे कार्बन डाय ऑक्साइड वातावरणातून निघून गेले किंवा कार्बन डाय ऑक्साइडचे रूपांतर मिथेनमध्ये झाले आणि मंगळावरील जीवसृष्टी संपली.

Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
On December 13 and 14 there will also meteor shower in space and feast for astronomy lovers
आकाशात १३, १४ डिसेंबरला उल्कावर्षाव; पृथ्वी लहान-मोठ्या कणांजवळून…
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Mercury Rise in Scorpio
‘या’ चार राशींचे भाग्य उजळणार, बुध ग्रहाच्या कृपेने मिळणार अपार संपत्ती
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय

हेही वाचा : ‘डिझायनर पार्टी ड्रग’ म्हणून ओळखले जाणारे पिंक कोकेन काय आहे? जगभरातील तरुण त्याच्या आहारी का जात आहेत?

नवीन अभ्यासातून काय समोर आले?

दोन भूगर्भशास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील संशोधनाच्या आधारे हा सिद्धांत तयार केला. २०२३ मध्ये शास्त्रज्ञ स्मेक्टाइट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिकणमातीच्या सामग्रीवर काम करत होते, जे कार्बन पकडण्यात कार्यक्षम आहे. त्याला कार्बन ट्रॅप म्हणूनही ओळखले जाते. स्मेक्टाइटमध्ये कार्बनचे कण अब्जावधी वर्षे असू शकतात. एमआयटी संशोधकांना असे आढळून आले की, पृथ्वीवरील वातावरणाच्या संपर्कात राहिल्यास, स्मेक्टाइट लाखो वर्षांमध्ये वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड काढू शकतो आणि साठवू शकतो, हे ग्रह थंड करण्यासाठी पुरेसे आहे.

कोणकोणत्या स्थितीत स्मेक्टाइट तयार होऊ शकते, यावर शास्त्रज्ञांनी संशोधन करण्यास सुरुवात केली. (छायाचित्र-एपी)

स्मेक्टाइटविषयीची ही माहिती समोर येताच जगौट्झ यांनी मंगळाच्या पृष्ठभागाचा एक मोठा नकाशा पाहिला आणि ते ज्या स्मेक्टाइटचा अभ्यास करत होते, तेच स्मेक्टाइट त्यांना मंगळावर असल्याचे आढळून आले. शिवाय, स्पेक्टाइट तिथे कसे आले याची त्यांनाही खात्री नव्हती. पृथ्वीवर, टेक्टोनिक हालचालींमुळे स्मेक्टाइट तयार झाले होते. मंगळावर स्मेक्टाइट कसे आले याचा शोध शास्त्रज्ञांनी सुरू केला. संशोधनानुसार, या खनिजाने कार्बन डायऑक्साइड स्वतःकडे खेचून घेतले आणि त्याचा प्रभाव संपूर्ण वातावरणावर झाला. त्यामुळे मंगळावरील जीवसृष्टी संपुष्टात आली.

मंगळावरील जीवन कसे संपले?

कोणकोणत्या स्थितीत स्मेक्टाइट तयार होऊ शकते, यावर शास्त्रज्ञांनी संशोधन करण्यास सुरुवात केली. मंगळावरील पाण्याने ग्रहाच्या पृष्ठभागावर असणार्‍या फेरस खडक ‘ऑलिव्हिन’वर कशी प्रक्रिया केली, यावर संशोधन सुरू झाले. त्यांना आढळले की, या विशाल कालखंडात, पाण्यातील ऑक्सिजनचे अणू हळूहळू ऑलिव्हिनमधील लोहाशी जोडले गेले असावे(हेदेखील ग्रहाला लाल रंग देण्यास कारणीभूत असू शकतात), पाणी खडकावर आदळून स्मेक्टाइट तयार झाले असावे आणि त्याने कार्बन डाय ऑक्साइड साठवून घेतले असावे, असा शस्त्रज्ञांचा अंदाज आहे.

हा शोध केवळ शास्त्रज्ञ किंवा संशोधकांच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर भविष्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. मंगळाला दुसरी पृथ्वीदेखील म्हटले जाते. मंगळावर जीवसृष्टी आहे की नाही, हे पाहण्यासाठी आजवर अनेक मोहिमा करण्यात आल्या आहेत. मंगळाच्या पृष्ठभागावर असणारे मिथेन संभाव्यत: एक अमूल्य संसाधन असू शकते. “या मिथेनचा वापर भविष्यात मंगळावर उर्जा स्त्रोत म्हणून केला जाऊ शकतो,” असे संशोधकांनी सुचवले आहे. मंगळावर जीवसृष्टीची शक्यता किती, यावर शास्त्रज्ञ सतत काम करत आहेत. नासानेही दोन रोव्हर तेथे पाठवले आहेत, जेणेकरून ग्रहाचे निरीक्षण बारकाईने करता येईल.

हेही वाचा : चीनची ४४ वर्षांनंतर अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र चाचणी; याचा अर्थ काय? जगासाठी ही चिंतेची बाब आहे का?

मात्र, मंगळावर जीवसृष्टीसाठी अनेक आव्हाने असल्याचे आतापर्यंत झालेल्या संशोधनातून समोर आले आहे. यातील पहिले आव्हान म्हणजे तापमान. मंगळाचे तापमान -५ ते -८७ टक्के आहे. त्याचे गुरुत्वाकर्षणदेखील पृथ्वीच्या तुलनेत ३८ टक्के कमी आहे. मंगळावर ओझोनचा थरही नाही. तसेच या ग्रहावर येणाऱ्या धुळीच्या वादळांना सामोरे जाणेही सोपे नाही. मात्र, तरीही मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

Story img Loader